वासनांध ( भाग 1)

वासनेने अंध झालेल्या माणसाला धडा


वासनांध

ऑफिसच्या कामासाठी अनिता आज नविन गावी आली होती. हाॅटेल वर चेक इन करून ती आपल्या खोलीत आली. फार भूक नव्हती. तिने फ्रेश होऊन बरोबर आणलेले केक खाऊन ती काॅटवर सेल फोन बघत पडली. बघता बघता तिला झोप लागली. अनिता झोपली.अगदी गाढ. मधेच तिला कसल्यातरी स्पर्शाने जाग आली. तेव्हा तिच्या तोंडावर कोणाचा तरी हात फिरत होता. ती ओरडणार इतक्यात त्याने त्याच्या ओठांनी तिचे तोंड बंद करून टाकल. तिने विरोध केला खूप. अगदी जीव एकवटून ओरडण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या तोंडातून रक्त फुटेना. तो तिच्या शरीराचे लचके तोडत होता. अंधारात त्याचा चेहराही दिसत नव्हता. तिने त्याला लाथ मारण्यासाठी प्रयत्न केला तर तिचा पाय हवेत उडल्या सारखा झाला. आता मात्र ती घाबरली. अनिता इतकी थकली होती. तिला केंव्हा तरी भोवळ आली आणि तिची शुद्ध हरपली. त्याने त्याचा कार्यभाग उरकल्यावर तिथून पळ काढला. तो कोण होता? इथे कसा काय आला?.
… … .,.

सकाळी उशिरा अनिताला जाग आली. तिचे सर्व अंग ठणकत होते. तसेच कसेतरी उठून ती बाथरूम पर्यंत गेली. तिच्या अंगाला येणाऱ्या कुबट वासाने तिला उलटी झाली. तिने आधी स्वच्छ अंघोळ केली्. आणि आजच्या आज हे हाॅटेल सोडून जायचा निर्णय घेतला. ती सामान घेऊन ती रिसेप्शन जवळ आली. रिसेप्शनवर एक काळा अभिन्न आडदांड माणूस उभा होता. त्याच्या अंगावर दाट काळे केस होते. ते ध्यान पाहून अनिता घाबरून गेली. काल रात्रीचा प्रसंग तिला आठवला. तक्रार कोणाजवळ आणि काय? वास्तविक तिने मॅनेजर जवळ तक्रार करायची असे ठरवले होते. पण ह्या माणसाला पाहून तिचे अवसान गळाले. ती रिसेप्शन वर कशाबशा किल्ल्या देऊन चक्क पळत तिने टॅक्सी पकडली. ऑफिस च्या कामासाठी तिला दर दीड दोन महिन्यांनी टूर वर जावे लागे. आजपर्यंत असा घाणेरडा प्रसंग कधीच ओढवला नव्हता. ती पार घाबरून गेली होती. कशीतरी ती क्लाएंट कडे पोचली. क्लाएंट कडे गेल्यावर सर्वप्रथम तिने क्लाएंट च्या केबिन मधे प्रवेश केला तर तो माणूस आत क्लाएंटशी बोलत होता. परत तिची तीच अवस्था. ती फार घाबरली.ती तशीच बाहेर आली. क्लाएंटच्या ऑफिस मधून बाहेर पडून तिने पहिला फोन तिच्या ऑफिसमधे केला. तिची बाॅस तिची मैत्रिणही होती. तिने घडलेली सर्व हकिकत तिला सांगितली. तिची बाॅस म्हणाली " तू त्या क्लाएंटच्या आधी आफिसात जा. नंतर घरी जा. मी त्याच्याशी बोलते. बी ब्रेव्ह. रडू नकोस. " अनिता परत क्लाएंट च्या ऑफिसमध्ये गेली. क्लाएंटशी ती सगळं काही बोलली. मग क्लाएंट म्हणाला," घाबरू नका. आम्ही तुम्हांला हवी ती मदत करू. आपण आधी पोलिस चौकीत जाऊ. रितसर कंप्लेंट करु. मग तुम्ही माझ्या घरी चला. माझ्या घरी आई वडील बायको माझी दोन मुले आहेत. तिथे तुम्हांला कसलीही भिती नाही. तुम्ही निवांत रहा. उद्या तुमच्या बाॅस येतीलच. "

🎭 Series Post

View all