वैखरी एक प्रेम कथा भाग-११
विषय- प्रेमकथा
उपविषय- राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .
पूर्वांध : वैखरीला स्वराकडून यायला उशीर झाल्यामुळे वैखरीची आतू वैखरीची वाट बघत असते . वैखरी उशीर झाल्याचे कारण सांगतांना आतू वैखरीच्या गळ्यात पडून रडते….
पुढे वाचा भाग-११
वैखरी : "आतू रडू नकोस ना . बघ आई येत
आहे ."
आई : " हे काय प्रतिक्षाताई तुमच्या डोळ्यात पाणी ? काय झालं ?"
वैखरी : "अगं मी स्वराच्या आई बाबत आतूला सांगत होते आणि आतू भावूक झाली ."
आई : बरं बरं . प्रतिक्षाताई चला आपण दोघी किचनमध्ये जावू . रात्रीच्या जेवणात आज काय बनवायचं सांगा जरा कुकला .
वैखरी : "थांब न आई जरा . जेवणाचं बघू नंतर सहाच वाजलेत जेमतेम . मला तुम्हा दोघींशी काही बोलायचं आहे."
आई : "कोणती महत्त्वाची गोष्ट आहे ? बोल पटकन ".
वैखरी : "कसं विचारू ? आई sss… मी काय म्हणते.. अगं आतूच्या भूतकाळाबाबत तुम्ही मला सविस्तर कधी सांगीतलच नाही ….मला ते सविस्तर सांग नं प्लीज . आतूच्या बाळाबाबत आतू स्वप्नात बोलली म्हणून मला कळालं पण नेमकं सत्य काय मला माहितच नाही … सांग न गं . आतू दुःखी का असते ?
आतूच्या नवर्यानी आतुला का सोडलं ? आतुच्या मुलाचं काय झालं ? असे अनेकानेक प्रश्न माझ्या डोक्यात पिंगा घालत असतात.आतुच्या भूतकाळाचा परिणाम घरात आजही दिसतो . माझ्या वागण्यावर अनेकानेक निर्बंध घातली जातात . नेमकं आतुसोबत काय घडलं ?आतु नेहमी दुःखी असते कुठे जात येत नाही . तू आणि बाबा आतुला टाकून कुठेच जात नाही . घरी कुणाला बोलवत सुद्धा नाही . माझ्या मैत्रीणी म्हणतात गं मला, तू तुझ्या घरी कधी बोलवत सुद्धा नाहीस."
आई : "वैखरी किती प्रश्न विचारशील ? नंतर कधी बोलू या विषायावर . आता नको आतुची
मानसिकता ठिक नाही ".
टाळणारच . मलाही अर्धवट माहितीचा त्रास होतोय गं."
" खूप आनंदी राहायची गं मी… स्वछंद बागडायची . राजकुमारी सारखं माझं जीवन … तुझ्या आजोबांचा व पवार काकांचा पार्टनरशीप मध्ये व्यवसाय होता . दोघंही बालमित्र . खूप पटायचं दोघांचं . अजित - अनिल ची जोडी प्रसिद्ध होती … दोघेही गावातील देशमूख पाटलाची मुलं… गडगंज श्रीमंती . जमीन जुमला असणारी गावातील श्रीमंत पार्टी . देशमूख पाटलात गावोगावी चुरस राहायची . गावतलं राजकारण तर दोघांमध्ये रंगायचं ; परंतु आपल्या गावात तसं नव्हतं . आपलं गावं यासाठी अपवाद
होत .देशमूख पाटलात पिढ्यापिढया सख्य होतं… मैत्र होतं . गावात आनंदाचा बहर होता… पवारपाटील काका माझ्या लहानपणापासून मला त्यांची सुनबाई म्हणायचे . पवारपाटील काकांचा मुलगा
प्रेम ,त्याची बहिण, तुझे बाबा व मी लहानपणापासून सोबत खेळलो . तुझे
बाबा ,मी, प्रेमची बहिण व प्रेम आम्ही बालमित्र .
आम्ही सर्वजण गावात पाचव्या वर्गापर्यंत शिकलो.. आमच्या आजोबांचे मुंबईत बंगले
होते . पाचवीनंतर दोन्ही कुटुंब मुंबईला राहायला गेले . पवार काका व तुझ्या आजोबांची
वडिलोपार्जित मुंबईत कंपनी होतीच त्या व्यवसायानी मुंबईत स्थायीक झाल्यावर चांगलीच छोडदौड सुरु केली होती… व्यवसाय म्हटला की स्पर्धा आलीच. पवार काका व तुझे आजोबा यांच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न स्पर्धकांनी केला व त्यात ते यशस्वी झाले . जिवलग मित्र एकमेकांचे जानी दुश्मन झाले ."
माझी आणि प्रेमची नुकतीच इंजिनिअरिंगची डीग्री पूर्ण झाली होती . डिग्रीनंतर आमचा साखरपुडा करायचं दोन्ही कुटुंबानी ठरवलं होतं..
शत्रुत्वासमोर दोन मनात फुललेल्या प्रेमाला महत्त्व नव्हतं . आम्हा दोघांच्या मनाचा विचार कुणाच्याच मनाला शिवला नव्हता. जेवढया मनापासून मैत्र निभावायचे तेवढ्याच तिव्रतेने शत्रुत्व वाढत होतं… बालपण ते तारुण्य अशी फुललेलं आमच्या दोघांतील मैत्र प्रेमात आकंठ बुडालं होतं . एकमेकांशिवाय आम्हाला राहणं शक्य नव्हतं . एकमेकांसवे आयुष्य जगण्याच्या आणा-भाका आम्ही घेतल्या होता . दोघांतील प्रेमाचा दरवळ आमच्या नसानसांत भिनला होता. त्या प्रमोच्या दरवळानी अस्तित्वातील सळसळता जिवंतपणा उसळून उठायचा . घर छोटंसं सुंदर सुखाचा वर्षाव करणारं .
एकमेकांचा मृत्यूंचा दारातही साथ न सोडणारंआयुष्य जगायचं ठरवलं होतं दोघांनी .दोन कुटुंबात कितीही शत्रुत्व वाढू देत पण आपल्यातील प्रेम त्याच्या दृप्पट वाढवायचं अन् प्रेमानी शत्रुत्वापुढं झुकायचं नाही असं ठरलं होतं आमचं …".
गं ."
राहिलात ?".
नाही . एका त्रयस्ताकडून कळालं की प्रेमनी त्याच्या बाबांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं .
ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली . माझ्या प्रेमाच्या राज्यांची राखरांगोळी झाली .
माझे अस्तित्व मी प्रेमवर उत्स्फूर्तपणे उधळून टाकले होते . माझ्या गर्भात आमच्या प्रेमांकूर वाढत होता . त्या प्रेमांकुराला मला खुडायचं नव्हतं . मी त्याला जन्म दिला. ही गोष्ट जगापासून लपविण्यासाठी घरच्यांनी लोकांशी संपर्क तोडला ."
आतूचं मूलं कुठे आहे ? हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा….
आवडल्यास लाईक करा न आवडल्यास माफ करा .
टीम - अमरावती .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा