वारसा हक्क

Varasa



असे नाही की मला आई नव्हती
असे ही नाही की काकुला मुलं होणार नव्हते

तरी आमची आर्थिक ओढाताण होत असल्यामुळे आणि मला नीटसे तसेच सकस खायला मिळत नव्हते असे ही नाही..पण माझे शिक्षण खुंटून राहू नये ,म्हणून मला जणू तिने मुद्दाम संघमताने विना कागदपत्रांचे सोपस्कार न करता दत्तकच घेतले होते..

मी आई बाबांकडे वाढत होतो, खात पीत होतो, पण फक्त माझ्या सगळ्या आनंदाचे आणि भवितव्याचा बिडा काकूने उचलायचा ठरवला होता... ते ही कोणता गाजा वाज्या न करता..

ह्या हाताने केलेले पुण्य त्या हाताला न कळू देत ती हे पुण्य करत होती...तिने जणू मला दत्तकच घेतले होते.. तिच्या उदरात जन्माला आलो नसलो तरी तिच्यासाठी मी एक बाळ होतो.. तिच्या घासातला घास जसा तिच्या मुलासाठी ठेवत तसा माझ्यासाठी ही ठेवत..

ती काकू खूप महान होती, ती आई नंतर माझे पहिले श्रध्दा स्थान होती..

तिने मला ते सगळे सुख दिले जे ती तिच्या मुलाला देत होती..कोणी जर विचारले तुझे आदर्श कोण तर ,मी म्हणत / माझी काकू /

त्यात ती म्हणत मी फार काही केलं नाही रे.. पण आईने मला सांगितले की तुला मावशी नाही पण तुझी काकू ही मावशी पेक्षा कमी नाही...मी तर म्हणते मी फक्त जन्म दिला पण ती तुला जणू सूर्यप्रकाशाकडे घेऊन गेली...

लोक भले ही म्हणो, आई मरो मावशी जगो, पण मी म्हणेन अशी काकू सगळ्यांना मिळो..


अभय आज त्याच्या बायकोला त्याच्या आयुष्यातील आदर्श स्त्री बद्दल सांगत होता..

त्याची काकू आज जाऊन वर्ष झाले होते तरी ती अजून ही गेली नव्हती ,ती पदो पदी त्याच्या विचारात आणि आचरणात दिसत होती.
आणि म्हणूनच त्याने तिचा वारसा जपण्यासाठी एक अनाथ मुलं दत्तक घेतले होते..त्याचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी त्याने उचलली होती..

काकूच्या नावाने गावातील शाळेला गरीब मुलांसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी आर्थिक मदत देण्याचा प्रण केला होता...

काकूंचा वारसा त्याला पुढे घेऊन जायचा होता..