Login

३१) वासुकी... एक संघर्ष त्याचा साथीने

तीचा संघर्ष
बोलता बोलता वेळ कसा गेला कळलं नाही आणि तीला मगाशी बोललेलं आबांच वाक्य आठवलं तशी ती बाबांकडे बघून बाबा जे काही सांगितलंय ते लक्षात ठेवा स्वत:ची काळजी घ्या मला निघावं लागलं  खुप वेळ झाला ना... मी निघताना एकदा परत येईल काळजी नका करू... म्हणत जानकी तीच्या डोळ्यातले अश्रूं लपवत निघून गेली.
   आबा माझं ऐका ओ तिला इथे राहू द्या. हवं तर... मी नंतर घेऊन जाईन ना....
तूला एकदा सांगितलेलं कळत नाही ती तूझी बायको आहे आणि तूझी जबाबदारी सुद्धा त्यामूळे तू कितीही मस्का लावायचा प्रयत्न केलास,तरी ...ती तूझा सोबतचं आणि आजचं जाणार हा निर्णय बदलला जाणार नाही.
जानकी बाबांना भेटून आली तर... तीला घरातून विश्वास आणि आबाचा मोठमोठ्याने बोलायचा आवाज येत होता. जानकी समजून गेली की, दोघांमध्ये बाचाबाची चालू आहे त्या बाचाबाचीला कारणीभूत सुद्धा तिचं आहे हे कळायला तीला काही वेळ लागला नाही. आत जाव की जाऊ नये याचं विचारात असताना तिथे असलेल्या मातीचा कुंडीला तीचा धक्का लागला. आणि ती खाली पडली तसं दोघांनीही आवाजाच्या दिशेने बघितलं.जानकीला बघून आबा शांत झाले.
    तर... विश्वासला मात्र राग काढायला कारण मिळालं त्याने एक रागिट कटाक्ष तिच्या वर टाकला आणि जरा रागातचं घ्या मुर्ख मुलगी अक्कल बापाच्या घरी ठेऊन आलीस की काय? आयुष्यात आल्यापासून डोक्यांला  नुसता संताप करून ठेवलास तो ठेवलास पण रस्त्यांवर चालतांना आजूबाजूला बघून चाल माझ्या आयुष्याची बरबादी तर केलीस ग पण घरातल्या वस्तूची का ?नासधूस करतेस. आणि हे काय? कुंडी फोडून टाकलीस आता ही माती काय तूझा बाप उचलणार विश्वास जेवढं घालून पाडून बोलता येईल तेवढ़ं बोलत सुटला होता.
    तर... दुसरी कडे आबा दोघांकडे फक्त बघत होते. मी मध्ये बोलणार नाही सुनबाई मी बोललो की त्याचं तोंड दोन मिनिटांत बंद होतं आणि ते मी आताही करू शकतो.पण, मी दरवेळी येऊ शकेन असं नाही विश्वासच्या वागण्यांला तूम्हालाचं आळा घालावा लागेल आणि त्यासाठी तूझ्यांतल्या वाघिणीने डरकाळी फोडली पाहिजे.एवढचं मला वाटतं म्हणून मला गप्प बसावचं 
    लागेल आज मला पण बघायचं आहे ही वाघिन या वाघाची शिकार करते तरी कशी... आबा त्या दोघांकडे बघत मनात म्हणाले.
     तिला मात्र त्याचा बोलण्यावर काही वाटलं नाही पण त्याच्या बोलवण्यात सारखं सारखं बाबाचं नाव येत राहिलं आणि
त्यामुळे तीला सहन न झाल्याने तिने त्याचावर आवाज चढवला.
बस बस झालं बाबा बाबा बाबा माझी चूकी दिसतेयं ना मग मला बोला ना हवं तर उभं जाळा पण माझ्या बाबांच नाव घेऊ नका.
मी तुमच्या बाबांना काही बोलली का? नाही ना बघायला गेलं तर जे तुम्ही तुमच्या आयुष्याची बरबादी झाली हे दु..क्षण मला लावताय ना तर... त्यामागे मी नाही तर तुमचे बाबा आहेत आाणि तूम्ही सुद्धा ....
मी भ्रमात होते की माझा नवीन संसार माझा नवरा आणि त्यांच प्रेम सर्व मिळणार म्हणून पण तुम्हाला तर हे लग्न नको होत मग थांबवायच़ होत बाबांना आता जशी माझ्यावर आवाज चढवायची हिंमत होते ना तोच आवाज बापासमोर लग्नाआधी काढायला काय? झालं होतं हा दिवस तरी नसता आला. माझ्या आयुष्यात....
   नवीन नवरीची सर्व स्वप्न पहिल्या रात्रीच चिरडली गेलीत जिथे नवराचं आपला नाही तो संसार तरी काय? कामाचा हा बिनबुडाचा संसार तोडायला मला वेळ पण नाही लागणार पण माझे बाबा तुम्हाला खुप चांगले समजतात हा त्याचा गैरसमज आहे की ,तुम्ही त्यांच्या मुलीला खुश ठेवालं.
पण या गैरसजुतीतचं ते खुप खुश आहेत म्हणून मी माझा मोडलेला संसार कधीचं त्याचा समोर आणणार नाही किती आदलाआपट केली तरीही....
आणि हो आज परत एकदाच आणि शेवटचं सांगते भाडणं हे
दोघांच आहे.माझ्या बाबांना यातलं काही माहित नाही.त्यामूळे त्याना मध्ये ओढायचं नाही मला ते आजिबात आवडणार नाही. यापुढे असा प्रयत्न जरी केला तर ...माझ्या इतकी वाईट कोणीही नसेल.जानकी सुद्धा जोरजोरात त्याचावर आवाज चढवत होती.
ती आपल्या वर आवाज चढवून बोलतेयं ही गोष्ट त्याला खटकली आणि त्याने रागांने टेबलवरची फुलदाणी उचलली व रागात फेकून देत ये एकदम तोंड बंद ठेवायचं माझ्यांच घरात उभी राहून माझ्या वर आवाज चढवायचा नाही.नाही तर ही तरी फुलदाणी जमिनीवर फोडली जास्त डोक्यात गेलीस ना, तर...मी दुसरी फुलदाणी तूझ्या डोक्यात फोडायला मागे पुढे बघणार नाही विश्वास तावातावने बोलत होता.