विणा

वीणाचे स्वप्न


गोष्ट छोटी डोंगराएवढी

नवे स्वप्न नवी आशा

विणा

एका मोठ्या पटांगणावर कार्यक्रम सुरू होता . तिच्या घरातले सर्वजण ,मित्र-मैत्रिणी समोर बसून आनंद घेत होते . पटांगण पूर्ण प्रेक्षकांनी भरलेले होते .

ढोलकवर सुरेख लयबद्ध हात पडत होते , मधूनच बासरीचे सुंदर सूर निघत होते . कँसिओवर बोट नाचून छान साथ देत होती . जोडीला गिटारची साथही होती .

गाण सुरू होत ….

पल भर ठहर जाओ
दिल ये संभल जाए कैसे रोका करू
मेरी तरफ आता हर गम फिसल जाए
आँखो मे भरु बिन बोले
बाते तुमसे बाते तुमसे करु
अगर तुम साथ हो अगर तुम साथ हो

आणि …

वीणा तिची सुंदर विणावादन करत होती .

पांढरी काठपदराची साडी हाता मध्ये विणा ,देवी सरस्वती वाटत होती .

" मम्मा मम्मा उठ आठ वाजलेत ." छोटी सुचिता तिच्या मम्मीला उठवत होती .

वीणा : " झोप ग बाळा आज रविवार आहे . मी सुंदर सुंदर स्वप्न बघत होती . "

सुचिता : " स्वप्न म्हणजे ? "

वीणा : " ड्रीम "

सूचिता : " मम्मा तु ड्रीम मधे काय बघीतल ? "

वीणा : " मी ना छान एका कार्यक्रमामधे विणावादन करत होते ."

सुचिता : " मम्मा तुला विणा वाजवता येते का ?

वीणा : " नाही ."

सुचिता : " मग तुला आवडत असेल तर क्लासला जा ."

तेवढ्यात सुचिताचे पप्पा येतात . आणि बाहेर जाण्याच ठरत .

आज रविवार असल्याने वीणा , मुलगी सुचिता आणि सुचिताचे पप्पा फुलांचा शो बघून ,बाहेर फिरून रात्री घरी आले होते .

रात्री झोपताना वीणाला सकाळच्या स्वप्नाची आठवण होते .

वीणाला गाण्याची , संगीताचे वाद्य शिकण्याची खुप आवड होती , पण काही कारणामुळे शिकता आल नव्हत . वीणा लग्नाच्या आधीपासूनच नोकरी करत होती . सुचिताचा जन्म झाल्यावर वीणाने नोकरी सोडली होती . सुचिता लहान असताना वीणाचा वेळ तिच्याभोवती निघून जात होता . सुचिता आता शाळेत जायला लागली होती . सुचिता शाळेत गेल्यावरचा वेळ जाता जात नव्हता . आता वीणा जवळ वेळही होता .

सकाळच्या पडलेल्या स्वप्नाने वीणाला एक नवीन आशा मिळाली होती . 

वीणाला आशा होती तीच मोठ्या कार्यक्रमात विणावादन करण्याच  स्वप्न तिची आवड नक्की पूर्ण होईल .


Veena