वाट तिची वेगळी (भाग 2)

कुसुम आणि सोपान रावांना लग्नानंतर पाच वर्षांनी नवस-सायास करून पहिली मुलगी झाली.'पहिली बेटी धनाची पेटी' असं म्हणत त्यांनी तिच्या जन्माचं स्वागत केलं.पण कुसुम दुसऱ्यांदा गरोदर राहिली तेव्हा सगळ्यांना होईल अशी अपेक्षा होती.दिवस भरत आल्यावर एका सकाळी कुसुम च्या पोटात दुखायला लागले.तशी कुसुम ची सासू भागाबाई धावतच गावातल्या सुईनी कडे गेली.सुईन आली आणि तिने कुसुमची सुटका केली.दुसरी पण मुलगी झाली.दुसऱ्या मुलीच्या जन्माची बातमी ऐकली आणि भागाबाई आणि सोपान रावांचा तिळपापड झाला.सोपान राव तर बायको आणि पोरीची विचारपूस न करतात शेतात निघून गेले.भागाबाई देवाच्या नावानं बोटं मोडीत राहिल्या.बाळंतिणीला नाहूमाखू घालून घालून सुईन घरी निघून गेली.कडकडीत सूर्य डोक्यावर आला तरी कुसुम च्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता.कळा देऊन थकलेली कुसुम खाटल्यावर पडून होती.काय माहित पण सासूच्या काही तरी मनात आलं आणि तिने गव्हाचं पीठ भाजून शिरा करून कुसुम पुढं नेऊन मांडला.बिचारी कुसुम सकाळ पासून उपाशी असल्यामुळे पटापटा शिरा खायला लागली.बाळंतपणाच्या एकाही दिवशी सासूने पोरीला नाहू माखू घातलं नाही का जवळ घेतलं नाही.सोपान रावांनी पण पोरीकडे डोळा वर करून बघितला नाही.बिचारी कुसूम याबाबतीत स्वतःला दोषी म्हणायला लागली.म्हणून तिने पोरीचं नाव सीमा ठेवलं आणि देवाला हात जोडले."आता माझ्या पोटी पोरींची सीमा झाली आता मात्र मुलगा होऊ दे"आणि तसंच झालं.सीमा च्या पाठीवर दोन वर्षाला राघव चा जन्म झाला.आणि थोड्या प्रमाणात का होईना बापाच आणि आजीचा सीमा वरचा राग निवळला.अशी आहे सीमाच्या जन्माची जगावेगळी कहाणी.... चंद्र जसा कलेकलेने वाढतो, तशी सीमा दिवसेंदिवस मोठी होत होती.मोठ्या या राधा ताईचा हात पकडून शाळेत जात होती.अभ्यासात हुशार नसली तरी बऱ्यापैकी होती.घरी कुसुम राधा आणि सिमाला घरकाम शिकवायची.राधा अभ्यासात हुशार होती तसेच घर कामात निपून होती.आईने सांगितलेल प्रत्येक काम ती मन लावून करायची.पण सीमा ला मात्र घरकामाचा कंटाळा यायचा. म्हणून मग आजी तिला टाकून बोलायची, शिव्या घालायची. 'एक दिवस बापाचं नाव घालणार ही कार्टी' असं म्हणून हिणवायची. सीमा ला छान छान गोष्टी वाचायला आवडायच्या.ती सुंदर कविता रचायची.शाळेत भाषण करायची.पण,तिच्या या गुणांच मात्र घरात कोणालाही कौतुक नव्हतं.दिवसामागून दिवस गेले.राधा, सीमा, राघव मोठे होत होते.खेडेगावातल्या पद्धतीनुसार दहावी झाली की राधाचं लग्न लावून दिलं गेलं.आता मात्र आईला मदत करण्याची सर्व जिम्मेदारी सीमा वर आली.घरी गाई म्हशी असल्यामुळे त्यांचा गोटा झाडण्या पासून ते वरव्याच दूध पोहोचवणे पर्यंतचे सगळे काम आता सिमाला कराव लागत होते.राघव तसा आजी व वडिलांच्या लाडात वाढलेली असल्याने मुळे काम करायला नेहमी चालढकल करायचा.आता सीमा दहावीला होती.बोर्डाच वर्ष असल्यामुळे,ती मन लावून अभ्यास करायला लागली होती.तिला दहावी पास होऊन पुढील शिक्षणासाठी शहरातल्या कॉलेजला जायची इच्छा होती.शेजारच्या रमेसारखं छान पैकी दोन वेण्या घालून, सायकलवर बसून, झोकात कॉलेजला जाता यावं असं तिला वाटायचं.तर यंदाच्या उन्हाळ्यात सीमाचं पण लग्न लावून द्यायचं असं घरच्यांच्या मनात होतं.पण.......नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं.सीमाच घर थोडं गावाबाहेर होतं.बाजूला पांदन म्हणजेच शेतात जायची झाडाझुडपांन वेढलेली वाट होती.
कुसुम आणि सोपान रावांना लग्नानंतर पाच वर्षांनी नवस-सायास करून पहिली मुलगी झाली."पहिली बेटी धनाची पेटी" असं म्हणत त्यांनी तिच्या जन्माचं स्वागत केलं.पण कुसुम दुसऱ्यांदा गरोदर राहिली तेव्हा सगळ्यांना होईल अशी अपेक्षा होती.दिवस भरत आल्यावर एका सकाळी कुसुम च्या पोटात दुखायला लागले.तशी कुसुम ची सासू भागाबाई धावतच गावातल्या सुईनी कडे गेली.सुईन आली आणि तिने कुसुमची सुटका केली.दुसरी पण मुलगी झाली.दुसऱ्या मुलीच्या जन्माची बातमी ऐकली आणि भागाबाई आणि सोपान रावांचा तिळपापड झाला.सोपान राव तर बायको आणि पोरीची विचारपूस न करतात शेतात निघून गेले.भागाबाई देवाच्या नावानं बोटं मोडीत राहिल्या.बाळंतिणीला नाहूमाखू घालून घालून सुईन घरी निघून गेली.कडकडीत सूर्य डोक्यावर आला तरी कुसुम च्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता.कळा देऊन थकलेली कुसुम खाटल्यावर पडून होती.काय माहित पण सासूच्या काही तरी मनात आलं आणि तिने गव्हाचं पीठ भाजून शिरा करून कुसुम पुढं नेऊन मांडला.बिचारी कुसुम सकाळ पासून उपाशी असल्यामुळे पटापटा शिरा खायला लागली.बाळंतपणाच्या एकाही दिवशी सासूने पोरीला नाहू माखू घातलं नाही का जवळ घेतलं नाही.सोपान रावांनी पण पोरीकडे डोळा वर करून बघितला नाही.बिचारी कुसूम याबाबतीत स्वतःला दोषी म्हणायला लागली.म्हणून तिने पोरीचं नाव सीमा ठेवलं आणि देवाला हात जोडले."आता माझ्या पोटी पोरींची सीमा झाली आता मात्र मुलगा होऊ दे"
आणि तसंच झालं.
सीमा च्या पाठीवर दोन वर्षाला राघव चा जन्म झाला.आणि थोड्या प्रमाणात का होईना बापाच आणि आजीचा सीमा वरचा राग निवळला.
अशी आहे सीमाच्या जन्माची जगावेगळी कहाणी....


चंद्र जसा कलेकलेने वाढतो, तशी सीमा दिवसेंदिवस मोठी होत होती.मोठ्या या राधा ताईचा हात पकडून शाळेत जात होती.अभ्यासात हुशार नसली तरी बऱ्यापैकी होती.घरी कुसुम राधा आणि सिमाला घरकाम शिकवायची.राधा अभ्यासात हुशार होती तसेच घर कामात निपून होती.आईने सांगितलेल प्रत्येक काम ती मन लावून करायची.पण सीमा ला मात्र घरकामाचा कंटाळा यायचा. म्हणून मग आजी तिला टाकून बोलायची, शिव्या घालायची. "एक दिवस बापाचं नाव घालणार ही कार्टी" असं म्हणून हिणवायची. सीमा ला छान छान गोष्टी वाचायला आवडायच्या.ती सुंदर कविता रचायची.शाळेत भाषण करायची.पण,तिच्या या गुणांच मात्र घरात कोणालाही कौतुक नव्हतं.दिवसामागून दिवस गेले.राधा, सीमा, राघव मोठे होत होते.खेडेगावातल्या पद्धतीनुसार दहावी झाली की राधाचं लग्न लावून दिलं गेलं.आता मात्र आईला मदत करण्याची सर्व जिम्मेदारी सीमा वर आली.घरी गाई म्हशी असल्यामुळे त्यांचा गोटा झाडण्या पासून ते वरव्याच दूध पोहोचवणे पर्यंतचे सगळे काम आता सिमाला कराव लागत होते.राघव तसा आजी व वडिलांच्या लाडात वाढलेली असल्याने मुळे काम करायला नेहमी चालढकल करायचा.आता सीमा दहावीला होती.बोर्डाच वर्ष असल्यामुळे,ती मन लावून अभ्यास करायला लागली होती.तिला दहावी पास होऊन पुढील शिक्षणासाठी शहरातल्या कॉलेजला जायची इच्छा होती.शेजारच्या रमेसारखं छान पैकी दोन वेण्या घालून, सायकलवर बसून, झोकात कॉलेजला जाता यावं असं तिला वाटायचं.
तर यंदाच्या उन्हाळ्यात सीमाचं पण लग्न लावून द्यायचं असं घरच्यांच्या मनात होतं.
पण.......
नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं.सीमाच घर थोडं गावाबाहेर होतं.बाजूला पांदन म्हणजेच शेतात जायची झाडाझुडपांन वेढलेली वाट होती.सकाळी सात लिटर आणि संध्याकाळचे 5 लिटर असं गावात नऊ दहा ठिकाणी दूध घालायला जावं लागायचं.त्यादिवशी,शेतात कापूस वेचणी होती आणि म्हणूनच कुसुम आणि सोपान रावांना शेतातून यायला वेळ झाला.त्यामुळे दूध काढायला ही उशीर झाला.नेहमीप्रमाणे सोपान रावांनी दूध काढून वेगवेगळ्या किटली मध्ये भरले आणि दोन ठिकाणी सिमला जायला सांगून, एका ठिकाणी राघवला जायला सांगितले.एक किटली उचलून ते स्वतः दोन चार ठिकाणी दूध घालायला निघून गेले.सीमा की तिची किटली उचलून घरापासून जवळच गल्लीमध्ये दूध द्यायला गेली.
पण,राघव मात्र नको म्हणून किरकिर करू लागला आणि तसाच पारावर पळून गेला.सीमा दूध देऊन आली तेव्हा दुधाची किटली घरी बघून तिने आईला विचारलं,
"आई दूध घेऊन गेला नाही का ग"
तसं कुसुम म्हणाली,"अगं बघ बाई! चीडचीड करून निघून गेला.काय करावं पोराचं काय कळतच नाही.आता बाप आला तर अजून राग राग करत बसेल.अगोदरच दिवसभराचा शनिवार आहे धरलेला.आता तरी दोन घास पोटात नीट जायला पाहिजे."

"बरं जाऊ दे मग, मीच देऊन येते दूध."

"अगं नको ग, ते वरच्या आळीत लांब घर आहे.त्यात आज आमोशा तू नको बाई कुठे जाऊ.मी जाऊन येते."

"आई ,उद्या सकाळी दिल तर नाही चालणार का?."

"नाही ग बाई, नाही चालणार. पाटलाची लेक बाळातीन झाली.तिला दूध येत नाही, तर तान्या बाळाला हे गाईचे दुध चालू केले आहे.म्हणून दूध देणे गरजेचे आहे.नाहीतर बाळाला दूध नाही मिळायच."

कुसुम किटली उचलून निघणार तेवढ्यात,भागाबाई मध्येच ओरडली."अगं तू कुठे निघाली? आता सोपान येईल तर जेवायला वाढायला त्याला तू दिसली नाही तर किरकिर करत बसल."
ते ऐकून सीमा कुसुम ला म्हणाली, "आई राहू दे,मी जाते.जाताना पारावर राघव दिसला तर,त्याला सोबत घेऊन जाईन.तू नको काळजी करू."
असं म्हणून सीमा किटली घेऊन घराबाहेर पडली.पारा समोरुन जाताना तिने राघवला शोधलं.मात्र, तो तिला कुठेही दिसला नाही.म्हणून मग ती एकटीच पुढे निघून गेली.

🎭 Series Post

View all