वैखरी एक प्रेमकथा भाग-९

A Love Story Of A Girl
कथेचे शीर्षक: वैखरी एक प्रेमकथा
कथेचा विषय : प्रेमकथा
उपविषय : राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
टीम : अमरावती


वसंत : सुहित, तू माझा सच्चा मित्र आहेस . तू माझं चांगलं व्हावं म्हणून धडपडतो . मित्रा वैखरीला मी आवडतो की नाही हे माझ्यासाठी महत्वाचं नाही .
माझा आनंद तिच्या आठवणीत जगण्यातच शोधायचाय मला . मी तो शोधतोय . बघ वैखरीसोबत जुळलेल्या एकतर्फी नात्याला नाही नाही म्हणता चार वर्ष होण्यात आहेत . सुरुवातीला काही महिने त्रास झाला मला पण आता मी सुखी आहे आनंदी आहे. वैखरीसोबत घालवलेल्या अप्रत्यक्ष क्षणांच्या आठवणींमध्ये रमत गमत जगत आहे.आज तर मी अतीआनंदी आहे .
\" शब्द माझे स्वर वैखरीचे \" मी अशी कधी कल्पनाही केली नव्हती . माझ्या शब्दांना झालेला वैखरींच्या ओठांचा स्पर्श माझ्यासाठी अविस्मरणीय अशी अनमोल आठवण आहे.
तिच्या स्वरांचा मंद दरवळ माझ्या रोमारोमांत , मनात अजूनही दरवळतोय . आयुष्यभर तो दरवळ असाच माझ्यासवे राहणार आहे .या सुखद, अनमोल आठवणींचा दरवळ माझ्या जीवनात आनंद पेरतील याची मला खात्री आहे .
वैखरी प्रत्यक्ष माझ्या जीवनात नसली तरी तिच्या आठवणींच्या रुपांत ती पदोपदी माझ्यासवे राहणार आहे .

सुहित : " खरचं रे वसंत तुझ्या शब्दांना वैखरीच्या स्वरांचा साज चढला ही गोष्ट तुझ्यासाठी अविष्करणीयच . असे काही घडेल मी कल्पनाही केली नव्हती ."

वसंत : "माझ्या आठवणींच्या साठवणीत साठवायाला अनपेक्षित सुखद आठवण देण्याचं श्रेय खरं तर स्वराला जातं तिला धन्यवाद पण नाही म्हणालो मी . सुखद धक्क्यातून अजूनही पुरता बाहेर नाही निघालो ."

स्वरा : " काय गप्पा सुरु आहेत दोघांच्या . मी तुमच्या रुमजवळून जात होते . माझा नावाचा उल्लेख झाला . काय केलं स्वरानी जरा मलाही कळू दया ."

वसंत : " स्वरा , घरी येताच आमचं इतकं सुंदर स्वागत केलं . मेहनत घेवून गीताचा सराव
केला . आम्हा दोघांच्या आनंदासाठी किती करतेस . खूप छान गायलीस स्वरा तू . हदयाच्या कोंदणात जपून ठेवावा असा होता तो क्षण ."

स्वरा : अरे दादा, तुम्ही दोघं अमेरीकेला जाणार ही बाब आम्हा सर्वांसाठी आनंदाची अन् अभिमानाची आहे. मला तर माझ्या भावांचा खूपच अभिमान आहे. एवढे हुशार अन् कर्तबगार आहेत माझे भाऊ .
वैखरी पण नेहमीच म्हणते, "स्वरा तू खूप भाग्यवान आहेस .तुला दोन दोन भाऊ आहेत तेही हुशार अन् कर्तबगार ."
तुझी तर फॅनच आहे वैखरी . तुझ्या कविता , कथा , वाचते ती . अभ्यास करतांना तू लिहीलेल्या नोट्स वापरते बाकी नोट्स तिला फारशा आवडत नाहीत . तुझ्या विषयी खूप माहिती विचारत असते सारखी .

वसंत : " खरंच ! काय काय विचारते माझ्या विषयी ."

स्वरा : किती तास अभ्यास करायचा . कुठे राहतो . आईबाबा काय करतात . वगैरे वगैरे

वसंत : "तिला माहिती आहे मी अनाथ आहे ते."

स्वरा : "हे बघ दादा पहिले तर स्वतःला अनाथ म्हणू नकोस . आमचा भाऊ ना तू ? तुला मुलगा मानतात ना आईबाबा ?".

वसंत : " हो गं तुम्ही सगळेजण मला भरभरून प्रेम देता . आईकाका तर सुहितवर करतात तेवढे प्रेम माझ्यावर करतात जाणवतं मला ते . मी अनाथ मुलगा आहे हे वास्तव बदलणार आहे का? सत्य स्विकारून जगावं माणसानं .असं मला वाटते ."

सुहित : "वसंत तुझी जीवनाचं तत्त्वज्ञान बाजूला ठेव . फार कठीण तत्त्व आहेत तुझे . माझ्या तर डोक्यावरून जातात . स्वरा तू पण जा अभ्यास कर . तुझे फायनल सेमीस्टर आहे ना ."

स्वरा : " दादा . तू समजावून सांग जरा वसंतदादाला . आणि हो नीट बॅग भरा . आठवणीनी सर्व बॅगेत टाका . तीन दिवसानी तुम्ही अमेरीकेला जाणार याचा आनंदही आहे आणि वर्षभर भेट नाही होणार याचे दुःखही ."
वसंत : " हो गं स्वरा . तशीच आमच्याही मनाची अवस्था आहे ."

सुहित : " हो नं . पण जावं तर लागणारचं करिअरचा प्रश्न आहे वसंता . तुझ्या भाषेत वास्तव स्विकारावं ."

स्वरा : "चला ओके बाय निघते मी . कॉलेजलाही जायचे आहे."
स्वराला बाय बाय गुड डे म्हणत वसंत व सुहित त्यांच्या तयारीला लागतात .

सुहीतची आई मुलांना सोबत काय काय द्यायचं याचा विचार करून याबाबत घरातील नोकर माणसांकडून तयारी करून घेण्यात व्यस्त असते .

सुहितही अमेरिकेला जाण्यासाठी खूप उत्सुक असतो . वसंतची मनस्थिती अस्थिर असते कारण वैखरीचे वर्षभर झलक दिसणार नाही याबाबत तो दुःखी असतो . घरी चार दिवसात दररोज वसंतला वैखरीचं दर्शन झालं परंतु चूकूनही त्याच्या मनात असे काही आहे हे वैखरीला कळाले नाही वसंतचं गुपीत सुहितशिवाय कुणालाही ठाऊक नव्हतं .

बाबा : "चला, चला पटकन फ्लाईट मिस्ड
हाईल . अगं लीना रडू नकोस . मुलं कायमची नाही चाललीत अमेरिकेला दोन वर्षासाठीच चालतीत . वर्षभरानी भेटायला येतीलच नाहीतर आपण जावू ."

स्वरा : " हो गं मम्मा . आपण जावू तू म्हणशील त्यावेळी ."

सुहित व वसंत आईबाबांना नमस्कार करून आशीर्वाद घेतात . स्वराची गळाभेट घेवून अमेरिकेला निघतात.

स्वरा : "अगं वैखरी आज कॉलेज नाही . सुहितदादा व वसंतदादा अमेरिकेला गेलेत आई पण खूप उदास आहे. बाबा ऑफिसला गेलेत . काहीच करमत नाही आहे गं . तू येतेस का ?
सायंकाळी ड्रायव्हर काका पोहचून देतील
तुला ".

वैखरी : "हो येते गं स्वरा . काकूंशी गप्पा कर जरा त्यांचं मन रमेल ."

स्वरा : " थॅक्यू वैखरी . ये लवकर ."

वैखरी : "ये वेडाबाई थॅक्यू वगैरे काय म्हणतेस . ठेव फोन. आतू अन् आईला सांगते व लगेच निघते ."

राधाकाकू : स्वराताई…. वैखरीताई आल्या बघा .या या वैखरीताई . स्वराताई तुमचीच वाट बघतायसा .

वैखरी : " काय गं जेवलीस की नाही . काकू कुठे आहेत ."

स्वरा : "अगं आई बेडरूममध्ये आहे. जेवण पण नाही केले तिनी ."

राधाकाकू : " वैखरीताई मी ताटं वाढते तुम्ही घेवून या मालकीणबाईसणी ."

वैखरी : " हो काकू वाढा ताटं . आलेच मी स्वरा व काकूंना घेवून ."

वैखरी : "काकू चला मला भूक लागलीय . आपण जेवण करून घेवू ."

काकू : अगं पहिल्यांदा असे दूर देशात गेलेत गं मूलं . मन अस्वस्थ आहे. तू आणि स्वरा जेवून घ्या .मी पडते थोडावेळ .

वैखरी : " नाही नाही काकू . सोबत जेवण करू
आपण , जेवण झालं की आराम करा तुम्ही ."

वैखरीच्या आग्रहामुळे काकू जेवायला येतात .
जेवण झाल्यानंतर थोडावेळ हॉलमध्ये बसूया म्हणून वैखरी काकूंना हॉलमध्ये बोलवते .
इकडच्या तिकडच्या गप्पा मारते . त्यानंतर काकू बेडरूममध्ये आराम करायला जातात. स्वरा व वैखरी स्वराच्या रुममध्ये जातात .

स्वरा : " वैखरी काय झालं . तू आल्यापासनं
बघते . तुझा चेहरा नेहमीप्रमाणे फुललेला दिसत नाही . ती चमक नाही . चेहर्‍यावरिल आनंद हरवलाय तुझ्या .का घरी काही झालं का?"

वैखरी : "नाही तसं काही नाही ."
स्वरा : " काहीतरी बाब आहे ज्यामुळे तूझा चेहरा पडलाय."

क्रमशः

वैखरीच्या चेहर्‍यावरिल आनंद हरवल्याचे कारण काय? हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा .

वैखरी एक प्रेमकथा भाग-१०

कथा आवडल्यास लाईक , कमेन्ट करायला विसरू नका .
न आवडल्यास क्षमा करा .

धन्यवाद !

©® ऍड. नीता प्रफुल्ल कचवे .
टीम - अमरावती .









🎭 Series Post

View all