Sep 23, 2023
प्रेम

वणवा - भाग - 11

Read Later
वणवा - भाग - 11
नशिबाचा वणवा - भाग - 11

( मागच्या भागात आपण बघितले - पार्थ चं प्लेन क्रॅश होतं त्यात त्याचा जीव जातो आता पुढे..)

पार्थचं प्रेत गावाला आणलं जात, तिकडे लंडन ला सुलभा काकीं एकट्याच असतात, पार्थ आणि सानिका दहा दिवसांसाठी आलेले असल्यामुळे त्या कमी दिवस चं राहायचं मग दगदग कशाला असं म्हणून तिथेच राहतात. आता त्यांना तिकडून घेऊन येणे गरजेचे असते. काय करावं हा विचार तिघींना पण पडला होता.

सुलक्षणा ताई, सानिका आणि निशा सगळयांसाठी पार्थ चं जाणं हा मोठा धक्काचं होता, पार्थ दूर असला तरी ऑफिस च्या कामाचे नेहमी वर्कर्स कडून फोल्लोअप घेत असे. त्यामुळे बिजनेसचं कधी नुकसान झालं नाही. आपले बॉस कधीही येऊन सगळं चेक करतील किंवा कुठलीही फाईल अर्जेंट मागतील ह्या भीतीने सगळे नीट कामं करत असतं.

पार्थचं प्रेत नेलं जात. चार तासाने सगळे पाहुणे निघून जातात. निशा सुलक्षणा ताई आणि सानिकाच घरी उरतात, निशा बोलते आई आपण सुलभा काकींना तिथून इथे आणण्याची सोय करूयात, मी जाऊन त्यांना घेऊन येते. बाबांनी माझा विजा काढून ठेवला होता.

सानिका बोलते निशाताई तू एकटी जाऊन तिकडचं सगळं आवरून येशील कसं, तुला जमेल ना,निशा बोलते बरं एक कामं करूया बाबांना जरा चार दिवस होऊदेत मग आपण दोघीं दोन दिवसासाठी जाऊन जेवढं जमेल तेवढं तिकडंचं आटपून सुलभा काकींना घेऊन निघू.


सानिका बोलते, तिकडचं घर, त्याचं काय करायचं, निशा बोलते सध्या ते तसंच राहुदेत, आपण एक, दोन महिन्यांनी त्यावर चर्चा करू, निशा अगदी मोठी झाल्यासारखी वागत होती, सुलक्षणा ताई तिचं हे वागणं बघून मनातल्या मनात बोललात आता जर पार्थ च्या पाठीमागे बिजनेस कोणाकडे द्यायचा असेल तर त्यासाठी कंपनी ची धुरा नीट सांभाळणारी कोण असेल तर ती निशा आहे.

सुलक्षणाताई विचार करता करता भूतकाळात हरवल्या आणि म्हणू लागल्या, ज्या संध्याला आपण मोलकरणीची मुलगी म्हणून नाकारले, तिची पार्थशी लग्न करण्याची खूप इच्छा असूनही आपण आपल्या अहंकारापोटी त्या संध्याला जवळ केले नाही, तिच्या पोटात आपल्या मुलाचा अंश वाढत असून सुद्धा तीला आम्ही स्वीकारू शकलो नाही तीला आणि पार्थला आम्ही दूर केले त्याचं नातं पुढे जाऊ चं दिलं नाही, आणि आज त्याचं संध्याची मुलगी तोच तिचा अंश निशा आज आपल्या घराची, ऑफिस ची काळजी करतेय, संभाळून घेण्याचा, सगळं सावरण्याचा प्रयत्न करतेय.

निशा नसती तर मी आणि सानिका कशा सावरू शकलो असतो, सानिका अजून खूप लहान आहे, तीला तर बिचारीला पार्थचं जाणं अतिशय जिव्हारी लागलंय. पण निशा सगळं नीट करतेय. तेवढ्यात तिथे निशा येते आणि बोलते आई मी आणि सानिका परवा लंडनला जाऊन सुलभा काकींना इथे घेऊन येतो. सुलक्षणा ताई बोलतात हो तू म्हणशील तसं. निशा आणि सानिका जाऊन सुलभा काकींना घेऊन येतात. आता सुलभा काकीं, सानिका सुलक्षणा ताई, निशा अश्या चौघी वाड्यात राहत असतात.

निशा बोलते बाबांचं कार्य झालं की दुसऱ्या दिवसापासून मी रोज ऑफिसला जात जाईन. सुलक्षणाताई रडायला लागतात आणि बोलतात निशा तुझ्या आईवर आमच्यामुळे खूप अन्याय झाला ना गं, तुझे खूप हाल झाले ना गं, आई,बापा विना वाढलीस तू, आम्ही तुझ्या दोषी आहोत.

निशा त्यांचा हात धरून बोलते आई झालं ते झालं तो भूतकाळ होता. तुम्ही रडू नका पाहू, नशिबाची साथ नव्हती म्हणा किंवा त्या देवाच्या मनात आई - बाबाचं एकत्र येणं नव्हतं त्यामुळे जे घडून गेलं ते गेलं.

निशा पार्थ चं कार्य झाल्यावर ऑफिस जॉइन करते, आणि सर्व वर्कर्स ना पहिल्याच दिवशी सांगते आता पार्थ सरांची सगळी जबाबदारी मी सांभाळणार आहे त्यामुळे मला लागेल ती मदत तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे, सगळे तीला नीट सगळं सांगतात आणि लवकरच दोन वर्षात निशा त्यांची निशा मॅडम ( बॉस ) होते. सानिका पण अधून मधून ऑफिसला जात असते. दोघीं बहिणीं छान वागत असतात.

( पुढच्या भागात आपण निशा चं लग्न आणि तिचा संसार बघणार आहोत. )


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sonal Gurunath Shinde

लेखिका

MA - Economics And Sociology