वाट तिची वेगळी भाग 6

वाट तिची वेगळी एका सामान्य मुलीची असामान्य कथा

गणा गावात गेला आणि घरी जाऊन सोपानराव ला भेटला. सकाळची वेळ होती. सोपानराव आणि कुसूम शेतावर जायची तयारी करत होते.भागाबाई भाकरी थापत होती. गणा आला,ओसरीवर बसला. सोपानराव ने बघून न बघितल्यासारख केल. शेवटी गणाने घसा खाकरला. आणि बोलायला सुरुवात केली.
"दादा पोर शुद्धीवर आलीय.आणि आता बरी पण आहे तब्येत तिची."
"व्हय टीव्हीवं दाखवत होते की फिरून फिरून."

"पोरीला न्याय मिळावा म्हणून लई लोक रस्त्यावर उतरलेत."
"व्हय घरीबी येऊन गेलेत.पोलिस, पत्रकार,अजून कोणीबोणी.न्हाय न्हाय ते प्रश्न इचारून गेलेत.समदी इज्जत चव्हाटयावर आली"

"दादा?????"
"रघु शाळेत न्हाय जात दोन दिस झालं कोणीबी पोर विचारतात म्हणं तुझी बहिन रातच्याला वड्याकडं कशाला गेली."

"दादा अरे काय बोलतोस तु?एक-दोन टारगट पोरांनी काही बोललं म्हणून इज्जत जातीय व्हय?आर भाईर बघ आख्खा देश पेटून उठलाय पोरीला न्याय भेटावं म्हणून."

"रात्री राधीचा फोन आलता, रडत व्हती, सासू अन नवरा टोमणे मारत्यात म्हणून."
"दादा एकच प्रश्न विचारतो की ह्यात पोरीचा काय दोष?"

"दोष तिचा न्हाय, आमच्या नशिबाचा हाय, असली कपालकरंटी पोरगी पदरात पडली."

गणा शांत बसला. इतक्या वेळ खालमानेने तयारी करत असलेल्या कुसुम कडे बघत बोलला.लबकमनमनम
"वाहिनी, पोर पार सुकून गेलीय ग.झोपीत पण आई आई करतेय."
"आठ दिस झाल्यात तोंड न्हाय दिसलं तुमचं पोरीला."
कुसूम काही बोलणार एवढ्यात सोपानराव गरजले.

"चाल लवकर, उशीर होतोय."
ते ऐकून मात्र गणा संतापला.
"दादा अरे जनाची न्हाय आई मनाची तरी लाज वाटु दे तुला,अरे एवढा कसला घमंड आहे तुला, तुझ्या पोटची पोर ती, पण तु मात्र.........अरे तिच्या जिवापेक्षा तुला कसली इज्जत प्यारी आहे रे......"

गणाने आवाज चढवल्या बरोबर कुसुम जागच्या जागी थिजून उभी राहिली.भागाबाई ओसरी वर आल्या.सोपान रावाचा इकडे पारा चढला.ओरडून बोलला
" चल निघ इथून ,तू कोण मला सांगणारा,निपुत्रिक.... साला....."

निपुत्रिक हा शब्द ऐकल्याबरोबरगणाच्या अंगावर वीज कोसळल्याने सारखं झालं.धरणीमाय दुभंगून पोटात घ्यावं असं त्याला वाटायला लागलं.
तो तडक निघूनआला.पण आल्यापासून मात्र भावाने बोललेल्या गोष्टीचा विचार करत होता.
क्रमशः

🎭 Series Post

View all