Login

वजाबाकी जीवनाची-आयुष्याचं गणितच चुकलं भाग 2

Ayushyach ganitch chukl

वजाबाकी जीवनाची...

आयुष्याचं गणितच चुकलं...भाग 2

तिथे गिरीजाबद्दल सगळी माहिती मिळवली आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यांनाही सगळं व्यवस्थित वाटलं आणि म्हणून त्यांनी गिरजाच लग्न मनोजशी ठरवलं.


महिन्याभरात मनोज आणि गिरीजाचे लग्न झाले. 
दोघांच्या स्वभावामध्ये खूप तफावत होती. पण गिरीजाला परिस्थितीशी जुळवून घेण्याची सवय होती. सुरुवातीचे दिवस बरे गेले.  मनोज तिच्याशी व्यवस्थित वागायचा.

नव्याची नवलाई संपली आणि नंतर त्यांची सतत भांडणे व्हायला लागली.  मनोजला गिरीजाच्या सावळ्या रंगामुळे तिरस्कार वाटायला लागला.

तो तिला सावळ्या रंगावरून टोचून बोलायला लागला. 
आधी कमी होत होतं पण नंतर रोज व्हायला लागलं.
मनोज बाहेरून आला की तिच्याशी भांडण करायचा.
एकदा बोलता बोलता बोलून गेला की, माझे सगळे मित्र हसतात माझ्यावर, लाज वाटते मला तुला माझी बायको म्हणवून घायची.
तिला नको नको ते बोलायचा.
गिरीजाने मिळून मिसळून राहण्याचे बरेच प्रयत्न केले. पण मनोजच्या मनातील अडी ती काही काढु शकली नव्हती.

दिवसा मागून दिवस जात होते.

गिरीजाला दिवस गेले. गिरीजाला वाटलं आता तरी त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेम भावना निर्माण होईल पण तस काहीच घडतं नव्हतं. त्याचं प्रेम फक्त रात्री पलंगावर झोपण्यापुरतच होतं. बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले आणि  गिरीजाने गोंडस मुलाला जन्म दिला. दिवस सरत गेले पण त्या दोघा मधे प्रेम काही फुलले नव्हते.


गिरीजा घरात मनोजबद्दल काही सांगायला गेली की ते लोक हीचचं तोंड बंद करायचे. त्यांना माहीत होतं आपला मुलगा काही ऐकायचा नाही.


गिरीजा स्पष्टवक्ती असल्यामुळे सासरची लोकही दुखावली गेली. जिथे मनच नाही जुळली तिथे मनस्ताप तर होणारच.

सासरची लोकही मुलाला सोडून गिरीजालाच बोलायचे, दोघांमध्ये भांडण लावायचे.

सासराच्या लोकांनी वेळ आणि संधी मिळेल तेव्हा दोघांच्या संसारात तेल टाकून आग धगधगत ठेवली. 

त्यामुळे दोघांमधील दुरावा आणखीच वाढला. मनस्तापाची जागा आता शिव्याशापाने घेतली, मारझोडीने घेतली.


मनोजला त्यांच्या जवळच्या माणसांनी गिरीजा विरुद्ध भडकावल्यामुळे दोघांच्या नात्यात आगच भडकली. 

परंतु प्रत्येक गोष्टीला कमाल मर्यादा असतात. मनोजने सगळ्या मर्यादा ओलांडल्या.

सगळ्या परिस्थितीशी जुळवून घेणारी गिरीजा हरली, तिला आता सगळं असह्य होत होतं, सगळं नकोस वाटत होतं.


गिरीजाने मनोज पासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. 

गिरीजा त्याच घरात एका खोलीमध्ये मुलगा आर्यन सोबत वेगळे राहू लागली. 

मनोजला तिच्या आणि आर्यनबद्दल कधी प्रेम वाटत नसल्यामुळे त्याने काही विरोध  केला नव्हता.

मनोजने जबाबदारी सुद्धा झटकून दिली. मनोज स्वत: कमवता असल्यामुळे त्याची आई त्याची देखभाल करायची.

त्यामुळे मनोजला खाण्यापिण्याची काही चिंता नव्हती.

आई नंतर भावाने खाण्यापिण्याची व्यवस्था केली. त्यामुळे मनोजने गिरीजाला कधी जवळ करण्याचा प्रयत्न केला नव्हता.

गिरीजाच्या माहेरचं कोणीच नसल्यामुळे तिकडून काही मदतीची आशा नव्हती. गिरीजा तिथेच छोटी-मोठी कामे करून उपजीविका करत असे. भरपूर हालअपेष्टा सोसून तिने आर्यनला वाढवले. 

तिच्या समोर आता फक्त मुलगा आर्यनच आशेचा किरण होता. जसा आर्यन मोठा होत गेला तशी त्याला परिस्थितीची जाणीव झाली. आर्यनने आईचा संघर्ष फार जवळून बघितल्यामुळे त्याने आईची उतारवयात देखभाल केली. आर्यनच्या नोकरी साठी ते दुसर्‍या शहरात स्थायिक झाले.

क्रमशः

0

🎭 Series Post

View all