वाट तिची वेगळी भाग 4

वाट तिची वेगळी


राघव दिसला नाही म्हणून सीमा एकटी दूध घालायला निघून गेली.दूध दिलं आणि लगेच माघारी फिरली.आठ साडे आठ चा सुमार असेल .पण, गाव मात्र बर्‍यापैकी सामसूम झाला होता.सीमा झपझप पावले उचलत घराकडे निघाली होती.येताना ते पारा जवळ पोचली तेव्हा,पारावर पाच ते सहा जण टवाळक्या करत बसले होते.कपड्यांवरून ते गावातले वाटत नव्हते.
\"बहुतेक पाटलाच्या श्यामचे शहरातले मित्र असावे\" असा विचार सीमाच्या डोक्यात आला.आणि ती जरा जास्तच वेगाने चालायला लागली.ती गोष्ट पारावर बसलेल्या टवाळखोरांच्या लक्षात आली.आणि सगळेजण सीमा च्या पाठीमागे चालायला लागले. सीमाने मागे फिरून बघितलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली.ते सहा जण आता तिच्या मागे लागले होते.

"ओ जानेमन किधर चली."

"अरे गाव की छोरी है जबरदस्त म** है."

" तू तो किसी मोडेल से कम नही रे."
ते बोलण ऐकून सीमा जोरात पळायला लागली.ती आता पांदन मधून पळत होती.ते सहा जण तिच्या मागे पळायला लागले.अमावस्या असल्यामुळे आज जरा जास्त काळोख होता.पांदी मध्ये अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी तिला पकडले.एका ना तिचं तोंड दाबलं आणि तिला फरफटत बाजूच्या ओढ्यामध्ये घेऊन गेले.सीमा रडायला लागली.तिने त्यांच्याकडे हात जोडले.
"दादांनो मी तुम्हाला लहान बहिणी सारखी आहे.प्लीज मला सोडा."
त्यावर ते सहाजण एकमेकांकडे बघून जोर जोरात हसायला लागले.
"सोडू तुला, नक्की सोडू,आधी आमचं काम तर होऊ दे.\"

"हे बघा,तुम्ही मला सोडा.नाहीतर, मी अख्खा गाव गोळा करेल.पोलिसांमध्ये तुमची तक्रार करेल.सोडा मला."
"आमची पोलीस तक्रार करशील?"
असं म्हणून एक जणानी तिच्या कानाखाली जोरात वाजवली.त्यावर दुसरा बोलला,"अरे बघताय काय?आटपा लवकर.कोणी यायचं मध्येच.त्यांनी तिच्या ओढणीने तिचं तोंड बांधलं.आणि हैवानासारखे तिच्यावर तुटून पडले दहा वाजत आले तरी, सीमा दूध घालून आली नाही,म्हणून सोपानराव बायकोला बोलायला लागले,
"तुझी काय गरज होती एवढ्या रात्री पोरीला पाठवायची?कुठं बसली कार्टी, टायमावर घरी यायची काही.अक्कल आहे की नाही."
त्यावर कुसुम त्यांना शांत करत म्हणाली."आव! कशाला कावताय?अंधार झाला म्हणून थांबली असेल, कुणीतरी आणून सोडणार असेल तिला."
"कोण कशाला आणून सोडतो ?हीच बसली असेल कुठे गमा तमा करत."
"आव काही काय बोलता आतापर्यंत ती अशी कधी बाहेर बसली का?"
खोलीमध्ये टीव्ही बघत बसलेल्या राघवला कुसुम ने हाक मारली,"ये रघु, बाबा जरा जाऊन बघ ना दीदी अजून कशी आली नाही ते"
"मी नाही जाणार बघ, माझ्या आवडीचा पिक्चर लागला आहे."
"आर मुडद्या,इथं एक तर दूध घालायला गेला नाही.बदल्यात बहीण गेली.ती अजून आली नाही.तिला आणायचं सोडून तुला पिक्चरचं पडलंय होय? "
कुसुम जोरात त्याच्यावर ओरडली.
आईचा एकूण सूर आणि घरातलं तापलेल वातावरण बघून राघव ने बॅटरी घेतली.आणि तो वरच्या वस्तीकडे निघाला.तिथे गेल्यावर त्याला कळलं सीमा तर बराच वेळ झाला दूध देऊन गेली.तो तातडीने तिथून निघाला.येताना सीमाच्या दोन-तीन मैत्रिणीच्या घरीही विचारलं, पण त्यांनी सांगितलं की सीमा आलीच नाही.आता मात्र राघव तडक घरी आला आणि घरी येऊन त्याने ही गोष्ट सांगितली.ते ऐकून कुसुम ने डोक्यावर हात मारून घेतला रडायला लागली.भागाबाई छाती बडवून घ्यायला लागल्या.सोपानराव दोघींवर खेकसले, "तुम्हाला बोंबलायला काय झाले? मेली तर नाही ना?"
"आवं काहीबी काय बोलताय?"असं म्हणून कुसुम ने तोंडाला पदर लावला.
सोपान राव ने तिच्याकडे दुर्लक्ष केलं.पलीकडच्या भिंतीला लागून असणाऱ्या त्यांच्या भावाला आवाज दिला.
"गणा......"
"काय म्हणतो रे दादा?"असं म्हणत भाऊ लगबगीने बाहेर आला."आर ती सिमी, आठ वाजल्यापासून नाही आली.कुठे गेली तर बघायला पाहिजे."
"काय म्हणतोस? आर दादा आज अमोशा बी है.चल बर बिगीन कुठे गेली तर बघू"
दोघा भावांनी हातामध्ये काठी घेतल्या.राघव ने बॅटरी पकडली.आणि तिघे जण पांदीतून सीमाला आवाज देत निघाले .....

त्या सहा नराधमानी सीमा च्या कोवळ्या देहाचे लचके तोडले होते.पांदीतून आलेले आवाज आज ऐकून मात्र ते घाबरले.अर्धवट बेशुद्ध पडलेल्या सिमाला त्यांनी तसेच फरपटत नेले.आणि गावाच्या बाहेर स्मशानभूमी ला लागून मोठा नाला होता.त्या नाल्याच्या कडेला तिला फेकलं आणि तिथून पळून गेले.अत्याचाराने थकून गेलेली सीमा मात्र बेशुद्ध पडली.सोपानराव, गणा काका आन राघव तिघ सीमाला शोधत होते.त्यांनी पांदन आणि गाव पालथा घातला तरी सीमाचा कुठच पत्ता नव्हता.शेवटी कंटाळून आता ते घरी जायला निघाले.पण,तेवढ्यात काका जरा थांबला.आणि सोपान राव आला म्हणाला,"मी काय म्हणतो दादा, जरा स्मशानभूमीच्या बाजूला बघून येऊ बर."
"आर तीकडे कशाला? कशाला मरायला जाईल."
"नाही दादा, जरा अमोशा आहे, मला वेगळाच संशय येतोय."
"बर चल, म्हणतोय तर जाऊ दोघे .राघोबा,तू जाय बाबा घरी.आम्ही दोघे जरा जाऊन येतो."
तसा रघु बॅटरी काकाच्या हातात देत घराकडे निघाला.सोपानराव आणि गना काका नाल्या कडे निघाले.रात्रीचा एक वाजत आला होता...कुत्रे जोरजोरात भुंकत होते....मशानभुमी तून कोल्हेकुई चा आवाज येत होता...रात किडे किरकिर करत होते.....मशानभुमी च्या पाय वाटेन दोघ भाऊ सिमाला आवाज देत निघाले.....नाल्याजवळ त्यांना काहीतरी पडलेलं दिसलं.जरा जवळ जाऊन बघावं म्हणून ते बॅटरी घेऊन गेले.आणि समोरचे दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली....................
क्रमशः

🎭 Series Post

View all