व्हेलंटाईन म्हणजे नक्की काय...?
कॉलेज म्हटलं की व्हेलंटाईन,
ऑफिस म्हटलं की व्हेलंटाईन..
कॉलेज म्हटलं की व्हेलंटाईन,
ऑफिस म्हटलं की व्हेलंटाईन..
लग्नानंतर सौंसारच्या गर्दीत कुठे असतो व्हेलंटाईन..
स्वतःकडे पाहण्यासाठी कधी नसतो टाईम,
वर्षांतून एकदा गुलाब दिला म्हणुन होत नसतो व्हेलंटाईन..
स्वतःकडे पाहण्यासाठी कधी नसतो टाईम,
वर्षांतून एकदा गुलाब दिला म्हणुन होत नसतो व्हेलंटाईन..
त्या गुलाबा पेक्षा, तुझ्या हाताने गजरा माळव..
साड्यांच्या मिऱ्या तुझ्या हाताने तुच नीट कर..
तेव्हाच मि समजेन हाच खरा व्हेलंटाईन..
साड्यांच्या मिऱ्या तुझ्या हाताने तुच नीट कर..
तेव्हाच मि समजेन हाच खरा व्हेलंटाईन..
काळजी, प्रेम, माया, आपुलकी
आम्हाला कायम हवी..
दिवसभर नाही तर रात्री तरी देशील का टाईम..?
तेव्हाच खरा समजेन मि व्हेलंटाईन..
आम्हाला कायम हवी..
दिवसभर नाही तर रात्री तरी देशील का टाईम..?
तेव्हाच खरा समजेन मि व्हेलंटाईन..
नातं घट्ट मि ठेवलंय, तुही तितकंच घट्ट ठेव
म्हणुन हात घट्ट पकड..
तेव्हाच मि समजेन खरा व्हेलंटाईन..
म्हणुन हात घट्ट पकड..
तेव्हाच मि समजेन खरा व्हेलंटाईन..
नात्यांत गैरसमज आणु नकोस,
सौंशयाला तर मुळीच थारा देऊ नकोस..
नाही तर कधी घर करून जाईल कळणार देखील नाही..
हे नीट व्यवस्थित लक्षात ठेव..
तेव्हा मि मानेल खरा व्हेलंटाईन..
सौंशयाला तर मुळीच थारा देऊ नकोस..
नाही तर कधी घर करून जाईल कळणार देखील नाही..
हे नीट व्यवस्थित लक्षात ठेव..
तेव्हा मि मानेल खरा व्हेलंटाईन..
घरच्या जबाबदाऱ्यांच्या ओझात तु थकतोस,
सौंसाराचा गाडा खेचत मि ही दमते..
रात्री तु फक्त कवेत घे,
बघ कायम साजरा होईल आपला व्हेलंटाईन..
सौंसाराचा गाडा खेचत मि ही दमते..
रात्री तु फक्त कवेत घे,
बघ कायम साजरा होईल आपला व्हेलंटाईन..
खरा व्हेलंटाईन तोच आहे,
म्हातारपणी एकमेकांची साथ द्यावी..
बस... बाकी काही नको..
म्हातारपणी एकमेकांची साथ द्यावी..
बस... बाकी काही नको..