Login

१८) वासुकी... एक संघर्ष त्याचा साथीने

Tyacha Sathine
या सर्वात तीला जो काही धक्का बसला त्यामूळे तीच्या हातात असलेला दागिन्यांचा डबा तीच्या हातातून पडला त्याचा आवाजाने आबांनी मागे वळून बघितले
     त्याना जानकी तिथे उभी राहून विस्परलेल्या डोळ्यांनी बघताना दिसली
     तसा त्यांनी तीला आवाज दिला पण ती आवाज न देता निघून गेली
    आबांना मात्र तीने सर्व ऐकलंय याची खात्री झाली ते विचार करण्यात मग्न झाले तर.... जानकी मात्र एका कोपर्यात धायमोकळून रडत होती
कारण आता ती ही परिस्थिती बदलू शकणार नव्हती आणि ज्या माणसांची या लग्नाला सहमती नव्हती तो पुढे खरचं आपल्याशी चांगलं वागेलं का कि आपल्या वर प्रेम तरी करेल का?
याची तीला खात्री सुद्धा नव्हंती
रडून रडून डोळे सुजले होते पण आता नवीन संसाराचे स्वप्न बघितलेल्या मुलीचा संसार लग्नाच्या दुसऱ्या दिवोशीचं मोडला होता ती तीच्या बापाला सुद्धा सांगू  शकत नव्हती
   आता तिला त्याचा रूममध्ये सुद्धा जाऊ वाटत नव्हतं पण पर्याय नव्हता ती गेली तर... बाथरूम मधून आवाज येत होता म्हणजे विश्वास आत आहे हे तीला समजलं तशी ती बेड वर येऊन बसली त्यांची वाट बघत वाट बघता बघता ती विचारात मग्न झाली
विश्वास त्याचं आवरून बाहेर आला तरी तीला काही समजलं नाही त्याने मात्र तिला विचारात हरवलेलं बघितलं आणि दुर्लक्ष केलं आणि रूम च्या बाहेर सुद्धा गला
0

🎭 Series Post

View all