वटपौर्णिमा स्पेशल
सध्या सगळ्या सिरियल मध्ये वटपौर्णिमा स्पेशल एपिसोड चालू आहे. कुठे पूजेत विघ्न आणण्याचा प्रयत्न केला जात आहे ,तर कुठे नवरा बायकोचं प्रेम दाखवलं जात आहे ,कुठे एकतर्फी प्रेम आहे ,असे वेगवगळे प्रकार चालू आहे. आपण एखादी सिरियल नियमित पणे पाहत असाल ,तर आपण त्या पात्रांना आपल्यात पाहण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांच अनुसरण करण्याचा प्रयत्न करतो. असच एक छोटा किस्सा.
ठरलं तर मग सिरियल नवरा बायको दोघे बघत असतात.
सिरियल मध्ये अर्जुन सायली बरोबर वडाची पूजा करत असतो, हे पाहून बायको नवऱ्याकडे पाहत असते. नवऱ्याच्या थोड्या वेळाने लक्षात येतं आणि तो भुवई उंचवून विचारतो,काय झालं असं काय पाहतेय. झालं एवढं ऐकून बिचारी रडायला लागली, हे पाहून नवरा गोंधळला आणि त्याने विचारलं,काय झालं एवढं रडायला. बायको रडत रडत म्हणाली,माझं मेलीचं कुठलं आलंय,एवढं मोठ नशीब सायली सारखं,तुम्ही माझ्या बरोबर पूजा करणं तर दूरच ,पण साधं,तू छान दिसतेस, असं सुध्दा म्हणत नाही.
नवरा गोंधळला आणि म्हणाला, अगं तू शेजारच्या बायकांबरोबर मी ऑफिसला गेल्यावर पूजा करायला जातेस ना? मग तेव्हा मी कुठे घरी असतो ,तुला सांगायला. हो ,पण आल्यावर तुझा फोन बघतो की, ज्यात तुझे फोटो असतात, वेगवेगळ्या पोझ मधले ,ते पाहूनच मी नयन सुख घेत असतो,बिच्चारा मी.तू कधीच मला म्हणाली नाहीस ,की तुम्ही घरी रहा,तुला तर तुझ्या मैत्रिणींबरोबर फोटो सेशन करायचं असतं, माझ्या बरोबरचा आधी कधी तरी काढलेला फोटो स्टेटसला ठेवते , वटपौर्णिमेच्या दिवशी कधी माझ्या बरोबर साधा एक फोटो सुध्दा काढत नाहीस आणि काय म्हणते तर माझ्या दिर्घायुष्यासाठी पूजा करतेस, आता बोल कुणी रडायला पाहिजे,तू का मी ?
एवढं सगळं बोलल्यावर बायको नवऱ्या कडे स्तब्ध होऊन बघतच राहिली,काय बोलावे ते तिला सुचेना.
मग मात्र नवऱ्याने डोळा मारला आणि बोलला , ऐसे ना मुझे देखो , नहीं तो प्यार हो जायेगा.
आता तिला मात्र खूपच हसू आलं आणि लाजत म्हणाली, तुम्ही पण ना , तुम्हाला कळतच नाही, कधी काय बोलावे ते .
मग नवरा ही हसतच बोलला आणि तुला ही कळत नाही , सिरियल पाहून का रडावे ,ते सगळं थोडी खरं असतं, त्यांना ॲक्टिंग करायचे पैसे मिळतात, म्हणून ते करतात,ते त्यांच्या खऱ्या आयुष्यात बायकोशी खरंच असं वागतात का ?
काही वेगळं नसतं ग , प्रत्येकाचं आयुष्य सारखंच असतं, थोड बहुत वेगळं असतं,जे शक्य नसतं तेच सिरियल मध्ये दाखवतात, म्हणून तर तुम्ही बायका तेच पाहता. कारण जे आपल्या जवळ नसतं,ते आयुष्य आपण त्यांच्या द्वारे जगण्याचा प्रयत्न करतो,ते मात्र त्यातून पैसे कमावतात.
बरं ते जाऊ दे , खरं सांगू का,तू ना मला जशी आहे तशीच आवडते, थोडी वेंधळी, थोडी रुसणारी, थोडी हसणारी, कधी कधी काही न बोलताच डोळ्यांनीच मला समजून घेणारी,प्रत्येक गोष्टीत मला साथ देणारी,मला तुझ्या बरोबर सात जन्माचं माहीत नाही,पण हे आयुष्य मात्र आनंदात घालवायचं आहे, देशील ना माझी साथ.
तिने त्याचा हाथ हातात घेतला आणि म्हणाली,हो आणि एका जन्मासाठी नाही सात जन्मासाठी मागणार आहे ,ते पण उद्या वडाची पूजा करून, कारण उद्याच वटपौर्णिमा आहे आणि हो , उद्या सुट्टी घ्या अर्धा दिवस एक फोटो पण काढू आणि दोघे एकमेकांकडे पाहून हसायला लागले.
असं असतं नवरा बायकोचं नात आणि प्रेम.
सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.