वर्गमित्र भाग 20

मैत्रीच्या हळुवार नात्याला अलगद उलगडणारी भावस्पर्शी कथा वर्गमित्र.

वर्गमित्र-20
®©राधिका कुलकर्णी

प्रसाद माझ्या जवळ येवून पोहोचला.तोही माझ्या प्रमाणेच आश्चर्यचकीत,काहीसा संभ्रमीत.
चेहऱ्यावर अचानक मला समोर बघून झालेला आनंद सारे स्पष्ट दिसत होते.
" wowAshu!!!
you looking stunning &vibrant in sari!"
"अग् पण इकडे कशी तू?"
त्याला मीही उत्तरादाखल प्रतिप्रश्न केला,
"तू काय करतोएस इकडे?"
प्रसाद:माझ्या भाच्चीचेच लग्न आहे ना.मी कालपासूनच इकडेय.
आशू:अरे मी ही लग्नालाच आलेय.काल मेसेज केला नव्हता का?तेच.
श्रीच्या ऑफिसमधल्या मित्राचे लग्न आहे.
काय पण योगायोग ना?
आपल्या दोन्ही लग्नाचा हॉल एकाच ठिकाणी.
अॅम सो हॅप्पी,तूला इकडे बघून."मी आपली बोलतच सुटले.
प्रसाद:मी तूला दुरून आधी बघितले,आणि विश्वासच बसेना की तूच आहेस.एकदोन हाकाही मारल्या पण तू फोनमधे बिझी होतीस.म्हणून मग कॉल केला.
कुठेय श्री?"

"अरे, तो वर त्याच्या ऑफिस फ्रेंड्स बरोबर आहे.
मी खरेतर फोनमूळे खाली आले.तो वाट बघत असेल माझी.त्याला नाही माहित की मी इकडे खालीय ते."
चल ना वर जावू त्याला भेट तूही."
" yes,offcourse!! चल ना."
आम्ही दोघेही वर गेलो.श्रीला ही प्रसादला बघून तसेच आश्चर्य अन् आनंद होत होता. पून्हा त्याच जुजबी चौकशा काय कसा वगैरे.
गप्पा आटोपत्या घेत
प्रसादने त्यांच्याकडे जेवणाचा खूप आग्रह केला दोघांनाही.
मग ह्यावर उपाय म्हणून आम्ही आमची विभागणी केली.म्हणजे श्री वर त्याच्या मित्राबरोबर आणि मी प्रसादच्या लग्नात गेले.
त्या निमित्त प्रसादच्या सर्व फॅमिलीची ही ओळख होणार होती.
माझी त्याच्या बायकोशी मेधाशी पहिल्यांदा भेट होणार होती.सगळीच एक्साइटमेंट होती.
       # ## ## ## ## #
प्रसादने सगळ्यांच्या ओळखी करून दिल्या.त्याची बायकोही छान बोलली.मुलेही गोड. त्याची छकूली तर लग्नात मस्त मिरवत होती करवली होती ना.
नंतर जेवताना हळूच प्रसाद म्हणतो.इतक्या गडबडीत आता आपले बोलणे शक्य आहे का?
मी म्हणले, मला काहीच प्रॉब्लेम नाही.तू बघ कसे जमवतोस.कारण हे तुझ्याच घरचे कार्य आहे.मधेच सोडून जाणे तूला शक्य असेल तर जावू कुठेतरी बाहेर.मी सांगते तसे श्रीला.
हो ग बाई! तूला काहीच प्रॉब्लेम नाही पण माझी बाई ओरडेल ना.ऐन लग्नातून मैत्रिण भेटली की गेलात लगेच सगळे सोडून..
हाहाहाहाहा..
मला हसू आवरत नव्हते.
       # ## ## ## ## #
"मग सांग कसे करूयात?इकडेच बोल नाहीतर.
बाहेर बसू कट्ट्यावर."
एऽऽऽऽ वेडीएस का? काही काय? कोणी बघितले तर उगीच नसती आफत.
नको बाहेर.
"मग इथेच बोल"
"काय आहे एवढे बोलायजोगे?
कळू तर दे."
नाही ग.अशा घाईत सांगणे शक्य नाही.निवांत भेट व्हायला हवी.
"तुम्ही परत कधी निघताय मुंबईला?"
"मला नाही माहीत रे."
"श्री निघ म्हणला की निघणार."
"तसे नाही.जर तूम्ही रात्री लेट निघत असाल तर भाच्चीला वाटी लावून हॉल चार ला रिकामा केल्यावर मग मी मोकळा होइन."इति प्रसाद.
"नाही रे.इतक्या वेळ नाही शक्य बहूतेक.कारण मग पोहोचायला उशीर होइल आणि मूले घरी वाट पहात बसतील."
"फार फार तर दोन ला निघू."
काय ग हे.मला किती बोलायचेय अन् वेळ मिळत नाही.आज भेटलो तेही इतक्या विचित्र योगायोगाने.ज्यात मी इच्छा असूनही कार्य सोडून येवू शकत नाहीये..
        # ## ## ## ## #
मग पूढे काय आता?
 मीच प्रश्न केला त्याची झालेली कोंडी बघून.
"आता काय!! पून्हा दुसऱ्या निवांत भेटीची वाट पाहणे.एवढेच हाती आहे."
"अरे देवा!! आता पून्हा कधी भेट ती?
मला तर नाही शक्यता दिसत लवकर."
" काळजी का करतेस एवढी.मीच येइन की.नाहीतरी ऑफिसच्या कामानी मी येतच असतो मधून अधून.
तसा आलो की भेटू."
बर मग ठिक आहे.ये तू कधीही.
चल मी निघते आता.श्रीला वाटेल दिले सोडून मित्र भेटला की.
"ए, थांब ना जरावेळ अजून.मनच भरत नाहीये बोलून."
"काहीतरी सुटतेय असे वाटतेय."
अरे अरे!! बस बस.किती डायलॉगबाजी!!
आहे मी.बोल.
हाहाहा..तसे नाही ग सखे.म्हणजे भेट झाली तरी बोलणे झाले नाही.म्हणून काहीतरी सुटल्यासारखे वाटतेय"
आणि तसेही तुझ्याशी बोलतच रहावे वाटते. 
         # ## ## ## ## #
आजकाल आपले बोलणे कमी होतेय माहितीय मला पण तुझ्याशी बोलून खूप बरे वाटते.माहित नाही काय पण तूला सांगून शेअर करून मन हलके अन् फ्रेश वाटते.
हम सेम हिअर प्रसाद.
बोलू लवकरच.पण आता निघते.
त्याने जाताना बाय म्हणताना अचानक हात हातात घेतला.
तो स्पर्श काहीतरी वेगळीच अनूभूती देत होता.
      # ## ## ## ## #
माझा हात सोडवून घेत मी निरोप घेवून परतले.पण पाठीमागून कोणीतरी पाठलाग करतेय असा सतत भास होत होता.लिफ्ट मधे शिरताना समोर नजर गेली तव्हा प्रसादची नजर मलाच बघत होती.
(क्रमश:20)
®©राधिका कुलकर्णी.

-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all