वेड्या मना एक प्रेमकथा भाग 3

Marathi love story

आपण मागच्या भागात पाहिले की अमरला प्रमोशन मिळाले होते आणि तो ते सिमरनला सांगणार होता पण कसे? तिला नंबर दिला होता पण तिने याला मेसेज, फोन काहीच केले नाही म्हणून अमर नर्वस होता.


इकडे आयेशा निशा सांगत होती "ए निशू अगं तो काल भेटलेला अमर. त्याला एक मेसेज तर कर ना ग. उगाच वाट बघत बसला असेल."


निशा "बसला तर बसू दे मी काही त्याला मेसेज, फोन काहीही करणार नाही.""अगं पण का? बिचारा किती आशेने नंबर दिला आहे त्याने." आयेशा."ए बिचारा वगैरे काही नाही ह आणि तुला का ग एवढा पुळका येतोय त्याचा? काय प्रेमात बिमात पडलीस काय त्याच्या?" निशा चेष्टेत म्हणते."तसे काही नाही. बिचारा वाट बघत असेल म्हणून मी सहज म्हणाले." आयेशा.


"बरं मग माझ्या वतीने तू बोल त्याच्याशी." निशा.


"मीऽऽ अगं कळणार ना त्याला." आयेशा.


"अगं ए कस कळेल? ना त्याच्याकडे तुझा नंबर ना माझा. तो फक्त सिमरनच्या प्रेमात आहे आणि तू सिमरन म्हणून बोल. त्यात काय एवढं आणि तुलाच त्याची काळजी वाटत आहे ना मग बोल तूच मला काही वेळ नाही." निशा.


आयेशा खूप खूश झाली. कारण तिला अमर सोबत किमान मेसेजवर तरी बोलता येईल. अजून शो ला एक तास होता आणि ती अमरशी बोलण्यास खूप उत्सुक होती म्हणून क्षणाचाही विलंब न करता ती लगेच अमरला मेसेज करते."हाय" आयेशा."मी सिमरन. वेड्या मना या शो मधली." परत आयेशा.


"हॅलो" लगेच रिप्लाय येतो कारण अमर सकाळ पासून त्या मेसेजची वाट पाहत असतो.


"नुसता सिमरन म्हटलं तरी लगेच ओळखलो असतो." परत अमर.


"मला एक गुड न्यूज सांगायची आहे." अमर.


"बोल काय आहे गुड न्यूज" आयेशा.


"मला प्रमोशन मिळाले आहे." अमर.


"वाव ही तर खूपच चांगली बातमी आहे. पार्टी तो बनती है." आयेशा.


"हो हो कधीही" अमर.


"मग या संडेला आम्हा दोघींना पार्टी पाहिजे." आयेशा.


"जशी तुमची आज्ञा." अमर."बर चल माझा शो आहे आता. मला तयारी करावी लागेल." आयेशा.


"बर बाय. मी रात्री मेसेज करतो." अमर.


"ओके बाय." आयेशा.


दोघेही खूपच खूश असतात. आता सिमरनचा शो सुरू होतो आणि अमर रेडिओ चालू करतो.
सिमरन "नमस्कार, सर्वांना शुभ संध्याकाळ मी सिमरन घेऊन आली आहे तुमचा आवडता शो ज्याच नाव आहे 'वेड्या मना'. तर आपला आजचा विषय आहे प्रेम. तर प्रेम म्हणजे काय?
प्रेम म्हणजे निरागसता
प्रेम म्हणजे विश्वास
प्रेम म्हणजे आपुलकी
प्रेम म्हणजे दोन जीव
प्रेम म्हणजे मनाचे नाते
प्रेम म्हणजे एक पासून दुसर्या मनापर्यंत
प्रेम म्हणजे राधा आणि कृष्ण
प्रेम म्हणजे मीरा आणि कृष्ण
प्रेम म्हणजे दोन जीवांची मिलन

प्रेमाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते पण भावना एकच. कारण कुणीतरी म्हटलं आहे की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं.


तर या प्रेमाच्या मैफिलीत आपण ऐकूया एक सुंदर रोमँटीक गाणं
रंग बावर्या स्वप्नांना....
सांगा रे सांगा......
कुंद कळ्यांना....वेलींना
सांगा रे सांगा......
हे भास होती कसे...
हे नाव ओठी कुणाचे...
का सांग वेड्या मना....
मला भान नाही जगाचे....
मला वेड लागले प्रेमाचे......इतकं सगळं ऐकून अमरला खूप भारी वाटलं. त्याला जाणीव झाली की हे सगळं नक्कीच माझ्यासाठी असणार. तो आता फक्त तिचाच विचार करत होता. त्याला रात्री झोप लागेना. "तिला परत मेसेज करावा का?" असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. "पण नको तिला काहीतरी वाटेल." म्हणून गप्प बसला.


शेवटी न राहवून तो तिला मेसेज करतो.
"हाय झोपलीस काय?"


"नाही रे अजून. बोल ना" आयेशा.


"काही नाही आजचा शो छान झाला." अमर."हे सांगायला तू मेसेज केलास?" आयेशा."अगं नाही ग. मला तुझा आवाज खूप आवडतो हे सांगायच होत." अमर.


"थॅन्क्यू" आयेशा."मला ते गाणं खूप आवडतं. तुला कोणतं गाणं आवडतं." अमर.


"मला रोमँटीक गाणी खूप आवडतात." आयेशा.


"वाव म्हणजे तू रोमँटीक आहेस." अमर.


"कशावरून?" आयेशा.


"नाही एक अंदाज." अमर.


"हममम" आयेशा.


असे करून दोघेही रात्री वेळेपर्यंत मेसेज करत बसले. एकमेकांच्या आवडीनिवडी, आवडता रंग, आवडतं जेवन, आवडता खेळ, आवडता सिनेमा, आवडता ड्रेस पासून आवडती मैञिण पर्यंत सगळं शेयर केलं.


नंतर अमर विचारतो "सिमरन आपण शनिवारी भेटूया काय?"


"अरे रविवारी तू पार्टी देणार आहेस ना तेव्हाच भेटू की." आयेशा.


"तेव्हा तू आणि तूझी मैञिण दोघी असणार. मला फक्त तुला एकटीलाच भेटायचं आहे. प्लीज नाही म्हणू नकोस." अमर.


"अरे पण काही महत्त्वाचे आहे काय?" आयेशा."अगं सहजच. पण आपण एकत्र थोडा वेळ घालवूया की." अमर.


आयेशाला खूप वाईट वाटते आणि तसही निशाला विचारावं लागणार. कारण ती निशा म्हणून बोलतं होती. आयेशा मनात म्हणाली, "हे देवा मला कसल्या पेचात पाडला आहेस? चूक माझीच आहे म्हण. मी स्वतःच्या पायावर स्वतः कुर्हाड मारून घेतली आहे. काय करावे काहीच सुचेना?"तेवढ्यात अमर "हॅलो सांग ना. भेटायचं ना आपण."


"मी तुला नंतर सांगते. बर चल आता बंद करते. खूप उशीर झाला आहे. बाय." आयेशा.


"होय ग जरा कमी आता पहाटच होईल. चल बाय." अमर.आयेशाला झोप लागेना. निशाला कस सांगायच? ती तयार होईल काय? नाही झाली तर? अमरला सगळं समजलं तर? पुढे काय करायच? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते. त्यामुळे तिला झोपच लागेना. परत ती मनात "निशूला विचारू काय? पण आता ती झोपली असेल. उद्या सकाळी विचारते." म्हणून झोपण्याचा प्रयत्न करते.


दुसर्या दिवशी आयेशा निशाला रात्री घडलेला सगळा प्रकार सांगते. निशा आयेशाला ओरडते. "अगं काय हे तरी मी सांगत होते मेसेज करू नकोस. आता मी नाही जाणार भेटायला. का म्हणून जाऊ मी?"


"निशू प्लिज ग. ऐक ना जरा. फक्त एकदाच जा. मी परत नाही सांगणार." आयेशा.


"काय कटकट आहे ही नुसती. निशा.


"प्लीज ग. माझ्यासाठी." आयेशा.


"मला काम आहे. मला काही वेळ नाहीये." निशा."अगं तुझ काम मी करेन. प्लीज आपल्या मैत्रीसाठी एवढं तरी कर." आयेशा.


"एवढा का ग पुळका तुला त्याचा. काय प्रेमात पडलीस का काय?" निशा.


"ए तस काही नाही. तू फक्त जा बरं का? बाकीच मी बघून घेईन." निशा.


नाही होय करत करत शेवटी निशा कशीबशी तयार झाली. मग आयेशा अमरला मेसेज करून सांगते की "ती त्याला शनिवारी भेटायला तयार आहे. मग पत्ता मेसेज करून सांग कोठे भेटायचे ते?"
अमर खूप खूश होतो. तो आता शनिवारची वाट बघत असतो.
आता शनिवारी काय होतंय ते बघूया.


आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.


🎭 Series Post

View all