वैखरी एक प्रेमकथा भाग -२३

A Lovestory Of A Girl
एक प्रेमकथा भाग -२३
विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .


प्रेम : "आई, चल गं आटोपलं का तुझं ".
प्रेमची आई : " हो चल ."
प्रेम : " आई, गाडीत याविषयावर बोलू नकोस . तू वसंतला बघ . घरी येवून सांगशील तुला काय वाटलं ते ."
प्रेमची आई : " बरोबर आहे तुझं . भावनांवैखरीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं ."

प्रेम व त्याची आई दोघेही ऑफीसमध्ये पोहचतात . प्रेमच्या कॅबिनमध्ये पोहचल्यावर प्रेम काही कामाचं निमीत्त काढून वसंतला
बोलावतो. वसंतला बघताच प्रेमची आई अवाक् होते . लहानपणापासून प्रतिक्षाला सूनेच्या नजरेतून पाहणाऱ्या पवार काकूंना प्रतिक्षाचा विशेष लळा असतो .वसंतला पाहताच त्यांनाही प्रतिक्षाची आठवण झाली त्यांच्या डोळ्यात नकळत अश्रृ आले . तसेच प्रेमनी आईला इशारा केला तसेच आईनी भावनांना आवर घातली .
वसंत निघून जाताच प्रेमची आई रडायला लागली .
प्रेम : "आई सावर स्वतःला . बघ माझी काय मनस्थिती . तुम्ही बायका आसवांद्वारे मन रितं करता आमच्या पुरुषांचं मनाचं आभाळ कितीही भरून आलं तरी व्यक्त होणं कठिण असतं . त्यामुळे खूप मानसिक अस्वस्थता वाढते."
प्रेमची आई ( पवार काकू): "हो रे प्रेम . दोन घराण्यांच्या शत्रत्वाचा बळी ठरलात तुम्ही दोघं . वसंत खरंच प्रतिक्षा व तुझा मुलगा असेल तर त्याच्यावरही खूप अन्याय झाला . वसंत मध्ये प्रतिक्षाचं प्रतिबिंब दिसतं . तू एक निरिक्षण केलसं का तो बोलतांना तुझ्या सारखाच हनुवटीवर मधून मधून हात ठेवतो . मलाही हा तुम्हा दोघांचा मुलगा वाटतो . पण हे कसं कळेल की वसंत कोण आहे ? तुमचा मुलगा आहे की नाही?".
प्रेम : बापरे ! आई किती बारिक निरिक्षण केलसं तू . माझ्या नाही लक्षात आलं की वसंत माझ्यासारखा बोलतांना हनुवटीवर हात
ठेवतो .वाटतं ना तुलाही की तो प्रतिक्षाचाच मुलगा आहे म्हणून ".

प्रेमची आई : " हो अगदीच प्रतिक्षाच्या चेहर्‍यावर आहे वसंत . नाकावरचा तिळ व उजव्या गालाची खळी सांगते की हा प्रतिक्षाचाच मुलगा आहे. एवढं कुणी सारखं असू शकतं
का जगात ? आजवर नाही बघीतलं मी . भलेही चेहर्यात साम्य .फिचर मॅच . असं बघीतलं पण इतकं साम्य . अशक्य ! प्रेम आपण निघायचं का की मी निघू तू थांबतोस ? नाही आई मी पण येतो ."

प्रेम व त्याची आई घरी जायला निघतात . दोघेही कमालीचे अस्वस्थ असतात .

*******"*""*******************************
वैखरीची परीक्षा संपून आठवडा होत नाही तर वैखरीचे बाबा लग्नाची बोलनी करण्यासाठी दिवस ठरवतात . त्याबाबत घरी सांगतात .तसेच
वैखरीचे टेन्शन वाढते आता काय करावं तिला कळत नाही . ती आतूच्या खोलीत जाते .

वैखरी :" आतू काहीतरी उपाय शोधावा लागेल आपल्याला लग्नाची तारीख ठरविण्या आधीच . डोकं चालव गं आतू काहीतरी ."

आतू थोडावेळ विचार करते आणि वैखरीला एक आयडीया सांगते…
आतू : "हे बघ वैखरी तूला वसंत आवडतो हे ठीक आहे परंतु पुढे कोणताही निर्णय घेण्याआधी वसंतला तू आवडतेस की नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी एक मार्ग आहे आपल्याकडे ."
वैखरी : "आतू कोणता ? सांग न पटकन ".
आतू : " स्वरा तुझी चांगली मैत्रीण आहे ना .
तिला तुझ्या मनातलं सांग . स्वराला तिच्या भावाकडून सुहितच्या मनाचा थांग घ्यायला
सांग ."
वैखरी : "पण आतू , वसंतला मी आवडत नसेल तर ?".
आतू : " मी तुझ्या बाबांशी बोलेल . वैखरीला वसंत नावाचा मुलगा आवडतो . तुम्हाला घरात इतिहासाची पुनरावृत्ती नको असेल तर वैखरीचे लग्न तिच्या आवडत्या मुलाशी लावून दयायचा प्रयत्न करा . वसंतला भेटून रीतसर वैखरीसाठी मागणी घाला ."

वैखरी : "बापरे ! आतू आपल्या घरात क्रोधाचा महापूरच येईल गं तू असं बोलल्यावर . त्या महापुराला कसं आवरायचं ."
आतू : नाही येणार महापूर वगैरे . माझ्या बाबात अन् तुझ्या बाबात पीढीचं अंतर आहे . मुलीचं जीवन एकाकी गेल्यापेक्षा तिच्या आवडीच्या मुलासोबत आनंदानी गेलेलं बरं कळेल त्याला समजावून सांगीतल्यावर तुझे आजोबा खूप कडक होते त्यांच्यासमोर कुणीही ब्र शब्द काढत नसे म्हणून माझ्यासोबत असं झालं . माझी बाजू मांडणारं घरात कुणी नव्हत . आता तुझी बाजू मांडायला मी सक्षम आहे. मी सक्षम तुझ्यामुळं बनली . तुझ्या बाबांशी मी याविषयावर तू बोलू शकत नसली तरी मी बोलू शकते. तुझे बाबा माझ्यापेक्षा लहान आहेत . त्याला सांगेन मी समजावून . माझ्यावर रागावणार नाही तो . माझा मान राखतो . संस्कृती आहे आपल्या घरची जेष्ठांचा मान राखणे".
वैखरी : "आतू मी स्वराकडे जावून सांगू का तिला माझ्या मनातलं आज . की मी मुलगी असून प्रेमाची पहल करते तर वसंत मला वाईट मुलगी तर समजणार नाही ना ?".

आतू : उगीच बिनकामाचा विचार करू
नकोस . वसंत उच्चशिक्षित, कविमनाचा मुलगा इतका संकुचित विचार करणार नाही .मुलींनाही मन असते त्यांनाही कुणीतरी आवडू शकतं हे नक्कीच कळत असेल त्याला .ज्याच्यावर प्रेम करतेस त्याला प्रत्यक्ष सांगयचे तर नाही ना? शक्य तेवढ्या लवकर वसंतच्या मनातलं समजलं तर चांगले होईल .
वैखरी : आतू मी आईला सांगून निघते. ok Bye ….
आतू : ok Bye .
****"*************************************

स्वरा : " वैखरी तू ? अशी अचानक ?"
वैखरी : "तुला भेटायची इच्छा झाली अन् निघाली तुला भेटायला ."
स्वरा : "हाऊ स्वीट ! तसंही मला करमत नव्हतं . परिक्षेच्या दिवसात अभ्यासात वेळ जायचा . आता वेळच जात नाही गं . खूप कंटाळवाणं वाटतंय ."
वैखरी :. "अगं स्वरा मला तुला काहीतरी सांगायचं होतं ."
स्वरा : "सांग न मग . त्यासाठी परवानगी घेशील की काय ?"
वैखरी : " नाही तसं नाही अगं खरं तर मला तुझी मदत पण हवी ."
स्वरा : "वैखरी हे काय ? आज तू अशी का वागतेस ? बोल नं मोकळ्या मनानी ."
वैखरी : " अगं, गोष्ट अशी आहे बाबा माझ्या लग्नाची तारिख काढायच्या विचारात आहेत. आपली परिक्षा कधी संपते याची वाटच बघत होते ते. आणि मला त्या मुलाशी लग्न करायचे नाही ."
स्वरा : का ? आशय आवडत नाही का तुला ? फीज
वैखरी : "आवडायचा प्रश्नच नाही . माझ्या मनात दुसऱ्या कुणासाठी जागाच नाही ."
स्वरा : "म्हणजे ? कोण आहे तुझ्या मनात ? छुपी रुस्तम . बोलली नाही कधी ? ये सांग न वैखरी कोण आहे तो भाग्यवान !"
वैखरी : \" वसंत \"
स्वरा : " काय !" कधी झालं हे सर्व ? मला कसं कळलं नाही ? माझ्यापासून का
लपवलंस ? माझाच वसंतदादा का हा तुझ्या मनाचा चोर ."
वैखरी : " हो तुझाच वसंतदादा ".
स्वरा :" जा मी नाही बोलणार तुझ्याशी . मैत्रीणी पासून लपवतं का असं कुणी कधी ? "
वैखरी : "स्वरा तू माझी चांगली मैत्रीण आहेस ना ? मला समजून घेशील मला खात्री आहे. तुझ्याजवळून लपवायचं नव्हतं गं मला . मीच गोंधळलेली होते . मला हे सर्व टाळायचं होतं खूप घाबरायची मी या प्रेम वगैरे प्रकरणाला . म्हणून मला वसंत आवडतो ही गोष्ट मी स्वतःही नाकारायची . प्रेम कुणी करत नसतं ते होतं हे अनुभवातून कळलं . मी माझ्या मनातले भाव कुणालाच कधी दिसू दिले नाही . वसंतलासुद्धा .
मला यात पडायचच नव्हतं . माझ्या घरच्या वातावरणाची मी तुला कल्पना दिलीच होती . आता वातावरण बदललं . आतू माझ्या पाठीशी आहे. तसंही मनात कुणी असतांना दुसऱ्याशी लग्न करणं म्हणजे त्याच्यावर अन्यायच आहे. म्हणून आतू म्हणाली, "तुझ्या भावना तू वसंत पर्यत पोहचव किंवा वसंतच्या भावना जाणून घे . मग पुढे काय करायचं ठरवू . जीवन अनमोल आहे. चूप राहून मनातील भावना लपवून स्वतःला दुःखाच्या खाईत नको ढकलूस" . माझ्या आत्याचं तसंच झालं . तसं माझं होवू नये असे तिला वाटते . मलाही ते पटलं . करशील ना मदत?".

क्रमशः

स्वरा वैखरीला मदत करू शकते का हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा .
वैखरी एक प्रेमकथा भाग-२४

धन्यवाद !
©® ऍड. नीता प्रफुल्ल कचवे .
टीम - अमरावती .

🎭 Series Post

View all