वलय भाग ४ अंतिम भाग

जगाचा निरोप घेवून देखील कुटूंबा सोबत कायम आहे.
ठरल्याप्रमाणे किरण आपल्या बायकोला मंदिरात घेवून गेला होता. रोहिणी देखील किरण पोहचायच्या आत मंदिरात पोहचली होती. किरण मंदिरात पाय पडल्यावर आपल्याला एक महत्वाचे काम आल्याने तू दर्शन झाल्यावर रिक्षा करुन घरी जा असे सांगून किरण निघून जातो.

रोहिणी वहिनीला हाक मारत थांबवते.
" कश्या आहात वहिनी." रोहिणी.

" मी छान आहे. तुम्ही कश्या आहात." वहिनी.

मी पण चांगली आहे. असे बोलताच एक फोन वहिनीला येतो. घाबरतचं वहिनी रोहिणीला एवढा फोन घेवून येते असे म्हणत निघून जाते. दहा मिनिटांनी फोन घेवून आल्यावर आपल्या समोर आता कोणताच पर्याय उरला नाही असे वाटून वहिनी हताश झालेली रोहिणीला दिसत होते.

रोहिणी काही विचारायच्या आतच वहिनी रोहिणीला सांगायला सुरवात करते. माझ्या बहिणीला एका मुला पासून दिवस गेले होते. तिने त्याला लग्नाबद्दल विचारले तर तो हे नातं स्विकारायला नकार देतो. तर बहिणी त्या बाळाला जन्म द्यायचाचं अस म्हणत होती. आई-बाबांना हि बाब कळाली तर ते जिवंतपणीच मरण यातना भोगतील. तिला समजवण्यासाठी खूपदा फोन दिवसभरातून करावा लागतो.

आपल्या घरातल्या तुमच्या दादांपासून देखील हि गोष्ट लपवत होते मी इतके दिवस तर सासूबाईंना देखील यातलं काही सांगता येत नव्हते. आज देवळात तुम्हांला पाहिले आणि मन मोकळ करण्याची योग्य जागाच मला मिळाली असे वाटले होते.

वहिनींकडून रोहिणीने त्यांच्या बहिणीचा आणि बहिणीच्या प्रियकराचा नंबर मिळवला होता. रोहिणीने दोघांना एकाच ठिकाणी भेटायला बोलवले होते. ते दोघे एकमेकांना भेटण्या आधी रोहिणी दोघांनाही वेळ देवून स्वत: पहिली भेटली होती.

तिने एकमेकांवरचे प्रेम, काळजी, भविष्याचा आरसा दाखवत दोघांची समजूत काढली होती. बहिणीला आणि तिच्या प्रियकरला त्यांची चूक लक्षात येवून कायमस्वरुपी एक होण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता.

रोहिणीने हि बातमी वहिनीला सांगताच लग्नाच्या तयारीला लागा असे म्हणत आपल्या वहिनीची चिंता कायमस्वरुपी मिटवली होती. वहिनी आता मात्र काही न लपवता आपणहून घडलेला प्रकार किरणला सांगितला होता. केवळ या कारणामुळे नात्यात येणारा दुरावा किरणला समजला होता. दोघेही मनातून रोहिणीचे आभार मानत होते.

रवीला इंजिनीयर करता फि भरण्याकरता पैशाची गरज होती. अनेक उपाय करुनही कोणी मदत करायला किंवा लोन द्यायलाही तयार होत नव्हते. तेव्हा आपलं डाॅक्टर बनण्याचं स्वप्न अर्धवट सोडून रवीला कळू न‌ देता रोहिणीने एक फुल टाईम आणि एक पार्ट टाइम नोकरी हाताशी धरली होती.

ओव्हर टाईम करुन आणखी दोन - तीन ठिकाणी नोकरी करुन, कामचा अॅडव्हान्स मागून रोहाणीने पैशाची जमवाजमव केली. रवीचे पैसे भरुन निनावी नावाने काॅलेजची फी भरली होती. आपल्या भावाने परस्पर येवून आपली फि भरली असावी असे रवीला वाटत होते.

रोहिणी मनातून खचली होती. तिच्या स्वप्नांची माती झाली होती. भावाला इंजिनियर झालेलं पाहण्याचा देखील आनंद मिळणार होता. त्यापुढे काहीच नाही हा एकच ध्यास रोहिणीला होता.

पुढे काही दिवसातचं रोहिणी सारखी आजारी पडत होती. रवी तिला एक दिवस डाॅक्टरकडे घेवून गेला असता, तिला हाडांचा कॅन्सर असल्याचे समजते. रोहिणीजवळ फार दिवस नसल्याचे डाॅक्टर सांगत होते. कधीही काही घडू शकते. शेवटच्या स्टेजला दाखवायला आणल्याने हाताबाहेरची केस असल्याचे डाॅक्टर सांगत होते.

अश्या वेळी आई-बाबा आणि भावंडांना कळवावे या करता रवी घरी जायला निघतो. रोहिणीची अवस्था सगळ्यांना सांगून त्यांना घेवून तो घरी येत होता. इकडे मात्र रोहिणीने स्वत:चे आयुष्य संपवून टाकले होते. आपले रवी वर ओझे वाटू नये म्हणून रोहिणीने स्वत:ला संपवले होते.

रोहिणीची हि बातमी वा-यासारखी पसरत होती. प्रत्येकजण रडताना रोहाणीने आमचा संसार कसा वाचवला, संकट काळात कशी मदत केली, याचा उलगडा करत होते. रोहिणी मुळेच कुटूंबातले सौख्य टिकून होते. आणि तिला लहानपणापासून नेहमी तुसडेपणाची वागणूक देवून, खोटेपणा करुन दुकान बळकवेल अशी आई-बाबांच्या डोळ्यावर लावलेली पट्टी या सगळ्या प्रकरणाचा पश्चाताप होवून भावंडे रोहिणीला धरुन रडत होती.

आपण मुलांच्या खोट्या पणाला फसून ख-याची साथ नाकारली आणि मौल्यवान रत्न गमवल्याचे दु:ख दामोदर आणि कलावती देवींना झाली होती.


घरातली लाडकी मुलगी सर्वांच्या आयुष्यात सोनेरी पताका फडकवून स्वत: मात्र आयुष्यभर इतरांच्या सुखाचाच विचार करणारी कधी कोणाला कळू दिले नाही की तीचं सर्व करत होती. तिच्या या अद्भुत कार्याची ओढ मात्र रोहिणीने जगाचा निरोप घेतल्यावर कळाले होते.


घरातले सर्वजण रवीला घरी जाताना सोबत घेवून जातात आणि रोहिणीची शेवटची इच्छा म्हणून रवीचे लग्न देखील केले जाते. रोहिणी जाता जाता मात्र, तिची छाप अशी काही सोडून जाते की प्रत्येकाला तिची आठवण हि केलेल्या मदतीतून सतत जाणवत राहिली होती.

रवीकडून दोन महिन्यातच गोड बातमी समजली होती. नऊ महिने देखील उलटून गेले होते. घरात गोंडस मुलीचा जन्म होतो. त्या मुलीचे नाव रवीने रोहिणी ठेवले होते.

जगाचा निरोप घेवून देखील नव्या रुपात रोहिणी आजही आपल्या परीवारा सोबत राहत होती.

समाप्त:

🎭 Series Post

View all