वाट तिची वेगळी (भाग 1)

रखरखत उन, ओसाड माळ, ती उभी होती कठड्यावर.खाली खोल दरीकडे बघत. जणू काही दोन हात पसरून मायेने कुशीत घेण्यासाठी बोलवतीये ती दरी तिला.जसं आई बोलवायची लहानपणी प्रेमाने.मागे कित्येक दिवसात आईने प्रेमाने बघितले ही नव्हतं तिच्याकडे.तिलाही ओढ लागली होती कायमच्या शांत झोपेची.तसेही गेले कित्येक रात्री होती झोपू शकली नव्हती.पांढरपेशा दुनियेत जगण्यासाठी तिच्याकडे आता काहीच उरलं नव्हतं.जीव निघून गेलेल्या कुडी सारखी तिची अवस्था झाली होती.आजी म्हणायची, 'बाईची इज्जत म्हणजे काचेचे भांडे एकदा तडकलं की संपलं.' हो.... संपलंच आहे सगळं... कारण बलात्कार झालाय तिच्यावर.*बलात्कार* काय शब्द पण आहे ना.आपल्या बळाचा वापर करून समोरच्याला चिरडून टाकायचं.अगदी नाजूक गुलाबाच्या फुलाला पायाच्या टाचेखाली रगडाव आणि कुस्करून टाकाव.असं कुस्कर ल होतं नराधमांनी तिला आणि फेकून दिलं होतं,विवस्त्र शरीराला तिच्या, कुठल्याशा नाल्याजवळ.शरीराबरोबरच भावनांची ही लचके तोडले होते पिसाळलेल्या कुत्र्यासारखे.शरीरावरच्या जखमा तर भरल्या मलम पट्टी लावून. पण मनाच्या जखमांचं काय?त्या जखमा वर मात्र कोणी फु°कर घातली नाही.त्या नराधमांनी एकदाच शरीरावर बलात्कार केला होता.पण, लोकांच्या घाणेरड्या नजरांनी आणि टोचून बोलण्याने या मनावर हजारदा बलात्कार झालाय.जमिनीवर पडलेल्या शिकारीला घारीने टोचे मारून मारून जखमी कराव, तस रक्तबंबाळ करून टाकल मनाला.पोलीस स्टेशन, पत्रकार,कोर्टकचेरी,वकील, आरोप-प्रत्यारोप सगळीकडे पुन्हा पुन्हा तेच.अगदी कसं केलं? यापासून ते कुठे फेकलं?इथपर्यंत एकच गोष्ट दहा वेळा सांगून कंटाळा आला.एकच घटना कितीदा सांगावी.काय दोष होता? रात्री एकटी बाहेर पडली हा दोष? की, मुलगी होते हा दोष?
रखरखत उन, ओसाड माळ, ती उभी होती कठड्यावर.खाली खोल दरीकडे बघत. जणू काही दोन हात पसरून मायेने कुशीत घेण्यासाठी बोलवतीये ती दरी तिला.जसं आई बोलवायची लहानपणी प्रेमाने.मागे कित्येक दिवसात आईने प्रेमाने बघितले ही नव्हतं तिच्याकडे.तिलाही ओढ लागली होती कायमच्या शांत झोपेची.तसेही गेले कित्येक रात्री होती झोपू शकली नव्हती.पांढरपेशा दुनियेत जगण्यासाठी तिच्याकडे आता काहीच उरलं नव्हतं.जीव निघून गेलेल्या कुडी सारखी तिची अवस्था झाली होती.आजी म्हणायची, "बाईची इज्जत म्हणजे काचेचे भांडे एकदा तडकलं की संपलं."
हो....
संपलंच आहे सगळं...
कारण बलात्कार झालाय तिच्यावर.
*बलात्कार* काय शब्द पण आहे ना.आपल्या बळाचा वापर करून समोरच्याला चिरडून टाकायचं.अगदी नाजूक गुलाबाच्या फुलाला पायाच्या टाचेखाली रगडाव आणि कुस्करून टाकाव.असं कुस्कर ल होतं नराधमांनी तिला आणि फेकून दिलं होतं,विवस्त्र शरीराला तिच्या, कुठल्याशा नाल्याजवळ.शरीराबरोबरच भावनांची ही लचके तोडले होते पिसाळलेल्या कुत्र्यासारखे.
शरीरावरच्या जखमा तर भरल्या मलम पट्टी लावून. पण मनाच्या जखमांचं काय?त्या जखमा वर मात्र कोणी फु°कर घातली नाही.
त्या नराधमांनी एकदाच शरीरावर बलात्कार केला होता.पण, लोकांच्या घाणेरड्या नजरांनी आणि टोचून बोलण्याने या मनावर हजारदा बलात्कार झालाय.जमिनीवर पडलेल्या शिकारीला घारीने टोचे मारून मारून जखमी कराव, तस रक्तबंबाळ करून टाकल मनाला.
पोलीस स्टेशन, पत्रकार,कोर्टकचेरी,वकील, आरोप-प्रत्यारोप सगळीकडे पुन्हा पुन्हा तेच.अगदी कसं केलं? यापासून ते कुठे फेकलं?इथपर्यंत एकच गोष्ट दहा वेळा सांगून कंटाळा आला.एकच घटना कितीदा सांगावी.
काय दोष होता?
रात्री एकटी बाहेर पडली हा दोष?
की, मुलगी होते हा दोष?
दारूच्या नशेत झिंगलेल्या त्या नराधमांनी डाव साधला.मस्तवाल लांडग्याच्या तावडीत सापडलेल्या कोकरा सारखी अवस्था तिची.किती ओरडली...हात जोडले...पाय धरले...पदर पसरला...आई बहिणीच्या आणाभाका घातल्या...
पण, डोळ्यावर वासनेची धुंदीत चढ लेल्या राक्षसांना मात्र कसलीच दया आली नाही.


महिना उलटून गेलाय त्या घटनेला.नाही सावरू शकलीअजूनही.बापाने तोंड पाहिलं नाही अजून.शेजारी-पाजारी तोंड फिरवून घेतात.
आणि आई..
सीमा नाव ठेवलं आईने.मोठ्या राधाताई च्या पाठीवर झालेली ही.दुसऱ्या गरोदरपणात सगळ्यांना मुलाची अपेक्षा होती पण हिचा जन्म झाला सुईन जेव्हा बाहेर आली आणि तिच्या जन्माची बातमी सांगितली.तेव्हा, वडिलांनी काही न बोलता तडक रानाचा चा रस्ता धरला.आजीने कडकडून बोट मोडले.तेव्हा लगेच आईने सीमा नाव ठेवून दिलं.
सीमा म्हणजे पुरे.
आता मुलगी बास.
मागे 16 वर्षात आईने शंभर वेळा तरी ही जन्माची आणि नामकरण केल्याची गोष्ट सांगितली असेल.लहानपणापासून आजी आणि वडील, ज्यांना ती नाना म्हणायची.दोघांच्या वागण्या-बोलण्यात कधी तिच्याबद्दल आपुलकी जिव्हाळा तिला जाणवलं नाही.पण, आई मात्र तिघा भावंडांना सारखा जीव लावायची.तिला वाटायचं,काही झालं तरीआईला मात्र माझ्या जन्माच दुःख झालं नाही.
पण आज..
आई काय बोलली?
"मेली असतीस तर बरं झालं असतं ह्या बदनामी पेक्षा."
इच्छा उरली नाहीये जगायची...
म्हणून सकाळी उठताच निघून आली माळावर.स्वतःच्या निर्जीव शरीराला दरीत झोकून देण्यासाठी....

कोण असेल ही सीमा?कोणी केला आहे तिच्यावर अत्याचार?का पडली रात्री घराच्या बाहेर?काय असेल तिच्या जन्माची गोष्ट ?आणि काय वाढून ठेवले आहे पुढे तिच्या नशिबात?बघू या पुढील भागात.

वाचकहो दरवर्षी आपल्या देशात हजारो बलात्कार होतात.हजारो दामिनी आपल्या इज्जती सोबत जीवालाही मुकतात.आणि ज्या जगतात.त्यांना समाज टोचून टोचून मारतो.आपली न्यायव्यवस्था आणि मीडिया म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर सारखी अवस्था.मग सांगा,अशावेळी अन्याय झालेल्या मुलीने काय करायला पाहिजे?
कोणतं पाऊल उचलायला पाहिजे?
जीव देन हा शेवटचा पर्याय खरंच आहे का?

🎭 Series Post

View all