Dec 06, 2021
Poem

वेड्या आठवणी

Read Later
वेड्या आठवणी

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

वेड्या आठवणी, आणि वेडा हा ध्यास,

हृदयाची धडधड, आणि वेडा हा श्वास.

हरवलेल्या रात्री, आणि रात्रीत हरवलेलं हे मन,

उगाच तुझी चाहूल, आणि उगाच तुझा आभास.

पावसाच्या सरी, आणि डोळ्यातला पाऊस,

हळवे हे क्षण, आणि तुझ्या भेटीची आस.

वेडे सगळें स्वप्नं, आणि स्वप्नात तुझं येणं,

तुझ्या साठी रंगवलेल्या दिव्यांची आरास.

जग आपलं वेगळं, आणि वेगळ्या ह्या गोष्टी,

वेगळी ही धरती, आणि वेगळा आपला आकाश.

 

 

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Renuka Raje

Teacher, writer

I have exceptional knowledge of Hindi and Marathi languages with excellent communication skills. I love writing poetry, stories, quotes and articles in Hindi and Marathi languages.