वारी.. वारकरी.. विठ्ठल

Vari


वारी..


महाराष्ट्रातील. संतांच्या भूमीत.. शेकडो वर्षे चालत आलेली परंपरा वारी. वारी म्हणजे वारंवार दरवर्षी पिढ्यानपिढ्या चालत चालत, ऊन - वारा - पाऊस यांची परवा न करता मुखी नाम विठ्ठलाचे घेत. लाखो पाऊले चालत, टाळ वाजवत, हातात भगवा झेंडा घेऊन, डोक्यावर विठ्ठलाला आवडती तुंळस घेऊन, चालत, धावत, फुगडी खेळत, पावली खेळत, ठेका थरून नाचत, शिस्तबद्ध पद्धतीने, पालख्या, रिंगण सोहळा करत. इंद्रायणी नदीच्या पात्रात आणि विठ्ठलाच्या नामात न्हाऊन.. ध्येय एकच पंढरपूरला आषाढी एकादशीला त्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन रूख्मिणीचे दर्शन घेणे.. सगळा चालण्याचा शीण जाणार त्या विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवताच. आयुष्य सार्थकी लागते.


वारकरीना रस्त्याने चालत असताना काही कमी पडत नाही. जेवण दिले जाते गावाकडून. शासन वैद्यकीय सेवा दिली जाते. कुठे चालून पाय दुखत असतील तर पाय चेपून दिले जाणारे सेवा देतात. वारकऱ्यांची सेवा करून धन्यता मानली जाते. किर्तन, भारूड, पोवाडे वारकरीना रस्त्याने ऐकायला मिळतात. लाखो दिंड्या, लाखो वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात. कुठेही काहीही अडचण येत नाही. सगळे आनंदी आनंदात पार पडते. विठ्ठलाच्या कृपेने.. विठ्ठल बाप सगळे संभाळून घेतो.


वारी म्हणजे उत्साह.. वारी म्हणजे भव्य सोहळा.. वारी म्हणजे विठ्ठलाला भेटण्याचा परमानंद.. वारी म्हणजे मनाला शांती.. वारी म्हणजे प्रत्येकाने आयुष्यात एकदा नक्कीच घ्यायला हवा असा दिव्य अनुभव.


विठ्ठलाची भेटीची ओढ असते. तोच विठ्ठल जो माय आणि बाप आहे. ज्याच्या रुपाचे वर्णन मी पामर काय करू. शेकडो अभंग ज्याच्या साठी रचले आहे. तोच काळा- सावळा , चंदनाचा गंध लावणारा, ज्याच्या कानात माश्याच्या आकाराचे कानातले आहे. तो कमरेवर हात ठेवून यूगानूयुगे विटेवर ऊभा आहे. ज्याच्या गळ्यात कौस्तुभ मणी आहे. पिवळे पितांबर नेसले आहे. ज्याच्या उजवीकडे आणि डावीकडे सारखेच आहे समान दोन्ही बाजूला. "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी"


आषाढी एकादशीचा दिवसभर उपवास केला जातो. विठ्ठलाची यथासांग पहाटे पुजा केली जाते. मुख्यमंत्री सपत्नीक पूजा करतात. विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मुख्यमंत्री ना दिला जातो. विठ्ठलाला भेटायची ओढ येणाऱ्या वारकरीना. "भेटी लागे जीवा.." तो विठ्ठल आणि भक्त यांचे नाते आई-बाप आणि मुलाचे आहे. मग सगळ्या लेकरात समानता. वारीत स्त्री - पुरूष भेद नाही. जातीभेद नाही. गरीब - श्रीमंत भेद नाही. किती थोर संत होऊन गेले. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत सावता माळी. संत नामदेव, संत मुक्ताई, संत जनाबाई.... न जाणो कित्येक संत भक्त त्या विठ्ठलाचे.


विठ्ठल हा माय बाप.. पंढरपूर हेच माहेर.. मग उणे काय आहे. स्त्रीयांच्या मनाचा हळवा कोपरा माहेर आणि आई-बाप किती आणि काय सांगू महिमा असे होऊन जाते. ज्याचे भक्त महान आहे. पुंडलिक त्याचे नाव विठ्ठलाच्या आधी घेतले जाते आणि धन्य तो विठ्ठल ज्यांनी पुंडलिकाचे नाव आधी घ्या असे सांगितले." माझे माहेर पंढरी.. आहे भिवरेच्या तिरी.."

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.


सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®