दुसऱ्या दिवशी मालिनीच्या ऑफिसमध्ये-
" प्रीती नाही आली?", मालिनीने विचारलं.
"नाही अजून. काहीतरी कामात असेल." ललित म्हणाला.
"बरं. ऑफिस मधल्या इंटर्नशी मी बोलून येते. त्यांना दिलेली काय कामं झाली ते बघते."
"ठीक आहे मी माझा एक लेख आहे क्राइम रिपोर्ट सदरात तो घेतो करून. प्रीती आली की केस घेऊ चर्चेला."
मालिनी आणि ललित त्यांच्या कामात व्यस्त झाले. दोन- अडीच तासाने प्रीती आली.
"ललित पाणी दे जरा." प्रीती धापा टाकत बोलली. ललित तिला पाणी देतो.
"अगं काय चालत आलीस का धावत?"
"नाही रे. माहिती काढत आले."
"थांब मॅडम ना सांगतो तू आली आहेस."
"नको. त्यांनी पाहिलं आहे मला येतील त्या." प्रीतीने शांतपणे पाणी प्यायले.
"प्रीती कुठे होतीस? इतकी धापा टाकत आलीस? काही झालं का?"
"मला उशीर झाला म्हणून धावत आले. माझी गाडी बंद पडली होती म्हणून आज रिक्षा केली ती सुद्धा मध्येच बंद पडली."
"बरं झालीस का शांत? होतीस कुठे तू?" मालिनी ने विचारले.
"मी सकाळी माणिकला पाहिलं. गाडीत होता. आमच्या बाजुला औषधांचं दुकान आहे तिथे बाहेर थांबला होता. तिथला फार्मसिस्ट माझ्या चांगला ओळखीचा आहे. माहिती काढली लगेच."
"काही महत्त्वाची माहिती मिळाली का? केस संदर्भात?", ललित ने विचारले.
"महत्त्वाची आहे कारण माहिती ही माहिती असते. ह्या केस संदर्भात नाही पण कधी उपयोगी होईल."
ललित आणि मालिनी ने प्रश्नार्थक नजरेने प्रीतीकडे पाहिलं.
"माणिक हा फार्मसिस्ट आहे पण तो औषध वितरक सुद्धा आहे. विवेक आणि माणिक दोघं भागीदार आहेत. त्यामुळे कदाचित ते एकमेकांना गोळ्या दाखवत असतील सँपल म्हणून. मेडिकॉम त्यांचं ऑफिस नाही पण. मेडिकॉम ही औषध बनवणारी कंपनी आहे आणि त्यांची बरीच औषधं हे दोघं वितरित करतात. मी त्या फार्मसिस्ट कडून आसपास कुठे देत असतील औषधं हे विचारलं आणि १०-१२ दुकानांमध्ये विचारलं पण सगळं चांगलं आहे. लाईक नॉर्मल बिझनेस."
"वाह बराच आटापिटा केलास. आता घेतलंच आहेस हातात तर पूर्ण करा. त्या दोघांच्या कामाचे क्षेत्र म्हणजे फक्त जिल्ह्यात वितरण करतात का राज्यात? दुसऱ्या राज्यात? हे पण शोधा. वाटलं तर एखाद्या इंटर्न ला घ्या मदत म्हणून. मी पण आले असते पण मला आज चार वाजता मीटिंग आहे." मालिनी ने प्रीती आणि ललित ला पुढचा मार्ग दाखवला.
"मीटिंग? आज कुठलीच मीटिंग नव्हती ना?" ललित ने विचारले.
" खाजगी मीटिंग आहे. नंतर बोलू ह्या विषयावर आधी हे काम करायला लागा आणि जास्त उशीर करू नका."
"ओ .के. चला आम्ही निघतो. उदया भेटू. ए आळशी चल.", ललितने प्रीतीला हाक मारली. प्रीती काहीच बोलत नाही आणि न ऐकल्यासारखं लॅपटॉप बघत बसली.
" प्रीती सरकार उठा. येताय ना?" ललित ने मस्करीत विचारले.
"आता कसं? अशी हाक मारायची. चल. मॅडम येतो आम्ही उद्या भेटू." प्रीती बाहेर निघून गेली.
"हा एक नमुना आहे मॅडम. एकमेव कधीही परत न होणारा."
"तीच नाही तुम्ही दोघं नमुने आहात. जा लवकर नाहीतर ती जाईल एकटीच. तिचा भरवसा नाही."
प्रीती आणि ललित आपल्या वाटेने निघून गेले.
मालिनी कॅफे रूमा च्या दिशेने निघाली.
……,................................................................

विपुल तिची वाट बघत बसलेला.
"हॅलो. वेळेच्या आधी? चांगली सवय आहे." मालिनी ने विचारले.
" काम महत्वाचं असलं की दहा मिनिटं आधी जातो मी."
" तुम्हाला हा कॅफे कसा माहिती? म्हणजे तसा फार प्रसिद्ध नाहीये हा. "
" येता जाता बऱ्याच वेळा पाहिला आहे. त्यामुळे लक्षात राहिला. असो. तुम्ही काय घेणार?"
"फिल्टर कॉफी."
" वेटर दोन कॉफी आणि एक सँडविच."
" आजचा दिवस कसा गेला?" विपुलने मालिनीला विचारले.
" छान! केसेस मध्ये खरंच काही महत्वाचं मिळालं तर अजून छान जातो."
" मस्त. तुमचं नाव मी बरेचदा ऐकलं आहे काही महत्त्वाच्या केसेस मध्ये. चार महिन्यापूर्वी तुम्ही त्या बोगस डॉक्टर ला केस मधून उघडं पाडलं आणि अजून काही निवडक केसेस."
"माझाविषयी अभ्यास करून आला आहात का?" मालिनी ने विचारलं.
"अभ्यास नाही पण समजून घ्यायला हवं ना."
"हो बरोबर आहे. आपण एकमेकांना जाणून घ्यायला भेटणार असं ठरलेलं आहे त्यामुळे मी आत्ता जे सांगणार आहे ते खूप महत्वाचं आहे. माझ्या कामामुळे माझे बरेच शत्रू तयार होत असतात आणि ह्या पुढे होत राहतील. मी घाबरत नाही पण फक्त मी नाही माझी आईपण काही लोकांच्या रडारवर असू शकते. ह्या आधीही माझ्यावर, घरावर हल्ला करायचा प्रयत्न झाला आहे. माझं लग्न ज्याच्याशी होईल तो, त्याचं कुटुंब ह्या सगळ्यांना ह्या भितीत कायम जगावं लागू शकतं. ह्या आधी मला स्थळं बघायला आली आणि निघून गेली कारण मी घालवली. मी वेळेत कधी गेले नाही घरी. माझ्या कामामुळे मला दुसऱ्यांना धोक्यात घालायचं नाही."
विपुल मालिनीच्या बोलण्यामुळे जरा गप्प होतो.
" मला थोडी कल्पना आहे पण एक विचारू? हे सगळं तुम्ही मलाच का सांगताय? म्हणजे ह्या आधी आलेल्या स्थळांना पण सांगू शकला असता की? मलाच भेटायचं कसं मनात आलं?"
"तुमचा व्यवसाय. माझ्या व्यवसायाशी निगडित आहे थोडा. वाटलं तुम्हाला मी नीट पटवून देऊ शकेन. आत्ताही ह्याची कल्पना मी तुम्हाला दिली आहे. दुसरं म्हणजे माझी आई. लग्नानंतर जबाबदारी घेऊ असं सांगून न घेणारे बरेच पाहिले आहेत मी. जर आपलं लग्नं ठरलं तर मी रीतसर करार करणार आहे की माझ्या आईला सांभाळलं जाईल मी असेन किंवा नसेन."
"मग हा करार मी सुद्धा करून घ्यायला हवा. माझ्याही आई- बाबांना सांभाळलं जाईल मी असेन किंवा नसेन तरीही." विपुलने मालिनीच्या शब्दात उत्तर दिले.
"मला समजतंय हे जरा अती आहे पण अनुभवातून बोलत आहे मी. कुठल्याही कायदेशीर, भावनिक बंधनात अडकायच्या आधी सगळं स्पष्ट असलेलं बरं." मालिनीचं बोलून झालं. काही वेळ कोणीच बोललं नाही. तोपर्यंत वेटर कॉफी आणि सँडविच घेऊन आला.
"मला ह्या अटी मान्य आहेत. अजून काही सांगायचं आहे का?"
"विपुल तुम्ही प्रत्यक्ष अनुभवा काही दिवस. मी सुद्धा तुमच्या कामाच्या ठिकाणी येईन. एकमेकांना वेळ देऊ निर्णय घेण्यासाठी."
"ठीक आहे. कितीही काही झालं तरी माझा होकार कायम आहे. बरं ते आत्ता बाजूला ठेवू. तुम्ही सांगा आत्ता कुठली केस हातात घेतली आहे?"
"मी असं सांगू नाही शकत पण आत्ता एक केस नवी आली आहे पण ती केस म्हणून टिकेल का नाही माहित नाही. कारण संशय घ्यायला काही जागाच नाही. तरी एका मुद्द्यावर अजून शोध सुरू आहे. बघू."
अचानक बोलता बोलता मालिनीचा चेहरा उजळला.
" एक मिनिट तुमची फार्मसी आहे. तुम्ही माणिक किंवा विवेक नावाच्या वितरकांना ओळखता का?"
"हो ओळखतो ना. काय झालं?"
" कसे आहेत म्हणजे काही चुकीचं करणारे, काही गडबड?"
" नाही. विवेक थोडा अहंकारी आहे फार कमी वेळा भेट झाली. माणिक पण सोबत असतो काही वेळा. अहंकार येतो तो मोठेपणामुळे. त्यांचाईतका मोठा वितरक कोणी नाही. तुम्ही विचारताय तसं काही नाही वाटलं. गडबड असेल ना तर आम्हाला पहिली बातमी असते. औषध पाहिलं की कळतं."
"म्हणजे ललित आणि प्रीतीला फार माहिती मिळेल असं वाटंत नाही." मालिनी पुटपुटली.
"ललित आणि प्रीती. हे कोण?"
"ललित आणि प्रीती माझे सहकारी. दोघंही पत्रकारसह गुप्तहेर झाले आहेत माझ्यासाठी." मालिनी थोडीशी हसली.
" काय झालं हसायला?" विपुलने विचारलं.
"काही नाही. दोघंही कामसू, जिद्दी, हुशार आहेत तेवढीच बालिश आहेत. टॉम अँड जेरी."
"वाह. एकदा भेट घडवून आणा टॉम अँड जेरी ची."
"चालेल. रविवारी भेटू . आता मी निघते उशीर होईल मला आणि हे माझे कॉफीचे पैसे."
" हे कशाला? म्हणजे माझी ऐपत आहे तेव्हढी."
" प्लिज गैरसमज नको. आत्ता वेगळे आहोत आपण. चुकून नात्यात बांधलो गेलो तर मी दिले नसते."
" ठीक आहे. सोडू तुम्हाला?"
" नाही. माझी गाडी आहे. विचारल्याबद्दल धन्यवाद! बाय."
" बाय. बरं एक सांगू? हसताना छान दिसता तुम्ही."
मालिनी काहीच प्रतिक्रिया न देता बाहेर आली.
"मालिनी तुम्ही न बोलता सगळं बोलून गेलात. चला कमीतकमी 'नात्यात बांधलो गेलो तर' असं बोलण्यात तरी आलं तुमच्या. विपुल तुमची गाडी योग्य मार्गावर आहे..." विपुल हसत स्वतःशी बोलत बिल देऊन बाहेर निघाला.

क्रमशः
© स्वराली सौरभ कर्वे.
( ही कथा काल्पनिक पात्र आणि काल्पनिक मुद्दे घेऊन लिहिली आहे. कुठल्याही पात्राचा, केस चा ह्या कथेशी संबंध नाही. तसा संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)