वर्षपूर्ती ❤️ स्वप्नपूर्ती ❤️

Happy me

वर्षपूर्ती ….. स्वप्नपूर्ती ……

नमस्कार मित्र मैत्रिणींनो , 

            मी मेघा , आज मी इथे आपल्या सगळ्यांना Big वाले Thank you म्हणायला आले आहे , तर सगळ्यांचे खूप खूप खूssssssप आभार …. 

             तर शीर्षकावरून तुम्हाला सगळ्यांना कळलेच असेल आहे , हो आज मला लिखाण सुरू करून एक वर्ष झाले आहे , ईरा सोबत ची माझी फ्रेंडशिप एक वर्षाची झाली आहे , सोबतच नंदिनी … श्वास माझा या कथेला सुद्धा एक वर्ष झाले , आणि सोबतच माझी लेखणी सुद्धा एक वर्षाची झाली आहे आणि हे सगळं तुमच्या मुळे शक्य झाले आहे , त्यामुळे एक स्पेशल वाला thank you तर बनतोच ना ! 

 " Megha Amol congratulations one year ago you start to write " … ज्योती विहंगे mam 

 खरं तर मी विसरले होते , पण आपल्यातल्याच ज्योती विहंगे मॅडम यांनी तू ही रे कथेच्या भागावर कॉमेंट केली, आणि मग मला आठवले … आणि मग तेच निमित्त साधले , आणि आपल्या सगळ्यांसोबत बोलायला आले. 

    

              ऑगस्ट 2020 मध्ये आजच्याच दिवशी मी नंदिनी...श्वास माझ्या या कथेचा पहिला भाग ईरा वर पोस्ट केला होता , त्या दिवशी काहीच कल्पना नव्हती की पुढला माझा हा प्रवास इतका सुंदर होणार आहे , आपल्या सगळ्यांचे इतके भरभरून प्रेम आणि सपोर्ट मिळणार आहे .. या एका वर्षात खूप काही शिकायला मिळाले . लिखाण करणे हे माझ्या गावचे नव्हते , मी स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता , इतकं प्रेम मला ईरा परिवाराकडून मिळालं आहे . 

               भरपूर गोष्टी शिकल्या या एका वर्षात , चुका तर अन्गिणत केल्या …. लिखाणातल्या चुका , व्याकरण शुद्धलेखनच्या चुका , एका वेळेला एका पेक्षा जास्त कथा सुरू केल्या , मग कधी भाग वेळे वर पोस्ट नाही करू शकले या चुका …अशा खूप चुका झाल्यात , म्हणजे अजूनही होतात आहेत … तर मी आधी पण बोलले होते की मी लेखिका नाही , मग नव्याने लिहू बघू लागले , नंदिनी कथा पोस्ट करू लागले , छान छान कॉमेंट्स आल्या आणि प्रचंड उत्साह चढला , लिहिता लिहिता खूप आयडिया पण यायला लागल्या आणि याच उत्साहात मग तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना ही कथा सुरू केली , मग पुन्हा डोक्यात नवीन कल्पना आली आणि love:sky is not limit ही कथा सुरू केली . अधूनमधून छोट्या कथा अभिमन्यू ( आर्मी लाईफ) , जय...वेडी ( कोरोना काळातील एका डॉक्टर ची कथा ) , आईची पाखरं ( आई आणि मुली चा त्यांच्या अस्तित्वासाठी असलेला संघर्ष) या कथा पण पोस्ट केल्या. त्या नंतर एक स्पर्धा आली , रहस्यकथा , खरं तर मी participate करणार नव्हते , पण स्पर्धेतून लिखाण आणखी चांगलं होते , काही लेखक फ्रेंड्स ने फोर्स केला participate करायला आणि म्हणून मग दुर्गा कथा लिहायला घेतली. खूप उत्साहाने सुरुवात केली आणि पटापट १३ भाग लिहून काढले , म्हणून ते रोज पोस्ट केल्या जात होते .

           इरा वरील rules बदलले , त्यामुळे दुसऱ्या प्लॅटफॉर्म च्या कथा इथे चालणार नव्हत्या , म्हणून love sky is not limit ही कथा मी पोस्ट करायचे बंद केले , पण नंदिनी आणि तू ही रे ला बराच वाचक वर्ग जोडल्या गेला होता म्हणून संजना मॅडम यांनी या दोन कथा इथे continue करण्यासाठी परवानगी दिली . काही लेखकांना हे नाही आवडले , म्हणून मग कथा इरावर continue करू की नको अशी मनस्थिती झाली होती , लिखाणात मन नव्हते लागत … सात आठ दिवस कुठल्याच कथेचे भाग पोस्ट नव्हते केले. इथूनच दुर्गा कथेला ग्रहण लागले … आणि तेव्हा संजना मॅडम च्या एका वाक्याने परत आत्मविश्वास वाढला "तुझ्या लेखणीला बोलू दे !"  

          ईरा परिवार खूप मोठा आहे , जसे वाचकांची साथ लाभली तशीच लेखकांची पण छान साथ मिळाली , छान छान मित्र मिळाले , वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केले. अमृतवेल ग्रुप मिळाला . 

          

          ईरा वर लिहायला सुरुवात केली तेव्हा " ब्लॉगर of the week " असा concept होता , ब्लॉगर ऑफ द वीक असलेल्या लेखकाचा ईरा page च्या cover photo वर तो लेखक यायचा …. तर माझं पण हे एकुलते एक स्वप्न होते …. पण नंतर तो कॉन्सेप्ट च कॅन्सल झाला … पण 29 एप्रिल 2021 ला एक धमाका झाला … सकाळी उठल्यावर इरा page check केले. तर मी इरा कव्हर वर होती आणि आपल्या सगळ्यांचा भरपूर शुभेच्छांचा वर्षाव ( 50 लाख व्ह्यूज पूर्ण झाले होते)  …. बापरे त्या दिवशी तर आज मै उपर आसमा नीचे असे काहीसे झाले होते , आणि त्या नंतर नामदेव सरांची त्यांच्या गोड शब्दसुमनांमधून कौतुकाची थाप , त्या नंतर धनश्री शिरसाठ मॅडम यांचे कौतुकाचे पत्र , आणि त्या पाठोपाठ पूजा अडेप मॅडम ची गोड कौतुक सुमने …. बापरे बाप कसलं भारी वाले फिलिंग होते शब्दात पण वर्णन नाही करू शकत . त्या नंतर काही दिवसांनी संजना मॅडम चा मेसेज आला , त्यांनी मला एक लिंक शेअर केली , आणि म्हणाल्या शेवट पर्यंत वाच … ते बघून आधी तर मी थोडे घाबरले , की परत लिखाणात चुका केल्या दिसते मी , की कोणी कंप्लेंट केली … घाबरतच ती लिंक ओपन केली बघते तर एक न्यू कथा , भराभर वाचून काढली आणि शेवट वाचायला घेतले , बस परत एक गोडवाला मोठा बॉम्ब पडला …. शुभाशिनी मॅडमची "माझी मानवी" कथा , त्यात शेवटी त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला होता . बापरे त्यावर तर मला शब्दच सुचेनासे झाले …. एखादी मोठी ट्रॉफी मिळावी इतकं छान ते फिलिंग होते . त्या नंतर आणखी एक सुंदर गिफ्ट मिळालं ते धनश्री मॅडम यांच्याकडून माझा सुंदरसा क्यूट वाला स्केच ( माझ्या फेसबुक प्रोफाइल चा dp आहे ) , भैय्या दिल तो गार्डन गार्डन होगया . आपल्या सगळ्यांच्या कॉमेंट्स तर खूप सुंदर असतात , मी त्यांचे स्क्रीनशॉट काढून ते माझ्याकडे जपून ठेवले आहे .  

          "तुमची कथा वाचली की बिग स्मायल येते! " आणि अशाच खूप सुंदर कॉमेंट्स , मेसेजेस वाचून अपना तो दिन बन जाता है. मोठ्या मोठ्या कॉमेंट्स तर मी सुद्धा दोन तीनदा वाचते, माझंच मन भरत नाही . 

" तुम्ही खूप रडवता! " ही तर कॉमेंट of the year ठरली आहे. 

आपण सगळ्यांनी कथांना खूप सुंदर सुंदर कॉमेंट्स केल्या , सगळ्या कॉमेंट्स मी वाचायचे , रिप्लाय पण करायचा प्रयत्न असायचा , पण जास्ती रिप्लाय केले की फेसबुकवर कॉमेंट करण्याचे ऑप्शन 24 hrs साठी ब्लॉक हो होते , सात आठ वेळा माझे comment ऑप्शन ब्लॉक झाले आहे , म्हणून मग प्रत्येक कॉमेंट लाईक करते , आणि काही प्रश्न असतील त्यांना उत्तर देते. " नेक्स्ट पार्ट कधी ?" याचे माझ्याजवळ उत्तर नसायचे , कारण part लिहिलेला नसायचा , आणि दिवस सांगूनही पोस्ट नाही केला तर तुमचा हिरमोड होईल म्हणून मग काय उत्तर देऊ म्हणून गप बसायचे . 

इरा ॲप वर पण सगळ्या कॉमेंट्स मी वाचत असते , फक्त तिकडे लाईक ऑप्शन नाही म्हणून मी वाचत नाही असे प्लीज समजू नका . 

                 माझ्या लिखाणावर भरपूर टीका झाल्यात , खूप तिखट शब्दांचा मारा पण बसला , पण हे चांगलेच झाले , मला माझ्या चुका कळत गेल्या , आपल्याला कुठे कुठे लिखाण सुधारता येते ते कळत होते , आणखी चांगलं कसे लिहू शकतो हे शोधत गेले. 

                   नंदिनी , तुहिरे कथांनी वाचकांमध्ये ओळख निर्माण करून दिली तर दुर्गा कथेने लेखक सुद्धा ओळखायला लागले .. इकडे page वर बहुतेक पोस्ट वर दुर्गा कथेसाठी कॉमेंट असतेच … त्यामुळे तिकडे आमच्या व्हॉटसॲप ग्रुप ला दुर्गा कोणाची आहे .. असे करून खूप ओळख मिळाली आहे… दुर्गा कथा मी स्पर्धा साठी लिहीत होती , पण काही कारणांमुळे दिलेल्या कालावधीत ती पूर्ण नाही करू शकले , पण ती कथा आपल्या सगळ्यांना इतकी आवडेल हे सुद्धा वाटले नव्हते , मध्ये वाटले की पटापट लिहून संपवून द्यावी , पण आपल्या सगळ्यांना आवडली म्हणून कशीही संपवू नाही वाटत आहे. कथा लिहिताना त्या पात्रात घुसून कथा लिहिते , कधी कधी तर मी कथेत इतकी घुसली असते की खूप लिहिल्या जाते , डायलॉग वर डायलॉग लिहीत जाते , मग ती खूप मोठी पण होते , नंतर वाचातांन वाटते बापरे काय काय लिहिले , मग ते delete केल्या जाते , कधी माझ्या आंगात श्रीराज यायचा तर कधी राहुल , कधी माही तर कधी दुर्गा …मग जरा डोक्यात खिचडी व्हायला लागली … म्हणून मग सद्ध्या दुर्गा स्टॉप केली , तू ही रे संपत आली आहे , ती संपली की दुर्गा सुरू करते … love sky is not limit साठी बरेच मेसेजेस आले आहेत , तर जर ती कथा वाचायची असेल तर माझ्या पर्सनल फेसबुक ( Radhika Megha ) account ला शेअर करेल आहे. 

             या वर्षात आपण सगळ्यांनी माझ्या चुकांना खूप सांभाळून घेतले , पण आता पुढे केलेल्या चुका कमी करायचा प्रयत्न असेल आहे , एका वेळेला एक कथा लिहायचा प्रयत्न करेल आणि भाग लवकर पोस्ट करायचा पण प्रयत्न असेल आहे. तसेही आता प्रो ब्लॉग हे ऑप्शन आले आहे , त्यामुळे वेळेवर कथा मिळत आहेत. 

            तसे तर खूप आहे शेअर करायला , पण आता आटोपते घेते . My big support system in the writing field is Sanjana mam ❤️ , त्यांचे कितीही आभार मानले तरी कमी पडतील . तसेच योगिता mam , Ira परिवार , सगळे माझे वाचक फ्रेंड्स आणि माझे सगळे सगळे लेखक फ्रेंड्स , सर्वांचे खूप खूप आभार … अशीच साथ नेहमी असू द्या . कधी काही चुकले असेल तर bigवाले Sorry . कोणाशीच स्पर्धा नाही करायची , स्पर्धा असेल तर माझीच माझ्या सोबत असेल आहे …. इथे फक्त मन जिंकायला आले आहे , मन जिंकायची आहेत . 

          लिखाण करणे कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता …. पण हा लिखाणातील एक वर्षाचा प्रवास बघून असं वाटतेय आता स्वप्न बघावी ….. लेखक बनेल की नाही माहिती नाही पण एक मनोरंजन आर्टिस्ट नक्कीच बनता येईल. 

           

              वर्षपूर्ती झाली आहे …. आता स्वप्नपूर्ती कडे वाटचाल …. पण आपल्या सगळ्यांची साथ हवी असेल आहे. 

                        Ira चे हे व्यासपीठ असेच बहरू देत , हीच सदिच्छा !! 

    

         Happy friendiversary Ira !!  

                   Love you all !!

                    ! Happy Me !