वलय भाग १

हसतं - खेळत घर तिचं आनंदाने बहरलेलं.
लांबसडक केसांच्या दोन वेण्यांत तिचं चाफेकळीसारखे दिसणारं नाक अधिकच खुलून दिसायचं. गालावरची खळी जणू ती हसताना सर्वांचचं लक्ष वेधून घ्यायची. दिसायला गोरी गोमटी अशी की चंद्राच्याच प्रतिबिंबाचा भास सतत होत होता. जिची स्तुती स्तुमने वाचताना वाचकांना देखील त्या पात्रा विषयी उत्सुकता वाटावी अशी आहे तरी कोण ही अप्सरा?? प्रश्न तुम्हांला देखील पडलायं ना?

ऐका...तर, मग तिचं नाव रोहिणी. रोहिणी नक्षत्रा सारखी दिसायला तेजस्वी होती. या गोष्टीचा तिने कधीच गर्व केला नव्हता. तिच्या अवतिभवति वावरण्या-या लोकांनीच मात्र या गोष्टीचा विनाकारण बाऊ करत ती खूप घमेंडी , अकडू अशी विविध विशेषण तिला जोडत चालत होती.

रोहिणीला तिच्या बद्दल बोलल्या जाणा-या या विशेषणां विषयी कल्पना असून देखील ती कोणाला कधीच वाकड बोलत नव्हती. भावंडामधलं शेंडफळ असल्याने आई-बाबा फक्त हिचाच विचार करतात. म्हणून भावंड देखील रोहिणीला कधी त्यांच्यात खेळायला घेत नव्हते. कोणत्या न कोणत्या कारणाने तिला एकटे पाडत होते. रोहिणीला दोन भाऊ किरण आणि रवी, काव्या व रेणुका ह्या तिच्या बहिणी.

आई-वडिलांनी शेती बरोबरच घराला लागून किराणा मालाचे छोटेसे दुकान सुरु केले होते. शेतीचा वाढता व्याप तसेच दिवसभर किराणा दुकान बंद ठेवणे हे बरोबर नाही या कारणास्तव वडिल दामोदर यांनी आपला मोठा मुलगा किरण आणि त्याच्या जोडीला काव्याला दुकान कस हाताळाव याचे तंत्र शिकवण्यास सुरवात केली होती. दोघांनी वडिलांना आपला हातभार लावता येतो आहे या आनंदात काही महिनाभरात दुकानातले बारीक-सारीक काम शिकून घेतले होते.

आपली पोरं हाताशी आली आणि आपल्यावरचे ओझं आता कमी झाले या आनंदात दामोदर सुखाने न्हाऊन गेले होते.

" पोरानं अस केलं तर कस होणारं, आजच्या काळच्या प्रवाहा बरोबर चालयचं असलं तर., शिकायला पण हवं. एकदा का पेसै असं भी कमवता येतयं कळालं पोरं शिकाया नगं म्हणतील." चिंतेच्या स्वरात आई कलावती बोलल्या.

" पोरं एका बाजूला शिकतील बी आणि दुकान बी चालवतील. आपल्यापेक्षा हुशार आहेत बघ. मी तुझ्यापेक्षा जरा शिक्षणात चार-पाच उन्हाळ-पावसाळ जास्त पाहलयं हाय बघ. माझा विश्वास आपली पोरं कधी तोडायची नाही बघ. " दामोदर.

मी काही शिकली नाही व्ह. पर आजूबाजूची परीस्थिती बघून आपलं मन जरा बिचकतयं या. आता डोक्यात पडणा-या या अश्या विचित्र प्रश्नाला मला आपलं तुमच्या म्होअरं मांडावं वाटलं इतकचं.

पाच-सहा वर्षांचा कालावधी उलटला. शेती आणि दुकान अगदी बरोबरीने साथ देत संसाराचा गाडा अगदी सुरळीत पार पडत होता. दैवाला पण हा सुरळीत चालणारा गाडा बघवेनासा झाला होता का काय आता ते त्यालाचं ठावं.

शेतीसाठी लागणारी काही हत्यारं आणि औषध घेवून यावी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी जायला दामोदर आपला मुलगा रवी याला बरोबर घेवून निघाले. रवीला नेमकी त्याच दिवशी शाळेत सहलीसाठी जायचे होते. दामोदर यांनी वायफळ खर्च टाळण्याकरता रवीला सहलीला जावू दिले नव्हते. मुलांमधे तो‌ एकटाच घरी‌ होता. एकटं बसण्यापेक्षा आपल्याला देखील सामानाला हातभार लावण्यात रवीची सोबत होईल. असा विचार करत दामोदर आपल्या बायकोचा निरोप घेवून निघतात. व तिला रोहिणी शाळेतून येईपर्यंत दुकानावर बसण्यास सांगून निघून गेले होते.

तालुक्याला जायची बस पाच मिनीटे उशिरा पोहचल्याने नुकतीच निघून गेली होती. आता अर्धा तास असचं बसावं लागणारं. इतक्यात रवी वडिलांना म्हणतो. आबा बस आली बर का. तयार रहा तुम्ही गर्दी आहे जरा. मी पुढ चढून तुमच्या करता जागा धरतो. अर्धा तास उशीरा येणारी गाडी पंधरा मिनिटात आल्याने दामोदार राव भलतेचं खूश होते. बसमधे एवढ्या गर्दीत देखील रवीने आपल्या आबांना बसायला जागा करुन दिली होती. लांबचा वाटणारा पल्ला अगदी लगबगीने पार झाल्याने खाली उतरल्यावर दामोदर रवीला तालुक्याचा फेमस असणारी मिसळ आणि वडापाव खायला घालून शेतीच्या दुकानात हत्यारे आणि औषधे घ्यायला निघाले होते.

दामोदरांना शेतीविषयी हवे असलेलं साहित्य दुकानात मिळणार आहे की नाही? कथामलिकेमध्ये कोणते नवे वळण तर येणार नाही ना? पाहुया पुढिल भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all