व्हेज पनीर बिर्याणी

बिर्याणी.. करायला सोपी आणि खायला मस्त..


व्हेज पनीर बिर्याणी..

साहित्य: बासमती तांदूळ, पनीर, पुदिना आवडीनुसार फ्लॉवर , फरसबी, गाजर, बटाटा, मटार अशा भाज्या. आले, लसूण , मिरचीची भरड, दही, बिर्याणी मसाला, खडा मसाला , तेल, तूप...


कांदा, बटाटा, हवे असतील तर काजू तळून घ्यावेत.. एका बाजूला एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे.. त्यात पुदीना, थोडा खडा मसाला, मीठ, साजूक तूप घालावे... पाण्याला उकळी आली की त्यामध्ये 1 तास आधी भिजवलेले तांदूळ घालावे..त्यावर झाकण ठेवायचे नाही.. कांदा तळलेल्या तेलात परत थोडा खडा मसाला आल,मिरची, लसूण पेस्ट घालावी.. त्यात अजून थोडा उभा चिरलेला कांदा घालावा.. कांदा परतला कि त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा.. तेल सुटेपर्यंत परतावे.. नंतर दही घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यात हळद ,तिखट, बिर्याणी मसाला व आपल्या आवडीच्या फ्लाॅवर, मटार, फरसबी, गाजर टाकायच्या. 75% शिजलेला भात मोकळा करून घ्यायचा. एका पातेल्याला तूपाचा हात लावून घ्यावे.. तळाला भाजी पसरून घ्यायची.त्या वर भाताचा थर द्यायचा.. त्या वर तळलेला कांदा, काजू, बटाटा पसरवायचा.. हवे असल्यास सुरूवातीलाच दह्यात आले, लसूण, मिरची पेस्ट बिर्याणी मसाला मिक्स करायचा.. त्यात पनीरचे तुकडे टाकावेत... हे आता दुसर्या थरात लावायचे.. एक चमचा तूप घालावे... परत उरलेल्या भाताचा थर लावायचा... त्या वर उरलेला तळलेला, कांदा , बटाटा, काजू पुदिना, कोथिंबीर टाकायचे... 2 चमचे तूप... केशर दूधात घालून टाकायचे... पातेल्यावर झाकण ठेवून.. 20 मिनिटे मंद आचेवर ठेवावे...
तुमची घरच्या घरी छानशी बिर्याणी तयार.. यातील मसाल्याचे प्रमाण मर्यादित असल्यामुळे लहानांपासून मोठे आवडीने खातात. यासोबत छानसे काकडी, कांदा, टोमॅटोची दही टाकून कोशिंबीर आणि पापड मस्त लागते..
तर नक्की करून बघा..