Feb 24, 2024
माझे पुस्तक

वलय भाग २

Read Later
वलय भाग २
शेतीची औषधे यावेळी मिळतील की नाही या विचारत जरासे बिचकतचं दामोदरांनी दुकानदाराला औषधाची चिठ्ठी दाखवली. दुकानदाराने आपल्या सहकार्याला ती औषधे आणि हत्यारे घेवून येण्यासाठी गोडाऊन मधे पाठवले. औषधे तर लगेच मिळाली. हत्यारे आणायला थोडा वेळ लागेल असे दुकानदाराने सांगितले होते. दुपारचे ऊन डोक्यावर घेतल्याने घामाघूम झालेल्या रवीला दामोदरांनी पाहिले. रवीला ऊसाचा रस पिण्याकरता समोरच्या गु-हाळात जायले सांगितले होते.

रवी दमोदरांना देखील बरोबर चला म्हणून आग्रह करत होता. दामोदर रवीला तू रस पिवून झाला की माझ्याकरता इकडे घेवून ये असे म्हणून रवीला रसाच्या दुकानात जायला सांगतात.

रवी ऊसाचा पिवून झाल्यावर आबां करता रस बरोबर घेवून निघतो. रवी रस्ता ओलांडणार इतक्यात ऊसाचा रसवाला उरलेले सुट्टे पैसे देण्याकरता हाक मारतो. इतक्यात रवी मागे बघणार तेच थोडा मागच्या बाजूला सरकतो. एक भरधाव येणाऱ्या मोटर सायकल वाला रवीला जोरात धडकून पुढे जातो. रवीच्या अवतिभवती गर्दी जमा होते. इकडे दामोदर रवी अजून कसा आला नाही याचा विचार करत असतात.

रवी मात्र बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेला असतो. एवढी कसली गर्दी जमा झाली ते पाहायला दामोदर रस्त्यावर येवून पाहतात तर., त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. आपला मुलगा बेशुद्ध अवस्थेत निपचित पडलेला पाहून दामोदरांना धक्का बसतो.

ते रवी जवळ जावून त्याला जवळच्या दवाखान्यात घेवून‌ जातात. घरी सगळे काळजी करत असतील म्हणून दामोदर आपल्याला घरी यायला दोन दिवस लागतील अजून असे फोन करुन कळवतात कारण मात्र शेतीच्या औषधे शहरातून आणावे लागतील असे सांगत होते.

रवीच्या पायाला दुखापत होवून बेशुद्ध पडताना उजव्या हाताला पिळ पडल्याने हाडाला थोडसे क्रॅक गेल्याने हाताला लगेचचं प्लॅस्टर करण्यात आले होते. दोन दिवसानंतर घरी जाताना आपल्या बायकोला आणि पोरांना काय उत्तर देणार या काळजीने दामोदर अस्वस्थ होते.


"आबा तुम्ही नका काळजी करु. मी माझ्या चुकीमुळे दुखापत झाली असेच सांगणार." रवी.

चूक जरी झाली तरी तुला गमावले असते त्या अपघातात तर मी स्वत:ला कधीच माफ करु शकलो नसतो असे म्हणून दामोदर‌ रडायाला लागतात. वडिलांना सावरत रवी मी आहे ना सोबत तुमच्या आणि कायम असणार आहे असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.

आपल्या मुलाचा प्लॅस्टर मधे असलेला हात पाहून कलावती रडायल्या लागतात. रोहिणी देखील आपल्या भावाला कवटाळून रडायला लागते. काव्या, रेणुका आणि किरण देखील धावत-पळत रवीकडे गेले होते.

सविस्तरपणे दामोदरांनी घडलेला प्रसंग सांगितला. कलावतींना बैचन वाटणा-या मनाची अस्वस्थतेचं नेमक कारण आज ठाऊक झाले होते. दामोदर दुस-याच दिवशी सकाळ पासून शेतीच्या फवारणी करता निघून गेले होते. मुलं शाळेत निघून गेली होती. कलवतींना देखील दामोदरां बरोबर शेती जायचे होते. रवीला हाताला लागल्याने रवी शाळेत न जाता आज दुकान मी सांभाळतो असे आबांना सांगतो. रोहिणी लहान असून तितकीच समजूतदार होती. आपल्या भावाची काळजी घेण्यासाठी‌ ती मात्र शाळेला सुट्टी घेवून रवी बरोबर दुकानात त्याची मदत करु लागली.


काही महिन्यांचा कालावधी निघून जातो. रोहिणीला देखील आता दुकान छान हाताळता येत होते याचा मात्र काव्याला राग येत होता. ती काही कारण काढून रोहिणीला दुकानात थांबून देत नव्हती.

रोहिणी काव्याला समजून घेत केलेला अपमान गिळून घ्यायची. काही वर्षे अशीच निघून जातात. किरण करता लग्नाकरता मुलगी पसंत केली जाते. लक्ष्मीच्या रुपात सून घरात नांदू लागते. तिच्या पाठोपाठ काव्या आणि रेणुकाचे देखील लग्न होते.

रवी आणि रोहिणी दोघेच लग्नाचे राहतात. दोघांना खूप शिकून आई-वडिलांचे स्वप्न साकार करायचे होते. रोहाणीला डाॅक्टर तर रवीला इंजिनियर व्हायचे होते.

काव्या मात्र रवी आणि रोहिणीला दुकान स्वत:च्या नावावर करायचे आहे अशी अफवा पसरवत त्या दोघांनाही घरापासून दूर सारण्याचे प्लॅन करु लागली होती. खरतर आहे ते दुकान आणि शेती किरण आणि काव्या स्वत:मधे वाटून घेणार होते. त्यांचा हा डाव रेणुकाला माहित झाल्याने तिलाही यात सहभागी करुन घेतले होते.

हा खेळ दामोदारांच्या लक्षात येईल का? कलावतींना हि गोष्ट कळल्यावर कलावती कोणते पाऊल उचतील ? पाहूया पुढच्या भागात.


क्रमश:
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pradnya Pavan Borhade

Home Maker

मनातल्या भावना कल्पकतेने गुंफूण कथांच्या माध्यमात मांडायला आवडते.

//