Jan 26, 2022
प्रेम

वेड्या मना एक प्रेमकथा भाग 4

Read Later
वेड्या मना एक प्रेमकथा भाग 4

आपण मागच्या भागात पाहिले की अमर सिमरनला भेटायला बोलावलेल असतो. आयेशा कशीबशी निशाला तयार करते. निशा शनिवारी अमरला भेटायला जाणार असते.

शेवटी शनिवारचा दिवस उजाडला. अमर सकाळी लवकरच उठला आणि ऑफिसला लवकरच गेला कारण त्याला आज सिमरनला भेटायचं होतं. त्याच ऑफिस हाफ डे होत आणि ते दोघे चार वाजता भेटणार होते.


ऑफिस सुटल्यावर अमर त्याठिकाणी गेला पण अजून सिमरन आली नव्हती. त्याला ती येईल की नाही याची शंका वाटू लागली. तो फोन करणार इतक्यात निशा आली. तिने लाल कलरचा ड्रेस घातला होता. केस मोकळे सोडले होते आणि कानातले लांब असे डूल घातले होते. ती खूप सुंदर दिसत होती. अमर तर तिच्याकडेच पहात बसला. त्याला काय बोलावे तेच कळेना. एक स्वप्न सुंदरी आपल्या पुढे आहे याचा त्याला विश्वासच बसेना.


इतक्यात निशा जवळ येऊन "हॅलो" म्हणाली.


मग झोपेतून जागा झाल्याप्रमाणे तो "हाय" म्हणाला.


"बोल का बोलावलंस भेटायला?" निशा.


"काही नाही सहजच." अमर.


थोडा वेळ दोघेही बोलत बसले. "हा तितका वाईट नाही आणि इतर मुलांप्रमाणे तर मुळीच नाही. याच्यात काही तरी खास आहे जे मला याच्याकडे ओढत आहे." निशा मनात विचार करत असते.इतक्यात अमर, "आपण लाॅन्ग ड्राईव्हला जाऊया काय?"


"पण कुठे?" निशा.


"जिथे वाट दिसेल तिकडे" अमर.


"पण मला वेळेत घरी जावं लागेल. वेळ करून चालणार नाही." निशा."आपण वेळेत येऊ चालेल." अमर."बरं चल मग." निशा. असे म्हणून ते दोघे जातात.


ते जात असतानाच एक वाॅटर पार्क लागतं. अमर लगेच म्हणतो "आपण जाऊया खूप मज्जा येईल."


"अरे पण बदलायला कपडे कोठे आहेत?" निशा.


"चल आपण त्या दुकानातून ड्रेस घेऊया." अमर.


"चालेल चल" निशा. असे म्हणून दोघेही तेथे असलेल्या एका दुकानात जातात. निशा एक ड्रेस सिलेक्ट करून अमरला दाखवतो. अमर इशारानेच येस असे म्हणतो. अमर पण फाॅर्मल ड्रेस मध्येच असतो म्हणून तो स्वतःला टी शर्ट घेतो आणि तिथेच चेंज करतो.त्याला त्या शर्ट मध्ये बघून निशा त्याच्याकडेच पाहत होती. तिला कळेना ती मनात "यार काय खलास दिसतोय हा. मी उगाच याला भाव देत नव्हते. याचा स्वभाव पण छान आहे. असाच लाईफ पार्टनर हवा."


दोघेही वाॅटर पार्ककडे जातात. तेथे दोघेही पाण्यात मस्त नाचतात. त्यादिवशी तेथे खूपच गर्दी झाली होती आणि निशा नाचताना तिचा पाय घसरून ती पडणार इतक्यात अमर तिला धरतो. ती एकदम अमरच्या मिठीत जाते आणि काही वेळ ते दोघे तसेच राहतात. निशाचे सौंदर्य त्या ओल्या कपड्यामध्ये खूपच खुलून दिसत होते. ते ओले मोकळे केस आणि अंगाबरोबर असणारा तो ड्रेस अमरला तर भुरळच पडली जणू. काय ते सौंदर्य? जणू स्वर्गातील अप्सराच.


निशाला आता अमर आवडू लागला होता. अमर तर आधीपासूनच तिच्या प्रेमात होता. त्या दोघांनाही तो दिवस संपू नये असंच वाटतं होत. पण काय करणार जावं तर लागणारच ना. ते दोघेही ड्रेस बदलून घरी जायला निघाले. अमर निशाला सोडून मग घरी जाणार होता.

घरी गेल्यावर दोघेही स्वप्नांच्या दुनियेतच होते. सारखं एकमेकांच्या विचारातच होते. त्यांना रात्री झोप लागेना. पण उद्या म्हणजेच रविवारी परत भेटणार म्हणून आणखीनच खूश होते.आज रविवार अमर थोडा उशीराच उठला कारण रात्री सिमरनच्या विचाराने त्याला लवकर झोपच लागली नाही. आज तो आयेशा आणि निशाला प्रमोशनची पार्टी देणार होता. अमर सगळी आवराआवर करून बसला होता. इतक्यात त्याला सिमरनचा मेसेज आला "हॅलो लक्षात आहे ना?"


अमर "हो आज पार्टी"


"गुड चल मग संध्याकाळी भेटू." सिमरन म्हणून आयेशा बोलते.


"ओके" अमर


संध्याकाळी अमर ठरलेल्या ठिकाणी अगदी वेळेच्या आधीच पोहोचला. आयेशा आणि निशा पण अगदी वेळेत आल्या. आयेशा अमरला बघून "काय हॅण्डसम दिसतोय हा? अगदी हिरोच. हा टी शर्ट पण किती खुलून दिसत आहे याला." असा मनात विचार करत असते.


त्या दोघी आल्यावर अमरचे लक्ष फक्त निशावरच होते. त्याची नजरच हटेना. तो तिच्याकडेच पाहत होता. ती पण सुंदरच दिसत होती म्हणा. तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. केस मोकळे सोडले होते. गालावर येणारी ती बट आहाहाऽऽऽ काय ते रूप? अगदी अप्सराच. कोणीही तिला पाहिले की तिच्या प्रेमात पडेल.


त्या दोघी ठरलेल्या टेबलवर अमर जवळ येऊन बसल्या. थोडे बोलणे झाल्यावर वेटर ऑर्डर घ्यायला आला.


"घ्या मॅडम मेनू कार्ड आणि करा ऑर्डर." निशाकडे मेनूकार्ड देत अमर म्हणाला.


निशा "अरे तुझ्या आवडीचं काही तरी मागव तसही तू पार्टी देणार आहेस."


"तुम्हीच सांगा. जे पाहिजे ते ऑर्डर करा." अमर.


मग निशा मेनूकार्ड बघत पनीर टिक्का भाजी ऑर्डर केली "मी एक ऑर्डर केली आता तुम्ही करा." असे म्हणत मेनूकार्ड पुढे केली.


"मला पनीरची अॅलर्जी आहे हे हिला माहित असूनही हिने ही भाजी का ऑर्डर केली?" अमर मनात विचार करत असतो इतक्यात आयेशा "मी एक सांगते" असं म्हणून मेनूकार्ड घेते.


आयेशा काजू करी आणि स्टर्टरला मंचाव सूप ऑर्डर करते. "अरे हिने तर माझ्या आवडीचा मेनू ऑर्डर केला. हा काय प्रकार आहे? मला तर काहीच कळेना." असा विचार अमर करत होता.


इतक्यात निशा अमरला ऑर्डर दे म्हणून सांगते आणि दोघी गप्पा मारत बसतात. अमर मात्र विचारातच असतो. तिघेही जेवण करून जायला निघतात. निशा अमरला म्हणते "मला तुला काही तरी सांगायच आहे?"


अमर "बोल ना"


निशा "आता नाही पण एक दिवस नक्की सांगेन."


"तुला जेव्हा सांगायच असेल तेव्हा सांग माझी काहीच गडबड नाही." अमर.


तिघेही जातात. पण अमरच्या मनातून विचार जातच नव्हता की "असे कसे होऊ शकते मी मनातल एकीला शेअर केल आणि दुसरी मला भेटते असे नाही ना झाले? छे असे कसे होईल? पण याचा मग आज मला काहीतरी विचीत्रच वाटलं दोघींना भेटून."


अमर घरी आला आणि झोपी गेला कारण त्याला उद्या लवकर ऑफिसमध्ये बोलावल होत. दुसर्या दिवशी म्हणजे सोमवारी अमर लवकरच ऑफिसला गेला. ऑफिसमध्ये गेल्यावर सरांनी त्याला केबिनमध्ये बोलावलं.


"मे आय कम इन सर." अमर.


"येस कम इन." सर.


"सर तुम्ही मला बोलावलंत." अमर.


"होय, मिस्टर अमर तुम्हाला आजपासून नव्या ऑफिसमध्ये जाॅईन व्हायचं आहे. तुमचं प्रमोशन झालेल्या ठिकाणी तुमची आजपासून ड्युटी चालू. सो ऑल द बेस्ट." सर.


"थॅन्क्यू सर अॅण्ड मिस यू सर." अमर.


"मिस यू टू. तुम्ही एक खूप टॅलेंटेड पर्सन आहात. आय एम प्राऊड ऑफ यू." सर.


"थॅन्क्यू सर" अमर. मग बाहेर येऊन अमरने सगळ्या सामानाची आवराआवर करून सगळ्यांचा निरोप घेऊन नविन ऑफिसला गेला. तिथेच सिमरनचा रेडिओ स्टेशन होता पण तेथे गेला नाही. "संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर जाऊ." असा मनात विचार केला.


नविन ऑफिसमध्ये अमरच जल्लोषी स्वागत झाले. मग त्याने लगेचच कामाला सुरुवात केली. ऑफिस सुटल्यावर अमर सिमरनच्या रेडिओ स्टेशनला आला आणि "सिमरनचा शो चालू आहे. जाऊन बघूया का? कोण करत आहे तो शो? निशाच आहे की आणखी कोण? नको पण संशय घेतल्यासारख होईल. पण तिला भेटायचच आहे ना मग काय होतंय जायला? चल अमर आत. भेटूया, बघूया काय होतंय ते?" असे म्हणून अमर आत गेला.


सिमरनचा शो सुरू असतो. दार उघडच असत आणि तिथे कुणीही नसत. अमर आरामात आत जातो आणि पाहतो तर काय? त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. त्याला काय करावे कळेना? तो तसाच बाहेर येतो.


आता यापुढील भाग पुढच्या लेखात पाहू.

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..