Nov 30, 2021
प्रेरणादायक

संत साहित्यातील जीवन मूल्यें आणि मनाचे खेळ

Read Later
संत साहित्यातील जीवन मूल्यें आणि मनाचे खेळ

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


संत साहित्यातील जीवन मूल्यें आणि मनाचें खेळ...
मुल्यांमुळेच व्यक्तीला आणि समाजाला मूल्यं आहे.
संतांनी दिलेल्या जीवन मूल्यावरंच आज समाजाच्या उरलासुरला डोलारा उभा आहे.
देवाच्या अनुपस्थितीत संतांनी समाज घडविला.मूल्य रुजवली ती आजतागायत समाजाचं भलं करत आहेत.संतांनी देवाच्या अस्तित्वाबद्दल ही प्रश्न उपस्थित केले व त्यामुळे पसरणाऱ्या अंधश्रद्धे वरही प्रहार केलेला आहे.
संतांचे कोणतेच मूल्य, कोणती शिकवण आजही कालबाह्य झालेली नाही.
\"Values are caught and not taught\"
शाळेत मुल्यं रुजावी म्हणून परिपाठ आहे पण त्या प्रमाणात मूल्यं झिरपली कां?
उंबरठ्याच्या आत उंबरठ्याबाहेर मूल्य पायदळी तुडवली जात आहेत कोणत्याही प्रकारचे संस्कार जाणीवपूर्वक मुलावर केले जात नाहीत.
कुटुंबातील सदस्यांचे वर्तन, समाजातील लोकांचे वर्तन मुले पाहतात आणि त्याचेच अनुकरण करतात.
एक संस्कारहिन पिढी मुलांना संस्कार काय देणार?
संतांनी केवळ उपदेश केला नाही, त्यांचे आचरण हाच उपदेश होता.
\"आनंदाचे डोही आनंद तरंग\"
तुकाराम महाराजांचा एक अभंग घेतला तरी ही संत साहित्याची अनुभूती येईल.
सुख म्हणजे नक्की काय असतं? आनंद म्हणजे नक्की काय असतं? हेकेवळ भौतिक गोष्टींवरून कळणार नाही.
संत साहित्यातील परमेश्वराच्या सान्निध्याचा आनंद, अशी अनुभूती व त्यातून मिळणारा आनंद हा वैयक्तिक पातळीवर वेगवेगळा असू शकतो.
कोण किती व कशात समरस होतो, यावरून आनंदाचे परिमाण ठरतं. प्रत्येकाचा आनंद वेगळा, आनंदाचें क्षण वेगळें, सोहळें वेगळे.
यशोशिखरावर जाऊन, नैराश्याच्या गर्तेत स्वतःला झोकून द्यायचं नसतं.
ठेविले अनंते तैसेची रहावे, क
चित्ती असो द्यावें समाधान हे संतांनी शकवीलें आहे.
यशाच्या रस्त्यावर समाधानाचे थांबे क्षणभर विश्रांती साठी आवश्यक असतात.
सगळ्यांना सुखी माणसाचा सदरा हवांआहे. सुख म्हणजे नक्की काय असतं? ची व्याख्या हवी. ऑनलाईन सुख विकत घ्यायची तयारी सर्वांची आहे. ऑफलाइन संघर्ष केला तरंच ऑनलाइन सुख मिळेल.
माणसं, संत साहित्य हे ऑफलाइन समजण्याच्या व अंगीकारण्याच्या गोष्टी आहेत.
सुख ऑनलाईन डाऊनलोड करता येत नाही. दुःखही ऑनलाइन डिलीट करता येत नाही.
भोगणं,जगणंहेऑफलाईनअसतं. संत साहित्यातील जीवन मूल्यें अंगिकारली तर वर्तमान
सुसह्य असतं. संत साहित्यातली मूल्यं आज फक्त ऐकली जातात. वर्तमानात माणसे वागाचं तशीच वागत आहेत. संत साहित्य कळतं पण वळत नाही. संतांनी अंधश्रद्धेवर प्रहार केले त्यातील पितळ उघड केले. तरी अंधश्रद्धेचे रोपटं फोफावतंच आहे. संतांच्या फोटों चा वापर करून संतांची शिकवण ही फोटोमध्येच बंदिस्त केलं आहे. आवडत्या गोष्टी फोटोत बंदिस्त करून भिंतीवर टांगल्या जातात.
घरात माणसे व चौका चौकात आदर्शांची पुतळे धूळ खात पडलेले असताना
विषाणू पेक्षाही जलदगतीने माणसे एकमेकांवर जळण्यात व एकमेकांना संपवण्याचा आराखडा तयार करण्यात मग्न असताना
माणसांनी देवांना बंदिस्त केलं कां देवांनी माणसांना बंदिस्त केलं? हे आवाक्याबाहेरचं असताना
देव ऑनलाइन उपलब्ध आहेत पण भक्ती अजून ऑनलाईन उपलब्ध नाही
भक्ती म्हणजे मनातून मना कडचा प्रवास
रोबोटच्या मम्मीला पान्हा कसा फुटणार?
जीवनाचाही अभ्यासक्रम असतो
तो बदलला की नव्याने सामोरे जावं लागतं. नव्याअभ्यासक्रमाला जुनी प्रश्नपत्रिका चालत नाही.
अनेक प्रश्न अनुत्तरित असतांना जोड्या लावा व संदर्भासहित स्पष्टीकरण द्या? हे प्रश्न कसे सोडवणार?
माणसे आता चेहऱ्यावरून ओळखलेच जात नाहीत अशा युगात
आज काल मधूनच अचानक उध्वस्त व्हायला होतं
संपलं वाटत असतानाच नवीन अंकुर येतो
जीवन जगण्याची नवी आशा दाखवून जातो
आज अचानक कुणीतरी यावं, भेटावं.
जीवनाचा चेहरामोहरा बदलून टाकावा असं वाटत असतानाच
अचानक लक्ष जातं अडीअडचणीत, कपारीत
उगवणारे इवलेसे कोंब जगायला जे प्रवृत्त करतात.संत साााहित्य हे जगण्यासाठी असंच उपयोगी पडतं.
मनाचे खेळ......
मनाचे खेळ कधी कुणाला समजलेंत. स्वतःच्या मनाचे खेळ सुद्धा स्वतःला समजत नाहीत
कॅनव्हास वर मनसोक्त रंगाची उधळण करत सुंदर चित्र काढता येतं. सुंदर क्षणांची उधळण करुन वेगळे वेगळे क्षण सभोवताली गोळा करता येतात. क्षणांची रांगोळी काढून, मनासारखे रंग भरता यायला हवेंत. चित्र पुसता येतें, रांगोळी ही पुसता येतें. क्षणांना पुसलं कीआयुष्य संपतं.
सुखाचा इंद्रधनू पाहायचा असतो, अनुभवायचा असतो, बघायचा असतो, तो ओरबडायचां नसतो. सुख हे अनेकरंगी असतं. प्रत्येक रंग माणसाला ओरबाडून हवां आहे. सत्ता, कीर्ती, पैसा वासना, प्रेम,समाधान, यश
हे सगळं यशाच्या इंद्रधनूंत असतं. एका वेळेस एकच मिळेल व ते भोगावं.
आत्महत्या करणारे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात यशस्वी असतांतच. यशानंतर दोन रस्ते असतात,समाधान व हीनैराश्य.
नैराश्याच्या रस्त्यावर आत्महत्या भेटतें.
यशोशिखरावर असणारे जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा खरंच समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण होते.
मन ही आवाक्यात न राहाणारी गोष्ट आहे. माणसे उन्मत्त होई पर्यंत मनाचं ऐकत राहतात.संत साहित्य त्याला लगाम घालतं.मनाच्या खेळावर ज्याचं नियंत्रण आहे, तोच उत्तम आणि यशस्वी जीवन जगू शकतो. मन आवाक्यात नसलें की मनात अनेक समस्या घर करतात. मनाला कळणं आणि वळणं याचा सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. कुणाचं मन कुणावर जडेल याचे काही ठोकताळे नाहीत.प्रत्येक क्षण विविध रंगात न्हाऊन निघालेला असतों आणि तोच मनाचं अस्तित्व टिकवून ठेवतो. \"दुखी मन मेरे
जहा नही चैना वहा नही रहेना\" असं म्हणलंच आहे. क्षणांना जिंकलं की आयुष्य आपलंच असतं.क्षणांना जिंकता यायला हवं. तुमचा अखेरचा श्वास ठरवतो क्षणंच.
मनातल्या तरंगावर आपलं नियंत्रण नसतं. तरंग आपले नसले तरीही अंतरंग आपलंच असतं.आपल्या अंतरंगात आपण कधी डोकावतंच नाही, आपण नेहमी दुसऱ्याच्या अंतरंगात डोकावून तुलना करत बसतो. तुलना तुमच्या मनाला जाळतें तुमच्या मनाची राख करतें. सारखंआरशात पाहून चित्र बदलत नाही. वारसा आणि कर्तुत्व हातात हात घालून आले तर तरच आरसा दखल घेतो.मनाचा थांगपत्ता लागू न देण्यात माणसा सारखा माणसाचा हात कोणीच धरू शकत नाही.चेहरे व मुखवट यांचे नियोजन कधीच एकमेकांना पूरक नसतं. मुखवट्याची ब्लु प्रिंट चेहरा कधीही बदलू शकतो.
चेहऱ्याचा नियोजन मुखवट्या शिवाय अंमलात येऊच शकत नाही.
खरा चेहरा उघडकीला येऊ नये म्हणून मुखवटे तारे वरची कसरत करतात.
माणसं सगळं उघड़ करतील, पण मन उघड करण्याची लक्ष्मण रेषा कधीच ओलांडत नाहीत. मृत्यूनंतरही माणसाच्या मनातलं कळत नाही. शरीराने जवळ येणारे मनाने रत होतांतच असं नाही. मन खुंटीला टांगलं की माणसं मनां सारखं वागायला लागतात. मनाला विसावण्यासाठी आश्वासक खांद्याची गरज असतें. पाय धरणारे व्यक्तिमत्व व विश्वासाने विसावणारे खांदे आज दुर्मिळ झाले आहेत. मानवी संबंधाचा सगळा इतिहास मनातलं ओठावर न आल्यामुळे झाला आहे. मनानें ठरवलं तर काहीही होऊ शकतं.
आपल्याच मनाचं विश्लेषण आपल्याला करता येत नाही. आपण दुसऱ्याच्या मनातलें विश्लेषण करू शकतों कां?माणसे स्वतःच्या मनावर प्रेम करतच नाहीत, स्वतःच्या मनाला गोंजारतच नाहीत. स्वतःच्या मनाला वेळ देत नाहीत. नेहमी उपेक्षेने, तिरस्काराने मनाचे खच्चिकरण झाल्यावर नैराश्य येणार नाही तर काय? नैराश्य यावर उतारा
संत साहित्य आहे. मनाला वेळ देण्यासाठी स्वतःला वेळ काढला पाहिजे. सगळ्यांना जगाची चिंता, माणसांना वेळ हवा, संवाद हवा आणि तेच नेमकं चुकतय. मनं जिंकायची आयुधं फार वेगळी असतांत. मन प्रसन्न करां हे ठिक आहे, पण सभोवताली तसां निसर्ग हवां, तसं सौंदर्य हवं, तसं समाधान हवं. मन चांगलं ठेवां व चांगल्या मनाच्या माणसाच्या सोबत रहा, मनाचे काहीच प्रश्न राहणार नाहीत.
कुणाचे मनाने वाईट चिंतू नका. माणसांची बरीच शक्ती जळण्यात जातें
जळणं स्वतःला संपवतं
ईतरा वर जळण्यांत स्वतःच्या मनाची स्मशानभूमी कधी होते हे माणसाच्या लक्षातंच येत नाही. मन पतंगासारखं भर कटतं, त्याला नियंत्रणात ठेवणें महत्त्वाचं असतं.
संत साहित्य हा आरसा आहे , आरसाच आपल्या ला ताळ्यावर आणतो.
डॉ. अनिल कुलकर्णी
9403805153
37/1सहजानंदसोसायटी
कोथरूड पुणे 411038


.?्र््र्््र््र््र््र््र्र््र्््र््

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr.Anil Kulkarni. Pune

Retd.

Ex -Director Education Dept.