वैशाख वणवा (षडाक्षरी)
विरह रे तुझा
वैशाख वणवा
सहन होईना
तुझा हा दुरावा
वैशाख वणवा
सहन होईना
तुझा हा दुरावा
तुझ्या विरहात
रात्री त्या जागल्या
नयनातल्या या
अश्रू बरसल्या
रात्री त्या जागल्या
नयनातल्या या
अश्रू बरसल्या
मिळेना उसंत
बेचैन मनाला
किती हा गारवा
झोंबतो तनाला
बेचैन मनाला
किती हा गारवा
झोंबतो तनाला
वाटे सूनी सूनी
धुंद चांद रात
आठवते मला
तुझी हर बात
धुंद चांद रात
आठवते मला
तुझी हर बात
वाट पाहूनी रे
डोळे ही थकले
गालावरील हे
मोती ही सुकले
डोळे ही थकले
गालावरील हे
मोती ही सुकले
ये ना रे,साजना
भेटायला मला
विरह गुज त्या
सांगीन मी तुला
भेटायला मला
विरह गुज त्या
सांगीन मी तुला
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा