तिसऱ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

Vardhapan Dinachya Shubhechha


नमस्कार !!
अभिनंदन !! अभिनंदन .. त्रिवार अभिनंदन !!!
आज आपल्या ईरा ब्लॉगिंगचा तिसरा वर्धापन दिवस आहे .. मला तर एखादा सण आहे असेच वाटतंय ..ईरा ब्लॉगिंगच्या सर्व टीमचे लेखकांचे , वाचकांचे सर्वांचे अभिनंदन ..
संजना मॅडमनी एक आगळी वेगळी संकप्लना सत्यात उतरवली आणि माझ्या सारखे अनेक लेखक उदयास आले आणि लेखकांना त्यांची योग्य दिशा सापडली..
ईराने मला नवीन ओळख दिली , ध्येय दिले आणि मला आवडेल असे करायला काम दिले .. एक लेखिका म्हणून मला ओळख दिली .. अनेक बक्षिसे दिली .. घर ट्रॉफीजने भरलं ..
‘संघर्ष एक जीवन कथा’ हे पुस्तक मी माझ्या आई वडिलांच्या आयुष्यावर लिहिले .. माझे वडील आता ह्या जगात नाहीत पण जेव्हा त्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक हातात घेतले तेव्हा त्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू मी अनुभवले .. हा स्वर्गीय अनुभव फक्त आणि फक्त ईरा मुळेच शक्य झाला ..
शुभारंभ या प्रेरणादायी कादंबरीला पहिला नंबर मिळाला म्हणून तेही पुस्तक आम्ही प्रकाशित केले .. आजही जे वाचक हे पुस्तक वाचतात ते माझे खूप कौतुक करतात .
ईरा वर ‘जोडी तुझी आणि माझी’ मध्ये सर्वात पहिली जोडी माझी आणि माझ्या मिस्टरांची आली होती .. खूप मज्जा आली आणि सेलेब्रेटी फील आला त्या दिवशी ..
माझ्या लेकीच्या शाळेत ८ मार्चला मला गेस्ट पॅरेण्ट म्हणून बोलावण्यात आले .. आणि ह्या सगळ्याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे ईरा ब्लॉगिंगने लेखिका म्हणून दिलेली ओळख ..
आज ईरा वर ४० लाखाच्या वर माझे व्ह्यूज आहेत आणि जवळ जवळ ६०० हुन अधिक ब्लॉग्स मी पोस्ट केलेत . हे सर्व अजून वाढतच जाणार आहे .. कारण वर्षानुवर्षे ईरा ब्लॉगिंग नावाच्या छोट्याश्या रोपट्यापासून मोठे वटवृक्ष होणार आहे आणि याचे साक्षीदार तुम्ही आणि आम्ही असणार आहोत.
संजना मॅडम म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहेत .. सर्वांना एकत्र जोडून ठेवण्याचे काम खूप छान पद्धतीने करतात.. शांत , सहनशील , हसतमुख , सुंदर तितक्यात तडफदार व्यक्तिमत्वाच्या आहे .. पटकन निर्णय घेतात हा त्यांचा गुण मला खूप आवडतो .. हर प्रॉब्लेम का सोल्युशन है उनके पास .. शिवाय इतक्या कामाच्या व्यापातून स्वतः मधला लेखक जागृत ठेवला आहे .. खऱ्या अर्थाने लीडर आहेत .. द बॉस आहेत ..
ईरा ब्लॉगिंग ची मी कायम ऋणी आहे आणि ईरा फॅमिलीचा एक भाग आहे याचा मला खूप अभिमान आहे .
सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार !! तुमच्या मुळे आमच्या सारख्या लेखकांना हुरूप येतो आणि लिहीत जातो .. ईराचे आभार कारण ईराने हे खुले व्यासपीठ सर्वांसाठी उभे केले आहे .. शिवाय आर्थिक मानधनही मिळते त्याचे एक वेगळे समाधान आहे ..
ईरा ब्लॉगिंगच्या सर्व लेखकांना , वाचकांना , योगिता मॅम , टेकनिकल सपोर्ट सर्वांना शुभेच्छा !!
‘टुगेदर एव्हरीवन अचिव्हस मोअर ‘ द्याट्स Team ..
अशीच आपली टीम अजून घट्ट होऊन मस्त एकत्र काम करू असा संकल्प आज तिसऱ्या वर्धापनाच्या दिवशी करू.

सौ. शीतल महेश माने