पुर्ण चंद्र पोर्णिमेचा

Story


*पुर्ण चंद्र पोर्णिमेचा*


अबोली ला सगळ काही लाॅजिकल हवे असायचे. अबोली ला वटपौर्णिमा पटत नसायची. का कम्पल्सरी बायकांनीच उपवास करायचा❓वडाला पुजले की नवऱ्याचे आयुष्य कसे वाढणार❓अबोली ला वटपौर्णिमेचा काही गंध नव्हता.... आधुनिक विचारसरणी स्वतः ला 21 व्या शतकातील समजून मंगळसूत्र, टिकली कम्पल्सरी काही घालत, लावत नसायची.... तिच्या विचारावर ती ठाम होती. नवऱ्याचे काही म्हणणे नव्हते.


दुसरी कडे सासरच्या मंडळींची अपेक्षा असते. वडाला पुजले पाहिजे. साडी नेसावी, उपवास करावा. सावित्रीची कहाणी वर यांचा अगदीच विश्वास....


टोकाची माणसेच एकत्र आणून आयुष्यभर नांदावी आणि सात जन्म सोबत रहावीत असा योग परमेश्वर का जुळवून आणतो. काय मज्जा असेल काय महित....


अशावेळेस सुवर्णमध्य म्हणजे अबोली चे सासरे अगदी मुली सारखे तिला समजवायचे. तिला यांच पटायचं.. दरवर्षी वटपौर्णिमा आली की ती का करायची आणि का नाही करायची या विचार मंथनातून या वर्षी सासऱ्यांनी गावाकडच्या घरी सगळ्यांना नेल गावाकडच्या वातावरणात सगळे निसर्गाच्या सान्निध्यात सुखावले आणि सासऱ्यांनी सहज जेवल्यावर शतपावली करत अबोली सोबत फेरफटका मारायला सुरुवात केली. थोड चालून जवळच वडाच्या पाऱ्यावर बसले. दाट, हिरवं गर्द झाड, त्याच खोड म्हणजे त्याला मिठी मारायची ठरवली तर दोन मोठी माणस मिळून मारता येणार नाही एवढे मोठे.... या मोठ्या पारंब्या मुल दिवसा खेळायचे.... पारावर झाडाच्या सावलीत बसून कित्येक मिटींग चा साक्षीदार आहे हा वड.. कित्येक वाटसरूंना सावली, गारवा, आधार या वडाने दिला.. खुप जून सासऱ्याच्याही लहानपणापासून असेच असलेले हे वडाचे झाड.... कित्येक पक्षाच्या पिढ्यानपिढ्या घरटी यावर होती....

झाडाखाली शुध्द ऑक्सिजन घेत सासऱ्यांनी हळूहळू विषयावर येण्याची सुरुवात केली.. वातावरण शुध्द ठेवण्यात वडाच्या झाडाचा वरचा नंबर लागतो. 24 तास ऑक्सिजन देते. हे वडाचे झाड कधीच पडत नाही. ते कायम ताठ, डौलाने उभे असते. याच्या पारंब्या याचा आधार असतात. या सगळ्या वैज्ञानिक गोष्टी आहेत. या वडाला जपले पाहिजे हा शुद्ध वातावरण ठेवतो. 1 दिवस याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली याला पुजले आणि यासारखे कायम ताठ उभे रहाण्याचा आशिर्वाद याच्या कडून आपल्या जोडीदारासाठी घेतला तर हा तर विज्ञानवर आधारित कृतज्ञता भाव, नम्रपणे साजरा केला आणि सगळ्याची मनही आपोआपच संभाळली चे पुण्य पदरी पडले तर काय हरकत आहे. अबोली सगळे शांतपणे ऐकत होती आणि सासरे आणि वड दोघांच्या बद्दल कृतज्ञता मनातून, आता अबोलीच्या डोळ्यांत दिसायला लागली होती.


यावर्षी गावाकडे यथासांग वटपौर्णिमा पुजा अबोली ची पार पडली. दिवसभर सजणे, पुजेची तयारी, वडाला पुजणे, शरीरासाठी 1 दिवस लंघन म्हणून तिने आज उपवास केला. दिवसभर गडबडीत गेला होता. सगळ्यांचा उत्साह, आनंदी आनंदाने सण नाहून निघाला आणि रात्री पुर्ण चंद्र पोर्णिमेचा आला मंद प्रकाशात पुर्ण कुटुंब, अबोलीच्या पुर्ण व्रताने नवर्‍याने आनंदून अबोलीला सुगंधित लाल गुलाब गुडघ्यावर येत पुर्ण कुटूंबाच्या समोर दिला. अबोली ची आनंदाने वटपौर्णिमा साजरी झाली....


*सौ. भाग्यश्री चाटी सांबरे ??*