वजनदार

Its about making jokes on women having more weight

आज स्मितल ने एक जोक पाठवला आणि हा लेख लिहायला मला प्रवृत्त केलं..... वजन  या विषयावर जोक होता.... वजन कसं कमी होतं नाही, वैगेरे !!!

पण खरंच आजकाल सगळे वजनाच्या मागे... म्हणजे एखादीचं वजन जास्त असेल तर लोकं प्रश्न विचारून हैराण करतात, एखादीने walk सुरु केला तर अरे वा वजन कमी करायला का असे प्रश्न अगदी common.....

म्हणजे जगात आता फक्त वजनाचा एकच प्रश्न उरलाय, अशा अविर्भावात असतात.... diet, वजन हेच विषय... म्हणजे समोरची व्यक्ती जर जाड असेल आणि तिला नसेल पडायचं या सगळ्यात तर ती तर मला अगदीच बिच्चारी वाटते.... अतिच झालं तर काढता पाय घेताना दिसते ती......

कधी कधी आपण स्वतःवरही हसतो इतकं आपलं मन मोठं करतो.... जसं स्मितल ने जोक पाठवला तर मी तिला बोलले अगं मला तर वाटतं लोकांनी व्यायाम diet करावं आणि माझं वजन कमी व्हावं ????

खरंच असं झालं तर..... आम्ही दोघीही खूप हसलो..... पण खरंच एका लिमिट पर्यंत आपण करू शकतो हे.... आणि may b प्रत्येकाची priority वेगळी असूच शकते.....प्रत्येकाच्या घरच्या वातावरणात नसेल शक्य होत त्याला एवढा व्यायाम, diet !!!एवढं नका बोलू गं की समोरच्याला हा विषय नकोसा होईल.....

वजन कमी, आपण एकदम form मधे कोणाला आवडणार नाही बरं.... तुम्हीच विचार करा जरा.....

आजच्या आपल्या जीवनशैलीनुसार वजन आटोक्यातच हवे यावर माझे दुमत नाहीच..... प्रत्येक व्यक्ती आजकाल स्वतःच्या वजनाची, तब्येतीची जमेल तेवढी, जमेल तशी काळजी घेतच असतो.

पण म्हणून प्रत्येक वेळेला jokes सांगून, वेगवेगळी diet सांगून, त्याच विषयावर बोलून नका त्याचे patience बघू. आजकाल तर वजन हा एक status symbol झालाय असं वाटतं मला. स्त्रियांमध्ये तर फारच स्तोम वाढलंय याचं !!वजन जास्त तर नको हिच्याशी मैत्री इथपर्यंत ऐकलं आहे मी.... म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं की तुमची बुद्धी असा विचार कशी करू शकते?

आपल्याला उगाच कुठला आजार मागे लागू नये इथपर्यंत जरूर काळजी घ्यावी आपल्या जवळच्या लोकांना, मैत्रिणींनाही घ्यायला लावावी पण त्यांच्या मनस्थितीवर परिणाम होईल आणि त्यातून उगाच काहितरी निष्पन्न होईल असे jokes, वैगेरे टाळावेच नाही का?