Jan 19, 2022
नारीवादी

वाटा

Read Later
वाटा

मला माझा वाटा हवा आहे दादा..घर विकण्याचा किंवा तारण ठेवण्याचा निर्णय तू घेऊच कसा शकतो..ते काही नाही यात माझाही वाटा आहे आणि तो मला मिळायलाच पाहीचे अस म्हणून राधा निघून गेली तिथुन...
रोहित च्या डोळ्यात पाणीच जमा झाला . आज त्याची लाडकी बहीण त्याच्यावर चिडून निघून गेली होती...रुपाली त्याची बायको कोपऱ्यात उभं राहून सर्व ऐकत होती..तिला खुप राग आला होता तिच्या नणंद बाईचा.. रोहितला अस दुखावलेले तिला आवडलं नव्हतं... कारण रोहितला राधा म्हणजे त्याचा जीव की प्राण ... तिचा जीवच अडकल्या सारखं झाला आणि तिला जुने दिवस आठवले...

रोहित आणि राधा .. दोघा भावंडांचा एकमेकांवर खूप जीव.. दोघांचे वडील ती लहान असताना वारले.. तेव्हा रोहित हा १० वर्षांचा तर राधा ३ वर्षाची होती.. त्यानंतर आईनेच सांभाळत होती त्यांना पण तीही पाच सहा वर्षात वारली.. जेमतेम फक्त छप्पर होत डोक्यावर राधा ही अशी लहान .. आई गेल्यानंतर रडून रडून घर डोक्यावर घेतले होत तीन.. पण तिच्या दादाने समजवून सांगितलं तशी शहाणी झाली ती...स्वतःच शिक्षण त्याने पुढे रात्र शाळेत घेतलं आणि दिवसा कमवायला लागला .. आपल्या लहान बहिणीच शिक्षण ही त्यांनेच केलं तिला डॉक्टर बनवलं .. यथावकाश तिच्या पसंतीच्या मुलाबरोबर तीच लग्न ही लावलं .. लग्न मानपान सगळं व्यवस्थित केलं... सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या..तिच्याशी लग्न करतानाही त्याने आधी सांगितलं होतं की राधा ही त्याची कायम प्राथमिकता राहणार..... आणि तिला ते मान्य होत पण आज त्यांच्या राधाच हे एक नवीनच रूप त्यांनी पाहिल होत.. इतकी स्वार्थी कशी असू शकते ती.. 

ती भानावर आली तेव्हा रोहित घरात नव्हता.. तिला आता काळजी वाटायला लागली.. लॉकडाऊन मध्ये रोहितची नोकरी गेली... आईवडिलांचा रहात घर यात बहिणीचा वाटा आहे म्हणून आम्ही स्वतःच घर बुक केलं होतं ... त्याचे हप्ते ही नियमित जात होते पण अचानक आलेल्या या कोरोना संकटामुळे होत्याच नव्हतं झालं होतं...काही महिन्याचे हप्ते थकले होते म्हणून आईवडीलचे घर तारण ठेवून त्यावर कर्ज काढून  उरलेले हप्ते भरून घर ताब्यात घेण्याचा मानस होता त्याचा.. शेवटचे तीन वर्षाचे हप्ते एकदम भरून ... पण राधाला एवढा राग येईल असं वाटलं ही नव्हतं त्याला.. शिवाय तो सांगणारच होता तिला पण तिला कस कळलं कुणाकडून काय माहीत..  ती आली तशी वाऱ्यासारखी निघूनही गेली...

थोड्यावेळाने रोहित परत आला... उदास वाटत होता..
रूपालीच्या मनातला संताप असा उसळून वर आला.. त्याची अवस्था बघून .. पण तिने स्वतःला शांत केलं ..कारण ही वेळ रागवण्याची नव्हती हे तिला कळत होतं..

मी खरच चुक केली ना... सगळं विश्वासात घेऊन तिला सांगायला हवं होतं ना.. म्हणूनच दुखावली ती. रोहित हताशपणे म्हणाला...

 पण तिने तुला समजून घ्यायला हवे होत.. मला आज राधाच वागणं पटलं नाही... मुलगी समजून तिला वाढवलं तु आणि आज किती विचित्र वागली ती..

मुलगी आहे ना म्हणून  दुखावली ती...आणि शेवटी लाडकी बहीण आहे.. मी बोलणं करून आलो आहे तिच्या संमतीशिवाय काही होणार नाही.. पैश्याची दुसरी व्यवस्था करेन मी...

रूपालीला पटलं नाही पण हा रोहितचा स्वभाव आणि राधावरचा जीव बघता नाईलाजाने तीही तयार झाली...

दोन दिवसांनी गणपती साठी राधा घरी यायची होती. तेव्हा रोहित तिच्याशी बोलणार होता...

दोन दिवसांनी राधा घरी आली जस काही झालंच नाही... गणेशमूर्तीची स्थापना झाली... आरती झाली आणि जेवणानंतर  रोहितने राधाला बोलवलं..

राधा बाळा हे आईबाबांच्या आपल्या घराचे पेपर आहेत..मी अर्धा वाटा तुझ्या नावावर केला आहे.. ते बघून घे... 

राधाने पेपर हातात घेतले आणि फाडून टाकले.. 

रोहित आणि रुपाली दोघेही तिच्याकडे बघत राहिले...

राधाच्या डोळ्यात पाणी आले तिचा नवरा रोहन ही तिथेच होता...

मला वाटा हवा आहे  दादा पण तू समजून घेण्यात गल्लत केली... ,मला वाटा हवा आहे या घराच्या सुख दुःखात... माझे सगळी दुःख माझे प्रॉब्लेम्स तुझे असतात तस तुझे प्रॉब्लेम्स तुझा त्रास माझा का नाही.. तुझी नोकरी गेली तेही तू मला सांगितल नाहीत.. इतकी कशी परकी झाले मी तुला... अस म्हणून हमसून हमसून रडायलाच लागली..

ते बघून रोहितचा जीव कासावीस झाला ... त्याने तिला जवळ घेऊन थोपटून शांत केलं...

घरातलं वातावरणच पूर्ण बदलून गेले...
रुपालीनेही याची अपेक्षा केली नव्हती.. तिच्याही डोळयांत पाणी आलं होतं... आणि राधाला समजून न घेतल्याची खंत ही...

आपल्या घरात मला सुखाचा वाटा नेहमीच मिळाला.. पण जेव्हा जबाबदारी ची वेळ आली तेव्हा नेहमी डावलले गेलं... सगळ्या जबाबदाऱ्या घायच्या दादाने पण मला मात्र कुठलंही ओझं घेऊ दिल नाही.. आईनंतर सगळे दादानेच केलं.. माझे सगळे लाड हट्ट.. सर्व पुरवले आजही काही दुखल की मी माझा त्रास व्यक्त करते त्याच्याजवळ .. मग तो का त्याची जखम दाखवत नाही का लपवून ठेवतो

म्हणून मला राग आला होता..  दादा तू इतकं केलं आहेस माझ्यासाठी की हे घर जरी मी तुला दिल तरी तुझी कायम देणे करिण राहील मी.. कारण तुझ्या मायेच प्रेमाचं ऋण मी कधी फेडू शकणार नाही..

म्हणून आज मी निर्णय घेतला आहे.. हे घर तुझ्या नावावर राहील... कारण ते माझं हक्कच माहेर आहे.. ते मला तसच जपायचं आहे.. राहिला प्रश्न घरांच्या हप्त्याचा 

तिने एक लिफाफा काढून रोहितच्या हातात दिला.. त्यात तेवढ्याच रकमेचा चेक होता जेवढी रोहित ची गरज होती...

रोहित तीला नकार देणार तेवढ्यात राधाने त्याला दटावल..

" नाही हा दादा मी तुला आधीच सांगितलं आहे मला माझा वाटा हवा आहे.. आणि तो तू मला द्यायलाच हवा.. तुझ्या दुःखांमध्ये तुझ्या सोबत उभी राहण्यासाठी जसा तू कायम माझ्यासोबत राहिला...तुझा वाटा तू घेतलास आता वेळ माझी आहे"

आणि तुझा नवीन व्यवसाय सुरू कर त्या नवीन घरात म्हणजे त्यासाठी लागणारी जागा भाड्याने शोधायला नको... 

बहिणाबाईंनी सगळे ठरवलेलं दिसत आहे.. रोहित राधाला चिडवत म्हणाला....

मग काय घरात ही तिचीच हुकूमत असते.. आणि इथेही हक्क मागते आहे.. तिचा वाटा घेतल्याशिवाय नाही जायची ती.. रोहन ने ही त्याचीच रि ओढली

आपल्या या लहान पण समंजस बहिणीकडे बघून रोहितला खुप अभिमान वाटला.. खरतर आपल्या लाडक्या बहिणीला गमावण्याची भीती वाटत होती त्याला ती खोटी ठरली...त्यांच्यातली प्रेम आपुलकी माया जिंकली होती...

रुपाली ही त्यावर खुदकन हसली होती.. सगळं दुरावा निघून गेला तिच्या मनातून ...
 
राधालाही खूप आनंद झाला कारण आज तिला उशिराने का होईना तिचा अनोखा वाटा मिळाला होता.. 

(साहित्य चोरी हा गुन्हा आहे...सदर कथेच्या  प्रकाशनाचे , वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे  सर्व हक्क लेखिकेकडे  राखीव आहेत..कथा  लेखिकेच्या नावसहित share करण्यास हरकत नाही..)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now