वैशाख पौर्णिमा माहिती आणि महत्व.
©® राखी भावसार भांडेकर
वैशाख पौर्णिमेला धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे. ही पौर्णिमा धन देणारी पौर्णिमा आहे. याशिवाय याच दिवशी भगवान गौतम बुद्धांना बोधगयेतील बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली असं मानलं जातं.
हिंदू धर्मशास्त्रात पौर्णिमेला अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या सर्व कलांनी समृद्ध असतो असं मानलं जातं. वैशाख महिन्याला सुरूवात झाली आहे. अशात वैशाखातली ही पौर्णिमा अत्यंत महत्वाची आणि पवित्र अशी मानली जाते.
वैशाख पौर्णिमा येत्या ४ मे २०२३ रोजी रात्री ११.४३ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ५ मे रोजी पौर्णिमा पाळण्यात येणार आहे. या दिवशी पुष्टीपती विनायक जयंतीही आहे. अशात श्रीगणेशाची विधिवत पूजा केल्यास अत्यंत शुभ कर्मफल प्राप्त होणार यात शंकाच नाही.
वैशाख पौर्णिमा २०२३ : तिथी आणि शुभ मुहूर्त
हिंदू कॅलेंडरनुसार, वैशाख महिन्याची पौर्णिमा ०४ मे २०२३ रोजी रात्री ११.४३ पासून सुरू होऊन ०५ मे २०२३ रोजी रात्री ११.०३ पर्यंत पाहायला मिळेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार, वैशाख पौर्णिमा आणि पुष्टीपती विनायक जयंतीही ०५ मे २०२३ रोजी म्हणजेच शुक्रवारी पाळण्यात येईल.
काय आहे वैशाख पौर्णिमेचं धार्मिक महत्व
हिंदू धर्माव्यतिरिक्त या दिवशी भगवान बुदधांची जयंतीही साजरी करण्यात येते.भगवान विष्णूचा ९वा अवतार गौतम बुद्ध यांची ही जयंती आहे. अशा प्रकारे, वैशाख पौर्णिमा हिंदू आणि बौद्ध अनुयायांसाठी खूप महत्त्वाची आहे.
वैशाख पौर्णिमा इतर अनेक महत्त्वाच्या घटनांशी निगडीत आहे. या दिवशी महान ऋषी वेदव्यास यांनी महाभारताचे महाकाव्य लिहिण्यास सुरुवात केली. भगवान श्रीकृष्णानेही आपला परम मित्र सुदामा याला विनाय़काचं व्रत करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर सुदाम्याचं दारिद्र्य दूर झालं होतं.
वैशाख पौर्णिमेला काय कराल
अनेक कष्ट करूनही तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत नसेल तर वैशाख पौर्णिमेला व्रत करावे. यासोबतच काही उपायांनी आर्थिक समस्यांवरही मात करता येते.
सकाळी लवकर उठून शुभ्र वस्त्रे परिधान करून भगवान विष्णूची शोडषोपचार पूजा करावी.
या दिवशी श्री विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करून 'ओम सत्यविनायकाय नमः' या मंत्राचा जप केल्याने विशेष लाभ होतो आणि दरिद्रता दूर होते.
या दिवशी छत्री, पाण्याने भरलेली घागर किंवा काही पैसे एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावेत. असं केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील.
******************************************
बुद्ध पौर्णिमा तिथी महत्व आणि इतर मान्यता
बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे. हा विशेष योगायोग म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले होते, असे सांगितले जाते. बुद्ध पौर्णिमा केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांत साजरी केली जाते.
ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे. हा विशेष योगायोग म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले होते, असे सांगितले जाते. बुद्ध पौर्णिमा केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांत साजरी केली जाते. गौतम बुद्धांविषयीच्या अनेक कथा आपल्याला परिचित आहेत. त्यामुळे बौद्ध धर्मियांमध्ये बुद्ध पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे.
भगवान विष्णू आणि बुद्ध पौर्णिमा
बौद्ध धर्मीयांबरोबच हिंदू धर्मातही ही तिथी तितकीच महत्त्वाची आहे. पौराणिक कथेनुसार, वैशाख पौर्णिमा भगवान विष्णूशी जोडली गेलेली आहे. तसेच भागवत पुराणानुसार, बुद्ध हे विष्णूचे नववे अवतार मानले गेले आहेत. वैशाख पौर्णिमा 'सत्यविनायक पौर्णिमा' म्हणूनही ओळखले जाते.
पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा मित्र सुदामा याला गरिबी आणि दु:खातून मुक्ती मिळवण्यासाठी सत्यविनायकाचा उपवास करण्यास सांगितले होते, अशी मान्यता आहे.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी धर्मराजाचीही पूजा केली जाते. धर्मराजाची पूजा केल्याने अकाली मृत्यूची चिंता राहत नाही, असे सांगितले जाते.
मानवी जीवनातील दु:खे निवारण्यासाठी बुद्धांनी आठ मार्ग सांगितले होते. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात. बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचे अखंड वाचन, पठण केले जाते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. १९५१ मध्ये तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा करण्यात आला होता. २७ मे १९५३ रोजी भारत सरकारने बुद्ध जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली.