वैखरी एक प्रेमकथा भाग -१

A Love Story Of a girl


कथेचे नाव- वैखरी- एक प्रेमकथा भाग १
कॅटेगरी- राज्यस्तरिय कथामालिका
सब कॅटेगरी- प्रेमकथा
टीम- अमरावती


" काय गं नाव काय तुझं ?
बघताच तुला मन हरवलं माझं ."

मनाशीच बडबडंतं वसंत वहित स्केच काढत होता . तेवढ्यात त्याचा रूमपार्टनर सुहित वाशरुममधून बाहेर आला .

" काय रे वसंत कुणाशी बोलेतोस . "

आपली वही लपवत वसंत उत्तरला ," कुठे
काय ? काही नाही."

"असं काय, काहीतरी लपवल्यासारखं
वागतोस ?"

नाही रे सुहित ,"मी आपला मोठ्याने वाचून अभ्यास करत होतो ".

"बरं ! जाऊ दे ,जा पटकन तयार हो, नाहीतर क्लासला उशीर होईल "

"हा गेलो अन् हा आलो बघ " .

" चल ,आय एम रेडी टू गो "

सुहित व वसंत दोघेही क्लासरूम कडे चालत जातात . सुहित वसंत सोबत बोलत असतो सुहितच्या बोलण्याकडे वसंतचं मात्र लक्ष नसतं .

काय रे वसंत, काय प्रॉब्लेम आहे ? माझ्या बोलण्याकडे काहीच लक्ष नाही तुझं. सकाळी पण तसंच काहीतरी नेहमीपेक्षा वेगळा वागत होतास . दररोज तू मला, लवकर तयार हो .असा आदेश देतोस. आज मात्र, तो आदेश तुला देण्याची वेळ आली.

"तसं काही नाही सुहित, माणसाचं मूड नेहमीच सारखं असतं का ?

"म्हणजे , तुझा केमिकल लोचा झाला की
काय ?"

दोघेही हसतात, तेवढ्यात समोरून शर्मा सर येतात. वसंत व सुहित स्वतःला सावरत, सरांना " गुड मॉर्निंग " म्हणत पुढे जातात.

क्लासरूम मध्ये कदम सर शिकवत असताना , वसंतला प्रश्न विचारतात .त्यावेळी वसंत बावरल्यासारखा करत एसs..ss.. स..s..ss र म्हणत उभा राहतो. नेहमी अगदी अचूक उत्तर देणारा हुशार मुलगा वसंत असा का वागतोय ? सरांना सुद्धा प्रश्न पडतो .

" वसंत आर यू ओके." कदम सर विचारतात

"यस सर ",म्हणत वसंत सरांना " सॉरी " म्हणतो

" नो प्रॉब्लेम टेक केअर ",म्हणत कदम सर शिकवायला लागतात.

क्लास संपल्यावर मित्र वसंतला चिडवतात .
काय रे ," प्रेमात वगैरे पडला की काय ? "

त्यावर सुहित म्हणतो, "वसंत आणि प्रेमात ?
अशक्य ! "

त्यावर एक मित्र म्हणतो, " अशक्य !
का ? वसंतला मन नाही ? त्याच्याही मनाला कुणीतरी आवडू शकतं ."

वसंत तसा रोमँटिक आहे म्हणूनच इतक्या रोमँटिक कथा, कविता लिहितो.

अरे, लिहिणं वेगळं . वसंत तसा रोमँटिक कविता लिहितो आणि अभ्यासाचा कंटाळा आला की , मधेच मूड फ्रेश व्हायला त्या कवितांना चालीही

लावतो .त्याचा छंदच तो .


वसंतचं पहिलं प्रेम ,"पुस्तक " . दुसरे
प्रेम , "चित्रकला". तिसरं प्रेम ," कविता " चौथे प्रेम,

" कथा " यातून त्याला वेळ मिळाला तर प्रेमात पडेल ना.


सर्व मित्र हसतात, "सुहित अगदी बरोबर बोललास. वसंत म्हणजे हरहुन्नरी . चित्रकार ; कवि व 

लेखकही .अभ्यासासोबतच भाषिक बुद्धीमत्ताही अफाट आहे आपल्या मित्राकडे ."


" नवीन काहीतरी कथा वसंतच्या डोक्यात पिंगा घालत असेल . त्याचाच परिणाम आजच हे वागणं ", एका मित्राने तर्क काढला .


" हो का रे वसंत ? कोणती नवीन कथा डोक्यात फिरत आहे ?," सुहित वसंतला विचारत होता .

"ती नवीन कथा कोणती आमच्याशी शेअर कर ना ." सर्व मित्र आग्रह करू लागले .

नाही मित्रांनो, "तसं नवीन कथानक डोक्यात नाही."

"मग झालं तरी काय असं बेचैन व्हायला?" सुहित बोलला .

वसंत हा अतिशय सिन्सियर ,अटेंन्टीव्ह
मुलगा .आज त्याचं एकाही कामात नीट लक्ष नव्हतं . हे पाहून सुहितला वसंतची चिंता वाटू लागली ; म्हणून सुमित वसंतला म्हणाला," मित्रा तू आज  फार अस्वस्थ वाटतोस जरा आराम कर."

आराम ! नाही रे बाबा . सेमिस्टर तोंडावर आलंय . अभ्यासाला खाडा नको . मला मार्क कमी पडले तर काकांचे मेहनतीचे पैसे व्यर्थ जातील .मी काकांना निराश करणार नाही.

" एका दिवसानी काय मोठं नुकसान होणार

आहे , तब्येत पण महत्त्वाची ना ?
तब्येत चांगली असेल तरच, अभ्यासात मन लागेल ना वसंत ". सुहित वसंतला समजावत होता .


"मन लागायला मन जागेवर हवं ना ." वसंत पुटपुटला .

"काय बोललास ?"

"कुठं काय काही नाही ? ".

"वसंत, आज सकाळपासून बघतोय मी , तू मनाशीच बोलतोस.
चाललय काय तुझं ? काही कळत नाही."

"डोन्ट टेक टेन्शन सुहित .
आई एम परफेक्टली ओके ."

" कालपर्यंत ओके होतास . आज नाहीस " .

सुहित, तू जास्तच काळजी करतोस माझी.
चल जास्त विचार करू नकोस. अभ्यासाला
लागू .तुझी जबाबदारी माझ्यावर आहे .काकांनी येते वेळी मला सांगीतलं , "सुहितकडे लक्ष
देशीलं .नाहीतर झोपा काढेल तो ".

हो, तू माझा मित्र नाहीस तर शत्रू आहेस . शाळेत असल्यापासून वेताळासारखा मानगुटीवर बसून अभ्यास करून घेतोस माझ्याकडून .

तसं नाही रे मित्रा . अभ्यासाला पर्याय
नाही .यातच आपलं हित आहे .

हो रे ,बरोबर आहे तुझं. गंमत करतोय मी. तुझ्यासारखा हुशार, जबाबदार आणि सच्चा मित्र मला लाभला म्हणूनच मी आयआयटी मध्ये प्रवेश घेऊ शकलो. चल मग अभ्यासाला लागू.

सुहित मन लावून रीडिंग करत
होता . वसंताचं मात्र पुस्तकात लक्ष लागत

नव्हतं .वसंत पुस्तक वाचत होता परंतु त्याला काय वाचतोय ते कळत नव्हतं . मन कमालीचं बेचैन होतं त्यामुळे तो आणखीनच अस्वस्थ झाला होता . अभ्यास करताना दोन तीनदा मध्येच उठून वसंत खोलीत गिरट्या मारत होता .


वसंताचं असं बेचैन होणं, सुहितसाठी सुद्धा एक कोडं होतं. एका ठिकाणी कित्येक तास बसून एकाग्र चित्ताने अभ्यास करणाऱ्या वसंतचे आज अभ्यासात मन का लागत नाही ? असा हा प्रश्न सुहितला पडला होता . ह्या प्रश्नाचे उत्तर शोधल्याशिवाय सुहितलाही चैन पडणार नव्हते ; म्हणूनच वसंतच्या अस्वस्थ मानसिकतेचे कारण शोधण्याचे सुहितनी मनोमन ठरवले .


वसंतच्या अस्वस्थतेचे कारण सुहितला कळेल का ? वसंत का बेचैन आहे ? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी…
वैखरी - एक प्रेमकथा भाग२ वाचायला विसरू नका .

वैखरी- एक प्रेमकथा भाग१ कसा वाटला आवर्जुन कमेंन्ट करून सांगा .
आवडल्यास लाईक व शेअर जरुर करा .
न आवडल्यास क्षमा करा .

धन्यवाद !

©®✍️ ऍड. नीता प्रफुल्ल कचवे अमरावती
टीम- अमरावती


🎭 Series Post

View all