वर्गमित्र भाग 6

मैत्रीच्या हळुवार नात्याला स्पर्श करणारी भावस्पर्शी कथा वर्गमित्र जरूर वाचा

वर्गमित्र - 6
©®राधिका कुलकर्णी.

ठरल्या प्रमाणे प्रसादने पाठवलेला माणूस दारात दत्त म्हणून उभा होता.
"मॅडम बील...."
त्याने बिल माझ्यासमोर धरले.
मी लिफाफा तयारच ठेवला होता.
"ये आपके साहब को दिजीए"
"और बिल मॅडमजी??"
फार अदबीने त्याने पुन्हा विचारले.
"बिल उसी पॅकेट मे रखा है"
"और कोई मेसेज है सर के लिए?"
"जी हांऽऽ..उनसे कहना पॅकेट मिलते ही मुझे मेसेज करे."
तो कडक सलाम ठोकत( जणू मी पण साहेबीण बाई कोणीतरी!!)  निघूनही गेला पाच मिनीटात.
गंम्मतच वाटली.
        # # # # # # # #
आता प्रतिक्षा होती ती लिफाफा मिळाल्यावर प्रसादची प्रतिक्रीया बघण्याची.
क्लासची वेळ झाली होती.मुले केव्हाही येतीलच.

क्लास चालू असताना फोन सायलेंट मोडवरच असतो नेहमी कटाक्षाने.माहितीतले लोक त्यावेळी फोन करत नाहीतच पण तरिही मी काळजी पुर्वक बंदच ठेवते व्हॉल्यूम.
परीक्षा जवळ आल्याने आता फक्त उजळणी आणि पेपर्स सोडवून घेणे असेच चाललेले होते.
काही अडचणी शंका सोडवणे ह्यासाठी फक्त माझी तिकडे उपस्थिती गरजेची.
म्हणतात ना रिकामे डोके भूताचा कारखाना....तसे
उगीचच नको-नको ते विचार डोक्यात येत होते.
विचारांना झटकून मी कामावर लक्ष केंद्रीत केले.
      # # # # # # # # #
क्लास संपले.जरा रिलॅक्स करता करता फोन वर नजर फिरवली.
2-3 तास बघितलेच नव्हते फोनला.
बापरेऽऽऽ!प्रसादचे 3/4 मिस्डकॉल्स येवुन गेले होते.
मेसेजही होता
"बिझी?"
"कॉल व्हेन फ्री."
मी त्याचा नंबर डायल करत होते एवढ्यात त्याचाच कॉल.
"हॅलोऽऽऽअरे पॅकेट मिळाले ना?
चेक केलेस का?
उघडून बघ पाहू सगळे नीट आहे ना." 
माझी सरबत्ती सूरु झाली.
अगं थांबऽऽ थांबऽ...!
मी फक्त पॅकेट मिळाले हे सांगायला फोन केलाय ग बाई.
"मीही बिझीच होतो इतक्या वेळपर्यंत.आज निघायचेय ना मला." 
"20:00 hrs ची फ्लाइट आहे.
वेळ झाला की निवांत बघेन आणि काय आहे माहितीच आहे की त्यात काय बघायचेय."
चल जरा आवरतो आणि मग बोलू.
अरे होऽजे बोलायचे होते तेच विसरलो.
दोन दिवसात इतक्यांदा फोन होवून पण महत्त्वाची गोष्ट विसरूनच गेलो...
"एवढे काय महत्त्वाचे रे?" मी हसुनच विचारले.
अगऽ तुझ्या घरी आलो,इतक्यावेळ बसलो जेवलो पण साधे कौतुक पण केले नाही मी.

खरच मनापासु सांगतोय तुझे घर,कूटुंब,मुले सगळेच खूप छान आहे.
इस्पेशली युवर हजबंड श्रीधर  रिअली जेम ऑफ अ परर्सन!आय मस्ट टेल यू..!
जेवण तर अप्रतिमच!

त्या दिवशी मी जरा साशंक होतो की नवरा कसा रिअॅक्ट होइल तुझा कोणीतरी मित्र येतोय म्हणल्यावर.?
म्हणूनच घाईघाईत घेतलेले ते गिफ्ट मुलांचे वॉशरूम वापरले तेव्हा तिकडेच ठवले. वाटले की मी उघडपणे गिफ्ट आणलेले तुझ्या नवऱ्याला आवडले नाही तर.?
पण त्याच्याशी बोलताना जसजसा मी सहज होत गेलो मला वाटून गेले की  त्याच्या समोरही गिफ्ट दिले असते तरी चालले असते इतका श्रीधर मोकळ्या स्वभावाचा आहे.
तूम्ही दोघे एकमेकांशी खूप सहज वागता नवरा बायको पेक्षा मित्रत्वाचे नाते जास्त आहे तुमच्यात.
खूप कमी जोडप्यात इतके समन्वय असते हं.
रिअली व्हॉट आय फिल यू नो.यु बोथ कॉमप्लिमेंट इच ऑदर सिरियसली!! मनापासुनची प्रतिक्रीया देतोय हं!!

पण चूकलेच माझे हे पटतेय मला.
बरेच झाले परत केलीस ती गिफ्ट.
बाकी श्रीशी खूप नवीन सुंदर नाते निर्माण झाले. छान मित्र मिळाला श्रीच्या रूपाने.
अॅम रिअली सो हॅप्पी..

एऽऽ आता तुम्ही यायचे हं माझ्या घरी. 
इतकी सुगरण नाहिये माझी बायको पण नक्की चांगलेच आदरातिथ्य करेल तुमचे अॅम शुअर "
आपल्या वाक्यावर स्वत:च जोरजोरात हसला.
       # # # # # # # #
माझे  तो काय बोलतोय इकडे लक्षच नव्हते.कारण मला अपेक्षित जे होते ते तर तो लिफाफा उघडल्यावरच बोलणार होता.
त्याची ती प्रतिक्रिया आणि त्या नंतरचा फोन ऐकायची उत्सुकता मला सर्वात जास्त होती.
"बर चल."
"नंतर बोलतो.बाऽऽय!"
"हम्मऽऽ!!"
मी भानावर आले तोवर फोन बंद झाला होता.

## ## ## ## ## ## ## 
 ( क्रमश:6)
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all