वलय भाग ३

एक संकट सोडवले की दुसरी संकटे‌ तयारच होती.
कलावती आणि दामोदर यांच्या पुढे अशी काही परीस्थिती किरण आणि काव्याने दाखवली होती कि मनाच्या निर्णायापुढे दामोदरांनी जे डोळ्यांना दिसते त्यावर विश्वास ठेवून आपल्या दोन्ही मुले रवी आणि रोहिणीला घराबाहेर काढले होते. खरतर शिक्षणाकरता पैसा उभा कसा करायचा या करता दोघांनी काही दिवसाची राहण्याकरता मुदत मागितली होती. ती देखील मान्य न करता घरातून बाहेर काढले होते.

रवी आणि रोहिणी एक घर तात्पुरते भाड्याने घेवून दिवसभर नोकरी करुन रात्री अभ्यास पूर्ण करु लागले. इकडे रेणुकाचे मात्र सासरी छळ होवू लागला केला जात होता. तिने हि गोष्ट अनेकदा काव्याला आणि किरणला सांगितली होती. तिच्याकडं दुर्लक्ष करत तू तुझं घर हाताळायला हवं अस तिला सांगून दोघेही काढता पाय घेत होते.

एक दिवस रेणुका नेमकी रोहिणी शिकत असलेल्या काॅलेजच्या मंदिराजवळ देवापुढं आपल्याला भोगायला लागणा-या परीस्थितीचा जाब मागायला आली‌ होती. नेमकी त्याचवेळी रोहिणी देखील देवळात आली होती. रेणुकाला पाहताच रोहिणी आपल्या बहिणीला घट्ट मिठी मारते. रेणुका देखील आपल्या भावना लपवत रोहिणीला भेटते. रेणुकाच्या डोळ्यात जमा झालेली आसवे पाहत रोहिणी तिला काय झाले या बाबत
विचारते. हिला सांगून काय फरक पडणार होता. रोहिणी खर कारण ऐकल्याशिवाय रेणुकाला तिथून जावूच देत नव्हती.

सत्य परीस्थितीचा ठाव घेण्यासाठी रोहिणी रेणुकाच्या नव-याला भेटायचे ठरवते. त्याच्याकडून छळ का करण्यात येतो याचे कारण विचारताच लग्नाला तीन वर्ष उलटले तरी मुलं होत नाही म्हणून नातेवाईक, कुटूंबामधे सतत विचारण्यात येते. त्यामुळे मानसिक संतुलन स्थिर ठेवू शकत नाही तो राग रेणुकावर निघत होता. रोहिणी खरतर डाॅक्टरचेच शिक्षण घेत असते. तिच्या ओळखीने एका डाॅक्टरांना भेटायला रोहिणी रेणुकाच्या नव-याला सांगते. त्याप्रमाणे ट्रिटमेंटला साथ देत रेणुकाच्या घरी गोंडस बाळाचा जन्म होतो. रेणुकाचा संसार नव्या रुपात बहरु लागतो. दोघेही‌ रोहिणीचे आभार मानू लागतात. या बाबत आपण काही केले नसल्याचे रोहिणी रेणुका आणि तिच्या नव-याकडून वचन घेते. त्यांचा सुखी संसार पाहून रोहिणी मनोमन सुखावली होती.

पुढे रेणुकाचा नवरा कामानिमित्त दुस-या शहरात रेणुका आणि त्याच्या मुलासह राहायला निघून जातो. दुसरीकडे काव्याच्या नव-याला कंपनीत अफरातफर केल्याच्या आरोपाखाली कामावरुन काढून टाकले जाते. हि गोष्ट रोहिणीच्या मैत्रिणीकडून रोहिणीला समजते. ती काव्याला वकील बरोबर घेवून कोर्टात केस दाखल करण्यास सांगते. तिच्या पाठिशी उभी राहून ती काव्याच्या नव-यावर लावण्यात येणारे आरोप निर्दोष असल्याचे स्पष्ट करुन ती केस जिंकते. त्या कंपनीत सन्मानपूर्वक काव्याच्या नव-याला घेण्यात येते. परंतु जिथे विश्वासाने ठेच खाल्ली तिथे पुन्हा कसे जाणार म्हणून नव्या जोषात काव्यचा नवरा दुसरी नोकरी पाहतो. तिथे त्याचा प्रमाणिकपणा आणि कर्तृत्वाच्या जोरावर प्रमोशन होवून पगारवाढ केली जाते.

रोहिणीने योग्य दिशा दाखवल्यामुळे आज माझा संसार सुरु आहे. काव्याला रोहिणीशी वाईट वागल्याचा पश्चाताप होतो. घरी‌ जावून आत्ता सगळ्यांना खर सांगावं अस काव्याला वाटतं होते. रोहिणीने शपथ घातली नसती तर आज रोहाणीला मानाने घरी घेवून जाता आले असते. हा विचार काव्या सतत करत होती.

सगळ आता सुरळीत चालले असावं म्हणून डोळे भरुन का होईना लांबूनच घराकड पाहत आई-वडिलांना पाहून घ्याव अस रोहिणीला वाटत होते. तेवढ्यात किरण एकटाच घराच्या बाजूला झाडाजवळ एकटाच काहीतरी पुटपुटताना दिसत होता.

किरण आणि रोहिणी एकमेकांची नजरानजर होते. दोघेही एकमेकांपासून लपण्याचा प्रयत्न करत होते. अखेर भावाच्या डोळ्यातलं पाणी रोहिणीला पाहून आणखी चेह-यावरुन ओघळू लागले. रोहिणीने किरणला घराच्या मागच्या ओट्याजवळ नेवून घरी सगळं व्यवस्थित आहे ना? आई- बाबांची तब्येत बरी‌ आहे की नाही? काय झालं? वहिनी कशी आहे? एवढ्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली होती. क्षणभर किरणने रोहिणीच्या तोंडावर हात ठेवला होता.

" तुझी वहिनी सारखी फोनवर बोलत असती. कोणाशी‌ बोलती कळत नाही बघ. विचारायला गेलं तर बोलायचं टाळती. ती नक्की काहीतरी लपवती माझ्यापासून पण नेमकं कळेना."किरण.

" आईला विचारायला सांगायचं ना मग दादा." रोहिणी.

घरातल्या सगळ्यांनी विचारले पण ती काहीच बोलाली नव्हती. किरणच्या या उत्तरावर मीच वहिनीशी बोलून बढते म्हणत रोहिणी उद्या वहिनीला घेवून देवळात ये. मी देखील तिथेच वहिनीशी बोलते. तू काही निमित्ताने तिथून निघून जा. माझ्याशी तरी वहिनी मनातलं बोलते का ते पहाते म्हणत रोहिणी निघून जाते.

खरच रोहिणीला वहिनी मनातलं सांगेल का? वहिनीचं कोणाशी प्रेमसंबंध तर नसतील ना? रोहिणीला पडणा-या या प्रश्नांची उत्तरे पाहूया पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all