वांझ एक बोचरे टोमणे

Nariwadi

वांझ एक बोचरे टोमणे 

हेमंतरावांच्या घरी नातू जन्माला आला, 
सगळीकडे आनंदी आनंद झाला, 
बाळाची आजी तर कुठेच मावत नव्हती,  
जो दिसेल त्याला 

मी आजी झाले हो 
मला नातू झाला .....
मला नातू झाला सांगत सुटली होती, 

साखरपान  वाटून झाले, 
देवदूतांचे नवस फेडून झाले, 
बाळाचे व बाळाच्या आई चे सुख सोहळे चालू झाले 

आता बाळाचे नाव ठेवायचे वेध लागले, 
आजीबाई तर रोज यादी करण्यात व्यस्त होत्या 
सकाळ झाली की त्यांचे चालू होयचे याला बोलावू त्याला नको 

बाळाची आई हे सगळं फक्त कौतुकाने बघत होती, 

शेवटी आजी च्या आवडीच्या वारी बाळाचे नाव ठेऊ म्हणून ठरले एकदाचे , 


आजीबाई ला महादेवाच्या कृपेने नातू झाला असा त्यांचा समज होता म्हणून त्यांनी सोमवारी नामकरण सोहळा ठेवला, 


जवळचे सगळे पाहुणे बोलावण्यात आले, 

आजीबाई च्या व बाळाच्या आई च्या माहेरचे देखील सगळे बोलावण्यात आले, 
आता आजी खुश च इतकी होती की आजी ने येणाऱ्या पाहुण्यांसाठी स्वतः च्या हाताने साड्या आणल्या, 

नामकरणाचा दिवस उजाडला, 
सगळे पाहुणे राहुले जमा झाले, 
आजी तर मस्त नाविखोरी भरजरी केशरी रंगाची साडी घालून नातवाला हातात घेऊ घेऊ मीरत होते , 
इतके काम होते आजी माघे पण आजी काही नाताला सोडत नव्हती, 

आजी चे भाऊ, बहीण, त्यांची मूल सगळे आले, 
त्याचाच बाळाच्या आई चे देखील गणगोत आले, 


सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या 
संध्याकाळी कार्यक्रमाला सुरवात झाले, 

आजी नि स्वतः जातीने लक्ष देऊन पाळणा सजवला होता,

संध्याकाळ ची वेळ झाली कार्यक्रमाला सुरवात झाली, 
आजी नि पाहुण्या रावल्यासोबत 
गावातील व भाउकितील बायका देखील बोलवल्या होत्या, 
सर्व बायका गोल करून बसल्या 
नातू अजूनही आजी च्या च मांडीवर होता, 
बाळाची अशी जवळ उभा राहून कुणी काय आणले ते आजी च्या हातात देत होती, 
तेवढ्यात अनिता आली 

अनिता म्हणजे बाळाची मावशी, 
तसे आजी ने लटकेच बोलावले होते तिला 
पण तिहाली वाटले नाही गेलं बर बहिणीच्या संसारचा  प्रश्न आहे, 

म्हणून ती आली 
तिला बघून आजी 
ला आनंद काही झाला नाही 
पण आजी ने तसे दाखवले नाही, 

ती देखील इतर बायकात जाऊन बसली, 
बायका गाणे म्हणत होत्या, 
कुणी गप्पा मारत होत्या 
तर कुणी आजीचे गोड कौतुक करत होत्या 


पण आजी व्यस्त होती नातवामध्ये   
शेवटी कुणीतरी म्हणाले 

"अहो आजीबाई आता द्या की नातू आत्या कडे त्या टाकतील पाळण्यात " 

"हो हो 
घे ग ....
म्हणत" 

त्यांनी आपल्या लेकीच्या हातात बाळ दिले 


"हळू टाक ग 
त्याचे पाय सरळ कर 
मान नीट कर 
त्याला काही टोचत का बग 
ते फुल बाजूला कर बर डोळ्यात जाईल त्याच्या 
" बाळ हातात दिल्यापासून त्यांच्या सूचना चालू झाल्या 


"घे तूच टाक 
आई मी दोन लेकरांची आई झालेय आता व तुझ्या नातवाला काय पडू देणार आहे का ???" 
शेवटी आई ची च लेक ती 
आजीवर ओरडत म्हणाली 

"हो ग बाई 
पण सांगितलं" 
आजी माघार घेत म्हणाल्या 


"चला ग 
इकडून दोन जणी व तिकडून दोन जणी या 
बाळाची आत्या, मामी व मावश्या तुम्ही चला ग तुमचा मान आहे " 
मोठ्या सासूबाई म्हणाल्या 


त्यांच्या या बोलण्याने सगळ्या उठल्या व पाळण्याकडे निघाल्या 
तेवढ्यात हळूच आजी नि अनिता चा हात दाबत तू जाऊ नको असं ईशारा केला, 

अनिता ला काही कळत नव्हते काय होतंय पण तोपर्यंत बाकीच्या सगळ्या पाळण्याजवळ
पोहोचल्या होत्या म्हणून ती देखील गेली नाही , 


बायकांनी चालू गेले 

कुणी गोपाळ घ्या ......
कुणी गोविंद घ्या .....

कुणी गोपाळ घ्या .......
कुणी गोविंद घ्या .....

तेवढ्यात एक बाई म्हणे 

"अग तू मावशी आहेस ना 
तू हो ना पुढे " 

तशी अनिता पुढे सरकली 
ती बाळ हातात घेणार तोच आजी  मध्ये आल्या व नाताला उचलून घेत 

"संपला ग कार्यक्रम 
कुणीही जेवनाशिवाय जाऊ नका 
समजलं का ???
 त्याला भूक लागलीये मी त्याच्या आईकडे देते म्हणून त्या बाळाला घेऊन गेल्या " 


अनिता तोंडात मारल्या सारखी खिन्नपणे जागेवर उभा राहिली

आपल्या बहिणीच्या सासूने असे का केले हे न समजण्या इतपत ती मूर्ख नव्हती 
तिच्या हातापायातील त्राण गेला ती आज स्त्री जातीला कलंक ठरली होती 
तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, तिने त्याच पालण्याचा  आधार केला 
व त्याला घट्ट पकडून रडू लागली, 
कुणाचे तिच्याकडे लक्ष देखील नव्हते पण गर्दीतून आवाज आला 
अहो वांज आहे ती 
स्वतः ला तर लेकरुबाळ झाले नाही मग अशा कार्यक्रमाला कशाला यायचे लोकांच्या लेकराला नजर लावायला 
हे तिलाच कळाले पाहिजे " 

हे शब्द तिच्या काळजात शिरले 
धारधार शास्रने वार करावा असा कुणीतरी काळजावर आघात केला होता, 
तिने सगळी व्रतवैकल्ये केले, उपासतापास केले, डॉक्टर चे उभारठे  झिजवले पण तिला मुलं काही होत नव्हते, 

ती सरळ बाहेर पडली व गाडी चालू करून घरी पोहोचली 
आपल्या बायकोला रडताना बघून विशाल ने समजून घेतले काय झाले असेल, 

ती विशाल जवळ आली व म्हणाली 
"मी कधीच आई होणार नाही का रे "

तो तिच्या जवळ गेला 
व ती प्रतिसाद देत नाही हे कळून देखील बोलू लागला 


"हे बघ 
अनिता 
आई होणं हे फक्त तुझ्या एकटीच्या हातात नाही अग त्यासाठी मी देखील तितकाच दोषी आहे, 
आणि आई म्हणजे फक्त बाळाला  जन्म देणे आहे का ???
मग तसे असेल तर यशोदेला कृष्णा ची आई कसे म्हणू शकतो आपण, 
आई म्हणजे वास्तल्य
आई म्हणजे प्रेमळ झरा 
आई म्हणजे जगण्याला देणारी योग्य दिशा 

हो ना 
मग हे सगळं तर तू माझ्यासाठी पण करतेस, 
कधी रागावते 
कधी प्रेमाने जवळ घेते 
मग तू माझी आई नाही होऊ शकत का ??
जर तसे असेल तर तू कशी 
म्हणू शकते 
मी कधीच आई नाही होणार का रे ??
तू माझी आई तर आहेस " 

आपल्या नवऱ्याच्या या बोलण्याने अनिता गहिवरून गेली, 

खरंच मी आई झाले का यांची स्वतः ला च विचारू लागली, 

@कथेचे तात्पर्य 
मुलं होणं अगर न होणं 
हे स्त्री च्या हातात कधीच नसते त्यामुळे तिला समजून घ्या 
तिला जपा 
पण तिला कधी वांझ म्हणू नका ?? 

कथा आवडल्यास लाईक करायला विसरू नका, 


धन्यवाद