वेड्या मना एक प्रेमकथा भाग 2

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की अमर हा ऑफिस मिटींगसाठी गेलेला असतो आणि त्याच ठिकाणी सिमरनचा शो असलेला रेडिओ स्टेशन असतो. ती वेळ शो संपण्याची असल्याने अमर धावत पळत तेथे पोहोचतो. आता पुढे....


अमर केबिनपाशी आला तेवढ्यात आतून दोन लेडीज बाहेर येतात. त्यातील एक खूप सुंदर दिसत होती. तिचे केस मऊ मुलायम होते. रंग गोरा, काळेभोर केस अगदी एखाद्या परीसारखीच होती ती आणि दुसरी सावळ्या रंगाची पण निरागस, नाका डोळ्यांनी रेखीव होती. त्या दोघी याच्या जवळून गेल्या. पण याला कळेना यातील सिमरन कोण? तो मनात “ही सुंदर परीच सिमरन असावी.” असे म्हणून तो त्यांच्या मागे जातो.


“एक्सक्यूज मी.” अमर.


त्यातील एक म्हणजे जी सुंदर होती ती “येस”.


“वेड्या मना हा सिमरनचा शो झाला का?” अमर.


परत तिच मुलगी “हो आम्ही आताच तो शो करून आलो आहोत.”


“ओह मला तुमचा तो शो खूप आवडतो. मी तुमच्या प्रेमात पडलो आहे.” अमर.


“हॅलो काय बोलताय तुम्ही?” तिच मुलगी.


“साॅरी म्हणजे तुमच्या शोच्या अस मला म्हणायचं होतं.” अमर.


“ओके थँक्यू.” असे म्हणून त्या दोघी जाऊ लागतात.


परत अमर “अरे थांबा की”


तिच मुलगी “का?”


“ओळख करून घ्यायची होती. हाय मी अमर. अमर देशमुख. तुम्हाला भेटायचं होत एकदा. मी तुमचा शो न चुकता ऐकत असतो. मला तुमचा आवाज खूप आवडतो. तुम्ही तुमची ओळख सांगितली तर खूप बरे होईल.” अमर.


“ओके तसा तू बरा वाटतोस. मी निशा आणि ही माझी मैत्रीण आयेशा.” परत तिच मुलगी म्हणाली म्हणजेच निशा म्हणाली. (जी दिसायला सुंदर होती.)


“फ्रेण्डस्” म्हणून अमरने निशाच्या पुढे हात केला.


अमर दिसायला उंच, देखणा आणि रूबाबदार होता. अगदी कोणीही बघितलं की त्याच्या प्रेमात पडेल. मग या दोघी काही वेगळ्या नव्हत्या. लगेच त्यांनी पण होकार दिला.


मग अमर "तुमचा नंबर देता का?"


निशा "कशाला? सारखं पिडायला "


"नाही ते सहज" अमर.


"अगं दे की काही प्रोब्लेम येणार नाही." आयेशा.


"अहो मी तसा मुलगा नाही बरं का? मी सहजच मागितला. द्यायचं असेल तर द्या नाहीतर राहू दे. माझा तर नंबर घ्या कधी वाटलं तर फोन करा." अमर.


"बरं द्या" म्हणत आयेशाने त्याचा नंबर घेतला.


मग अमर घरी जायला निघाला. आज तो खूप खूश होता कारण त्याच्या स्वप्नातली परी आज त्याला भेटली होती. आता हा आनंद कोणासोबत शेअर करायचे असा विचार करताच त्याला दिशा आठवली. तो लगेच तिला फोन केला.


"हॅलो दिशू." अमर.


"अरे आज चक्क दिशू. स्वारी एकदम खुशीत दिसतेय. प्रेझेंटेशन सक्सेस झालेल दिसतंय." दिशा.


"अगं तस काही नाही." अमर.


"मग कसं आऽऽ बोल की" दिशा.


"अगं ए अंबाबाई बोलू तर दे मला." अमर.


"ओके सांग." दिशा.


"आज माझी मिटींग झाली आणि मी घरी येत होतो तेव्हा मला समोरच रेडिओ स्टेशन दिसलं." अमर.


"इतकंच ना मग त्यात काय एवढं. मला तर रोजच दिसत आमच्या इथलं." दिशा.


"ए वेडे अगं सिमरनच रेडिओ स्टेशन." अमर.


"आई शप्पथ भारी की रे मग काय जाऊन आलास की नाही." दिशा.


"हो आणि भेटलो सुध्दा. खूप सुंदर आहे गं ती." अमर.


"अरे वाह मग काय आज झोप लागणार नाही म्हणा." दिशा.


"अगं मला खूप भारी वाटतंय. जसे की अप्सराच मला भेटली आहे. बरं चल मी जातो बाय." अमर.


"हो रे बाय आणि शिस्तीत जा नाही तर आनंदाच्या भरात गाडी शंभरच्या स्पीडने नेशील." दिशा.


"हो ग माझी आई शिस्तीत जातो." असे म्हणून अमर घरी जातो.


घरी आल्यावर अमर हा अमर राहिलाच नव्हता. तो एका वेगळ्याच दुनियेत गेला होता. त्याच अजिबात लक्ष नव्हतं. त्याची आई त्याला कासीतरी विचारत होती पण हा आपल्याच दुनियेत.


मग आईने त्याला हलवलं "अरे अमर काय झालं? असा काय करत आहेस? कोणतं टेन्शन आलंय?"


अमर अगदी झोपेतून उठल्यासारखा "हा काय झालं आई तू अशी का ओरडतेस?"


"अरे कधीची तुला हाका मारत आहे? तुझं लक्ष कुठेय? आणि आज इतका का उशीर?" अमरची आई.


"अगं आज मला सिमरन भेटली." अमर.


"अरे काय? कधी? आणि कुठे?" अमरची आई.


"अगं हो आई सांगतो थांब जरा श्वास तरी घे." अमर.


"बरं, कशी आहे रे ती आणि लग्न वगैरे झाल नाही ना?" अमरची आई.


"लग्न नाही झालं आई, आणि खूपच सुंदर आहे. अगदी परीकथेच्या सिमरन सारखी. गोरी पान, सडपातळ, तिचे काळेभोर केस, चेहर्यावर येणारी एक लहानशी बट. काय तिचं सौंदर्य? मी आणखीनच तिच्या प्रेमात पडलो." अमर.


"अरे वा इतकी सुंदर आहे ती. मग काय तू प्रेमात पडणारच. आवाज इतका चांगला त्यात ह्या सौंदर्याची भर. देवाची देणगी दुसरं काय?"


सिमरनला भेटल्यापासून अमर तिचाच विचार करत होता. त्याला रात्री झोप लागेना समोर फक्त सिमरनच दिसत होती. "काय यार नंबर दिला असता तर निदान मेसेज तर केला असता आता काय मॅडम कधी करतील? याचीच वाट पहायची." तो मनात म्हणाला.


इकडे आयेशाची पण तिच गत झाली होती. ती जेव्हा पासून अमरला भेटली होती तिच्या मनातून तो जातच नव्हता. अस तिला पहिल्यांदाच होत होतं. पण परत ती मनात विचार करते "माझा कलर तर सावळा आहे आणि तो आपल्याशी कोठे बोलला आहे. तो तर निशू बरोबर बोलला आहे. म्हणजे हा इतर मुलांप्रमाणे गोरा रंग असलेल्या मुलीच्या प्रेमात पडणार. जाऊ दे आयेशा तो आपल्यासाठी नाही. उगाच त्याचा विचार करू नकोस. पण माझं मन का सारखं त्याचाच विचार करत आहे." असे म्हणून ती झोपून जाते.


सकाळी सगळं आवरून अमर ऑफिसला जायची तयारी करतो. रात्री सिमरनच्या विचाराने त्याला लवकर झोपच लागली नाही. त्यामुळे उठायला उशीर झाला आणि मग ऑफिसला उशीर होईल म्हणून ही गडबड सुरू होती. पण शेवटी उशीर हा झालाच.


"शिट्ऽऽ आज उशीर झालाच. सरांची बोलणी खायला लागणार. काय मी पण तिच्या प्रेमात आहे आणि तिला माझ्याविषयी काही वाटतं नसेल तर? एकतर्फी प्रेमाचा काय उपयोग? अरे अमर बास आता ऑफिसला चल लवकर नाहीतर बाॅस चिडतील. त्यात कालच्या मिटींग बद्दल काय झालंय काय माहीत?" असा मनात विचार करत तो ऑफिसला जातो.


ऑफिसमध्ये गेल्यावर सगळे त्याच्याकडे बघत असतात. त्याला खूप गिल्टी वाटत होतं.

इतक्यात दिशा येते आणि म्हणते "अरे किती उशीर केलास? सर चिडलेत वाटतं. तुला त्यांनी बोलावलंय. आवर जा लवकर नाहीतर ओरडा खाशील."


तेवढ्यात शिपाई मामा पण सांगत आले की अमरला सरांनी बोलावल आहे म्हणून. मग अमर सरांच्या केबिनमध्ये गेला.


"मे आय कम इन सर." अमर.


"येस" सर.


"सर तुम्ही मला बोलावलं?" अमर.


"मिस्टर अमर, मला सांगा कालच्या मिटींग बद्दल तुम्हाला काय वाटलं?" सर.


"म्हणजे सर" अमर.


"म्हणजे तुम्हाला ती पार्टी कशी वाटली. त्यांच्या बरोबर काम करायला तुम्हाला आवडेल का?" सर.


"हो का नाही आवडणार सर. ती पार्टी खूप चांगली होती आणि त्यांची काम करण्याची पद्धत खूप सोपी आणि सरळ होती." अमर.


"दॅट्स गुड. मग त्या पार्टीला तुमचं प्रेझेंटेशन खूप आवडलेल आहे आणि ते तुमच्या सोबत काम करणार आहेत." सर.


"काय? वाव दॅट्स ग्रेट न्यूज. मला खूप आनंद झालाय सर." अमर.


"अहो पुढे ऐका तर. आम्ही तुमच प्रमोशन केलेल आहे. काल जिथे मिटींग झाली त्या ब्रॅन्चचे तुम्ही मॅनेजर म्हणून पोस्ट मिळाली आहे." सर.


"थॅन्क्यू सो मच सर." अमर.


"बर इथली कामं आवरा मग तिकडे जाॅईन व्हा. मी सांगेनच तुम्हाला." सर.


"ओके सर अॅण्ड थॅक्स." अमर. असे म्हणून अमर बाहेर जातो. एव्हाना सगळ्यांना ही गोष्ट समजली होती. कौतुक सोहळा झाल्यावर दिशा आली आणि अमरला म्हणाली "काय मग एका मागून एक आश्चर्याचे धक्के देत आहात मॅनेजर साहेब. आता काय तिथल्या तिथे म्हणजे रोजच भेटणार वाटतं तुमच्या सिमरनला. आम्हाला लग्नाला बोलवा म्हणजे झालं.""अगं अजून कशात काही नाही आणि तुझं काय चाललंय? काल नंबर दिलाय आणि अजून फोन राहू दे साधा गुड माॅर्निंग म्हणून मेसेज पण नाही? अस कुणी असतं का? एखादा आपली वाट पाहत असेल इतकही समजू नये. का तिला माझ्याविषयी काही वाटतं नसेल आणि मी उगाच स्वप्न रंगवत आहे. की तिच्या मनात दुसरा कोणी असेल? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात येत आहेत. सांग ना दिशा मी काय करू?" अमर.


"ओय मजनू तू इतका का विचार करत आहेस? अरे ती एक मुलगी आहे आणि मुली लगेच अस कोणाला फोन किंवा मेसेज करत नाहीत. अरे मुलाने केला तरी लवकर रिस्पॉन्स देत नाहीत आणि ती तर सिमरन आहे ती लगेच का बर तुला फोन करेल? तिला तू थोडा वेळ दे. बघ नक्की ती तुला साधा मेसेज तरी करेल आणि केली नाही तर आता तू तेथेच जाॅईन होत आहेस तर तिला भेट आणि विचार. इतका मूड ऑफ होऊ नकोस तुझं प्रमोशन झालंय. जस्ट चिल. एक स्माईल दे बघू." दिशा अमरला समजावते.


मग अमर पण थोडा रिलॅक्स होतो आणि असा विचार करायचा सोडून देतो. ऑफिसमधील काम आवरून घरी येतो. येताना एक पेढ्याचा बाॅक्स घेऊन येतो आणि आईच्या हातात देतो.


"काय रे लग्न बिग्न ठरवून आलायस काय?" अमरची आई.


"आई काही तरीच काय ग आणि तुला न सांगता मी अस करेन का?" अमर.


"अरे तस नाही. ती सिमरन भेटल्यापासून तू आमचा राहिलाच नाहीस म्हणून." अमरची आई.


"आई बास ना आता." अमर.


"अरे थोडी गंमत केली. ह सांग पेढे कशाबद्दल?" अमरची आई.


"अगं आई मला प्रमोशन मिळालं आहे आणि तेही सिमरनच्या ऑफिस जवळ." अमर.


"घ्या म्हणजे सोने पे सुहागा. आता नोकरी पक्की आणि छोकरी पण." अमरची आई.


"अगं आई बघू. तिला एकदाच भेटलोय तिच्या मनातलं कळायला पाहिजे ग." अमर.


"होईल रे सगळं व्यवस्थित तू काळजी करू नकोस. जा तिचा शो तासाभरात चालू होईल. तेव्हा तू काही ऐकून घेत नाहीस. आता जेवण बनवते जेव मग ऐकत बस." अमरची आई.


"येस बाॅस. तुमचं ऐकायलाच पाहिजे."अमर.


आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.
🎭 Series Post

View all