वैखरी एक प्रेमकथा भाग-८

A Love Story Of A Girl

कथेचे शीर्षक - वैखरी एक प्रेमकथा भाग-८
विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .



पूर्वांध: सुहित आणि वसंत दोघे मित्र बंगलोर वरून कंपनीतर्फे अमेरिकेला जाणार आहेत .

पुढे वाचा भाग - ८…..


सुहित : "वसंत पुढल्या महिन्यात आपण अमेरिकेला जाणार हे निश्चित समजायचं ना ? "
वसंत : "का विचारतोस . जायची तयारी तर झाली नं आपली ? प्रोसीजरमध्ये काही राहून गेलं का ?".
सुहित : "किती न समजल्याचं सोंग करतोस ."
प्रोसीजरमध्ये तर महत्वाचं राहिलं . तोंड बघ

आरशात . किती उतरला चेहरा . वैखरी बद्दल बोलतोय मी . जाणतोस तू .
वसंत : " कळतयं मला पण न समजल्याचं सोंग घेतोय मी . यापेक्षा माझ्या हातात काहीच नाही . माझं मन इथेच सोडून जाणार मी . अमेरिकेला गेल्यावर वर्षभर वैखरीचं दर्शन नाही होणार . महिन्यातून एकदा दर्शन झालं की महिनाभर सुखानी जगायचो . पुन्हा ओसरती का होईना वैखरी दिसनार ही आशा असायची

मनाला . सुहित चारदिवस का होईना घरी राहायला मिळणार वैखरी दिसली की तिला डोळेभरून बघणार तिनी मला वाईट मुलगा म्हटलं तरी चालेल ".
सुहित : "म्हणूनच पुन्हा सांगतोय . सांगून टाक वैखरीला मनातलं ."
वसंत :" मलाही तसंच वाटतय रे, खूप बोलावसं वाटतं वैखरीशी ;पण नाइलाज आहे ."
बरं चल, अमेरीकेची बॅग भरून ठेवली तर घरून आल्यानंतर काहीच काम बाकी राहणार नाही
एक दिवस घरी जास्त राहता येईल ."
सुहित : " किती सुंदर ! ये त्यादिवशी गातांनाची भावमुद्रा ही वैखरीचं . किती हुबेहुब रेखाटलं
वैखरीला . बघून वाटतयं आता तोंडातून स्वर बाहेर पडतील . चित्र वाटतच नाही .
घे ठेव वैखरीला अमेरिकेच्या बॅगेत . न्यायचय ना वैखरीला सोबत ? "
वसंत वैखरीचे चित्र हातात घेतो अन् स्वप्नात रंगून जातो…..


ऐक ना…..

जीव जडलाय तुझ्यावर असा
जगू मी तुझ्याविना कसा ?
सांग ना….. sss

आठवणीत तुझ्या रमतोय गं
स्वप्नात तुला रोज भेटतोय गं
तरी मन माझे भरेना….sss
जीव जडलाय तुझ्यावर असा
जगू मी तुझ्याविना कसा ?
सांग ना……ssss

तू दिसताच मी मनाला आवरतो गं
आतून तुझ्याशी बोलायला तरसतो गं
तुझ्याशी बोलावं कसं कळेना….ss ss
जीव जडलाय तुझ्यावर असा
जगू मी तुझ्याविना कसा?
सांग ना….ssss

तुला उद्या बघून नजरेत साठवणं गं
तुझ्या आठवणी हदयात जपेल गं
तुझ्याविना क्षणही माझा जाईना…..ss ss
जीव जडलाय तुझ्यावर असा
जगू मी तुझ्याविना कसा?
सांग ना…..ssss
ये वैखरी ऐक ना…

"ये वसंता, जागेपणी स्वप्न काय बघतोस ",

सुहित वसंतला हलवत त्याला स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर काढतो .

" वसंत ठेवून दे बाबा तो फोटो बॅगेत लवकर झोप आता उदया लवकर उठायचे आहे नाहीतर फ्लाईट सुटेल . स्वप्नात भेटल्यापेक्षा वैखरीला उद्या प्रत्यक्ष भेट", सुहित वसंतची मजा घेतो .

"चल सुहित गुड नाईट ", वसंत.

वसंत व सुहितची घरची मंडळी वाट बघत असतात . सुहितचे बाबा सुद्धा आज घरी थांबलेले असतात.
वसंत व सुहित येताच वैखरी व स्वरा
सुरात गाऊन दोघांचे congragulations..ss
अभिनंदन …sss करतात .
"Wow!what a surprise !", सुहित आनंदानी उदगारतो .
वसंतचे डोळे वैखरीला बघत असतात .
कान वैखरीचे मधूर स्वर ऐकत असतात .तरीही त्याला विश्वासच बसत नाही की हे प्रत्यक्षात घडत आहे. त्याला हे एक गोड स्वप्न असल्याचं वाटत होतं .
हळूच वसंत सुहितला विचारतो, "सुहित आपण घरी आलोय का ?"
"हो रे वसंत, का विचारतोस ? बरं नाही का
तुला ?", सुहित वसंतला काळजीनी विचारतो .

स्वप्न नसून सत्य आहे कळाल्यावर वसंतसाठी हा क्षण सरप्राईज गिफ्ट मिळाल्यावर जे फिलींग असतं तसा होता .

स्वरा व वैखरीला सुहित धन्यवाद देतो . वसंत मात्र अद्यापही अनपेक्षित सुखद धक्क्यातून बाहेर आलेला नसतो .
"वसंतदादा तुला आवडलेलं दिसत नाही आमचं सरप्राईज ," स्वरा वसंतला विचारते .

"खूप आवडलं स्वरा " म्हणत वसंत गोंधळलेल्या
अवस्थेतच धन्यवाद स्वरा म्हणतो .
वैखरीजवळ जावून तिच्याकडे न पाहता तिलाही "Thank you very much " म्हणतो .
वैखरी तटस्थपणे, वसंतला my pleasure म्हणते .

वसंत व सुहित आईबाबांच्या पाया पडून आशीर्वाद घेतात. आई दोघांनाही पेढा भरवते .
घरात नोकर चाकरांना मिठाई वाटली जाते. सगळीकडे आनंद दरवळत असतो . वसंत मात्र सुखद धक्क्यातून सावरलेला नसतो .

"चला सुहित व वसंत फ्रेश व्हा पटकन . सोबत जेवण करू ," आई सूचना करते .
सुहित : "स्वरा कोणाची आयडीया होती ही किती सुंदर गायलात दोघीपण ."
स्वरा : "तुम्हा दोघांच्या स्मरणात राहावा हा दिवस असं काहीसं करू असं मी वैखरीजवळ बोलली . तर तिनेच आयडीया दिली की छान अभिनंदन पर गीत गाऊन स्वागत करायचं .
ती गीत शोधत होती . मला वसंत दादानी लिहीलेलं व तू स्वरबध्द केलेलं गीत आठवलं . मी माझ्या वहित लिहून ठेवलेलं होतच गीत तुझ्या आवाजातील ऑडीयो क्लीपही मोबाईमध्ये होती . ती आम्ही दोघींनी ऐकली व सराव केला ."
सुहित : "तुला पण छान गाता यायला लागलं . तसा तुझा आवाज गोडचं आहे पण आज शास्त्रशुद्ध वाटला ."
स्वरा : "स्वरा मला शास्त्रीय गायन शिकवत आहे. "
सुहित : "अरे वा! छानच ."
आई : "झाल्या असतील गप्पा तर या सर्वजण जेवायला ."

सर्वजण डायनिंग हॉलमध्ये येतात. जेवण करतांना सर्वजण आनंदानी गप्पा गोष्टी करत असतात. बाबा सुहित व वसंतच्या भविष्याच्या योजना बाबत बोलत असतात. वसंतचं मात्र कुठेच लक्ष नसतं . चोरट्या नजरेनी सर्वांची नजर चुकवून वैखरीला वसंत बघत असतो .
तसंच काहीसं वैखरीचं सुरु असतं .
"किती सारखेपणा आहे आतूच्या आणि वसंतच्या चेहऱ्यात " वैखरी मनातल्या मनात .विचार करत होती वैखरीचं वसंताला चोरट्या नजरेनं बघतांना पाहून सुहितला वाटलं, "आग दोनो तरफ से है ।"


जेवण आटोपल्यावर वैखरी वेळ झाल्यामुळे घाईत घरी निघून गेली .

वसंत व सुहित त्यांच्यारुममध्ये गेले .
वसंतचा चेहरा आनंदानी फुललेला होता .
"वसंत , आग दोनो तरफ से बराबर लगी है मेरे
दोस्त ", सुहित वसंतला म्हणाला .
"सुहित मी खूप चांगल्या मुड मध्ये आहे प्लीज चिडवून माझं मूड बिघडवू नकोस," वसंत सुहितला म्हणाला .
सुहित : "अरे नाही वसंत मी पण चिडवायच्या मूडमध्ये नाही . जे बघीतलं ते सत्य तुला सांगतोय ".
वसंत : आता कोणते सत्य सांगतोस .
सुहित : " मी माझ्या ह्या डोळ्यांनी बघीतलं . वैखरी तुला सर्वाचं लक्ष चुकवून चोरून बघत होती . तिला तू आवडतोस तिचा चेहरा सांगत होता ."
वसंत : सुहित तू तुझ्या डोळ्यांनी बघीतलेलं असेलही खरं . त्याच्याशी मला काही घेणंदेणं नाही . तिनी माझ्यावर प्रेम करावं ही माझी इच्छाच नाही त्यामुळं ही माझ्यासाठी आनंदाची बाब नाही .
सुहित :" काय विचित्र आहेस तू वसंत ? काय आनंद झाला होता मला . तुला सांगण्याची घाई पण झाली होती पण आनंदावर तुझ्या अशा महान विचारानी विरजन पडलं ."


क्रमशः


वसंतचा आनंद नेमका कशात आहे ? वैखरीला वसंतच्या भावना कळतील का? हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा
वैखरी एक प्रेमकथा भाग ९


प्रिय वाचक स्नेहींनो,
कथा आवडल्यास लाईक कमेन्ट जरूर करा .
न आवडल्यास माफ करा .

धन्यवाद !

©® ऍड. नीता प्रफुल्ल कचवे .
टीम- अमरावती .












🎭 Series Post

View all