Jan 19, 2022
नारीवादी

वरमाई

Read Later
वरमाई

आज मालतीच्या मुलाचं रोहनचं लग्न होतं.. मालती अगदी दिमाखात मिरवत होती.. लग्न ठरून महिना झाला होता.. सगळी तयारी, लगबग चालू होती.. तिला कशातही कमी सोडायची नव्हती.. त्यामुळे तिने आटोकाट प्रयत्न केला होता.. सारं काही तिच्या मनाप्रमाणे चाललं होतं..

अक्षता पडल्या.. सगळे विधी पूर्ण झाले आणि मालती एका रूममध्ये जाऊन बसली.. मुलीचे बाबा काही कामानिमित्त त्या रूममध्ये गेली असता तिला एका बाजूला रोहनची आई बसलेली दिसली.. त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर मालती रडत होती..

"अहो ताई, काय झालं?" मुलीचे बाबा 

"काही नाही हो.." मालती

"आमच्याकडून काही चुकलं का?" मुलीचे बाबा 

"तसे काही नाही.." मालती

"मग तुम्ही रडत का आहात?" मुलीचे बाबा 

"मला माझी पाठवणी आठवली.. माझे लग्न झाले आणि आई वडील हे जग सोडून गेले.. नंतर माहेर म्हणून काही शिल्लकच राहिले नाही.. चार दिवस कधी माहेरी राहायला मिळाले नाही.. कारण मला कुणी भाऊ बहीण नाहीत.. कधी गोड कौतुक झाले नाही.. माहेर म्हणून काहीच शिल्लक राहिले नाही.. त्यामुळे कोणत्याही मुलीची पाठवणी होऊ लागली की, मला असंच रडायला येते.. खूप वाईट वाटते.. जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा नव्या होऊन समोर येतात.. त्यामुळे थोडसं.. पण तुमच्या मुलीला मी कधीच अंतर देणार नाही.. तिला माहेरची आठवण येऊ देणार नाही.. इतकं तिला प्रेम देईन हा माझा शब्द आहे.." मालती

"तुमच्यासारख्या सासूबाई मिळाल्या म्हणजे आमची पुण्याईच आहे हो.. मुलगी सुखात राहिली की आईवडीलांची काळजी मिटते.." मुलीचे बाबा 

"माझ्या सासूबाई खूप कडक आणि शिस्तीच्या होत्या.. पण मी त्यांच्यासारख मुळीच वागणार नाही.. आपली सून ही कुणाची तरी लेकच असते ना.. मग तिला समजून घेतलच पाहिजे.." मालती

"आता तुम्हाला नव्याने माहेर मिळेल.. मी माझ्या मुलीसोबत तुमचेही माहेरपण अगदी आनंदाने करेन.. आता हेच तुमचे माहेर.. तुम्ही हक्काने हवे तेवढे दिवस या आणि तुमचे कोड कौतुक करून घ्या.. आपणच जर बदल केला तर सगळं काही सुरळीत होतं.. तुम्ही माझ्या विहीणबाई नाही तर माझ्या बहिणीच आहात.. मॉडर्न जमान्यात विचारही मॉडर्न नकोत का?" मुलीचे बाबा 

"हो आज मला एक भाऊ मिळाला.. खरंच खूप छान वाटतंय आता.. अशीच नात्याची वीण मजबूत करायला हवी.. मगच जगण्याला अर्थ आहे.." मालती

"हो.. आज मलाही एक बहिण मिळाली.." असे ते म्हणाले 

आणि मालतीबाई परत दिमाखात लग्न मंडपात गेल्या.. कारण आज त्या वरमाई ज्या होत्या..
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..