वसंत ऋतूची नवलाई

वसंत ऋतूची नवलाई


*वंसत ऋतूची नवलाई*

चाहुल वसंत ऋतूची
नव वर्षाचे आगमन,
चैत्र पालवीत बहरते
प्रफुल्लीत हे जीवन.

फुटते कोवळी पालवी
विविध रंगी पानांना,
चैतन्याने येतो बहर
मरगळलेल्या मनांना.

पर्ण फुले गोंडस नाजूक
रखरख उन्हात फुलते,
येता झुळूक वाऱ्याची
आनंदाने सृष्टी डुलते.

पालवीसोबत मोहरते
नटून सजून सारी धरा
सौंदर्याने खुलून येतो
फुललेला निसर्ग सारा

तप्त उन्हाच्या झळीने
होते जीवाची लाही लाही,
तरी सुखावून जाते चौफेर
वंसत ऋतूची नवलाई.
---------------------------.
सौ.वनिता गणेश शिंदे©️®️

🎭 Series Post

View all