वैखरी एक प्रेमकथा भाग -७

A Love Story Of A Girl

कथेचे शीर्षक - वैखरी एक प्रेमकथा भाग-७
कथेचा विषय- प्रेमकथा
कथेचा उपविषय- राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .



पूर्वाध : भाग ६ मध्ये आपण बघीतलं की सुहित आणि वसंतला लठ्ठ पगाराची बंगलोरला नोकरी
मिळाली . नोकरीला रुजू होण्याआधी दोघेही सुहितच्या घरी आलेत . नोकरीचा आनंद म्हणून आईबाबा स्वरानी छानशी छोटीशी अभिनंदन पार्टी अरेंज केली होती……..

आता पुढे भाग-७

        सुहित व वसंत दोघेही बंगलोरला नोकरीला रुजू होतात . दोघेही मित्र छान आनंदी असतात. कॉपरेट सेक्टर मधला अनुभव घेत असतात. दोघेही हुशार . कंपनीत नोकरी करत असतांनाच दोघांचेही वेगवेगळे प्रयोग सुरु असतात. वसंतच्या नावावर दोनवर्षात दोन पेटेंट व सुहितच्या नावावर एक पेटेंट अशी संशोधन क्षेत्रातही दोघा मित्रांची घौडदौड सुरु असते .
सुहितचे आईवडिल दोघांवरही खुश असतात .

" वसंत बाबांचा फोन आहे ", सुहित वसंतला सांगतो .
"घे काय म्हणतात काकाजी बघ ", वसंत म्हणतो
बाबा: "हॅलो बेटा ."
सुहित: " हॅलो बाबा ".
बाबा : "कसे आहात तुम्ही दोघ " .
सुहित : "मजेत आहोत बाबा ; पण तुम्हा सगळ्यांची   आठवण  येते . आई कशी आहे बाबा ? ".
बाबा : "मजेत आहे . वसंत कुठे आहे."
सुहित : "बाजुलाच बसलाय माझ्या ".
बाबा : "फोन स्पीकरवर ठेव . मला तुम्हा दोघांशीही   बोलायचं आहे ."
वसंत : "नमस्कार काका ".
बाबा : "वसंत बेटा कसा सुरु आहे जॉब ".
वसंत : " मस्त सुरु आहे काका . कार्पोरेट सेक्टरचा बराच अनुभव मिळत आहे . नवनवीन ज्ञान               मिळत आहे आणखी दोन पेटेंटची तयारी सुरु          आहे ".
बाबा : "गुड व्हेरी गुड . मला विश्वास आहे तुम्ही      दोघेही   या क्षेत्रात खूप मोठे होणार आहात .माझं असं म्हणणं होतं की दोन वर्षात  दोघांनीही कार्पोरेट क्षेत्राचा बराच अनुभव घेतला . आता वेळ आहे तुम्ही दोघांनी आपला बिझिनेस सांभाळायची . काय मत आहे तुम्हा दोघांचं याबाबत ? ."

सुहित : बाबा कंपनीकडून दोघांनाही अमेरिकेला       जाण्याची संधी आहे. काहीकाळ तिथलाही          अनुभव घ्यावा अशी आम्हा दोघांचीही इच्छा           आहे. अर्थातच तुमची परवाणगी असेल तरच          आम्ही तसं करू नाहीतर तुम्ही म्हणाल तसं            करू .
बाबा : " अरे वा! छानच विचार आहे . काही हरकत नाही . मी अजून टनाटन आहे. सांभाळू  शकतो बिझिनेस . सहा सात वर्षानंतर ही धूरा तुम्हालाच सांभाळायची आहे . नाहीतर  अमेरीकेहून यायची इच्छाच होणार नाही . असं नको व्हायला ".
वसंत : "नाही नाही काका . असं होणार नाही .         आपला बिजीनेस सर्व देशात चालेल तोपर्यंत          तुम्ही म्हणत असाल तर आताच आम्ही               अमेरिकेला जाणार नाही . तुमच्या शब्दांबाहेर आम्ही दोघेही नाही ."
वसंत : " हो की नाही रे सुहित ".
सुहित : " हो बाबा . तुम्ही म्हणाल तसं ."
बाबा : "नाही नाही . तुम्ही दोघेही जबाबदार आहात योग्यच विचार करता . अनुभवानी समृद्ध                झालात तर आपला बिझीनेस कमी वेळात               वेग पकडेल मला खात्री आहे ."
वसंत : "काका आमच्यावर विश्वास टाकून तुम्ही    आमचा आत्मविश्वास वाढवला . धन्यवाद                   काका ."
सुहित : " हो बाबा वसंत बरोबर बोलतोय ".
बाबा : "बरं ऑल दी बेस्ट . चला शुभरात्री ".
सुहित व वसंत : "शुभरात्री !"


सुहित व वसंतचं अमेरिकेला जायचं निश्चित झालं . वसंतला अमेरिकेला जायचं होतं तरीही चेहर्‍यावर आनंद दिसत नव्हता हे सुहितच्या लक्षात आले .

"वसंत आपण अमेरिकेला जायच्या आधी तू प्लीज वैखरीशी बोल नं . तिचं उत्तर काहीही असो एकदा सांगायला हवं होतं .सांगीतले का नाही . असा पश्चाताप व्हायला नको ." सुहित वसंतला समजावत होता .

"सुहित तुला माझा निर्णय माहित असतांना वारंवार तोच विषय का काढतोस ?", वसंत म्हणाला .

"बरं ठीक आहे .नाही काढणार विषय . वैखरीचं लग्न दुसऱ्यासोबत झाल्यावर पश्चाताप नको व्हायला ; म्हणून सांगतोय तुला वारंवार ", सुहित म्हणाला .

"मला वैखरीला माझ्या मनातील भाव सांगायचे नाहीत हे निश्चित . तिला भेटायचं मात्र आहे",वसंत म्हणाला .

"म्हणजे ? तुला एकट्यात भेटायचं का तिला ?
कशासाठी ?", सुहित म्हणाला .

"नाही रे . एकट्यात नाही . आपल्या घरी गेलं की वैखरीचं दर्शन होणारच . घरी आली की काहीना काही बोलणं होणारच . तसे भेटणे म्हणतोय मी ", वसंत म्हणाला .

"अच्छा ! दुरुन दर्शनच जास्त होणार . वैखरी मैत्रीणींसोबत मोकळी वागते मुलांशी बोलणं तसं ती टाळतेच . स्वरा सांगत होती . तसंही आपल्यालाही तो अनुभव आला . ती फारसी बोलत नाही आपल्या दोघांशी ", सुहित म्हणाला

"हो रे, काय कारण असेल ? तशी ती लाजाळू वाटत नाही . कमी बोलणारीही वाटत नाही . चेहरा अगदीच बोलका आहे वैखरीचा", वसंत म्हणाला .

"अच्छा बच्चू ! फारच संशोधन केलेस
वैखरीवर ", सुहित म्हणाला .

"हो केले . काय म्हणणं आहे तुझं . एकच चेहरा आहे जो जागेपणी तसेच झोपल्यावरही सतत नजरेत असतो ", वसंत म्हणाला .

"अरे वा! प्यार का इजहार . माझ्याजवळ केल्यापेक्षा हे वैखरीला सांग ", सुहित म्हणाला .

" आलास पुन्हा त्याच विषयावर ? गाढवापुढे वाचली गीता रात्रीचा गोंधळ बरा होता असं आहे तुझं ", वसंत चिडून बोलला .

"बरं बरं चिडू नकोस . आपण आपल्या घरी जावू दुरुन दर्शनाच्या आठवणी गोळा करं . अमेरिकेला सोबत घेवून जायला ", सुहित गंमतीनी म्हणाला .

"सुहित तू गंमतीनी बोलत असला तरी हे सत्य आहे. आठवणी गोळा करायलाच जायचं आहे मला घरी ", वसंत भावनीक होवून म्हणाला ..

"वसंत खरंच वैखरीचं मुलांशी मैत्री न करण्यामागे कारण काय असावं ", सुहित म्हणाला .

"स्वराला ठाऊक असेल . फोन करून विचार ", वसंत म्हणाला .
"अचानक असं विचारलं तर ती सुद्धा प्रतिप्रश्न करेल ना की का विचारतोस ?", सुहित म्हणाला

"हो ,तुझंही बरोबर आहे. सहज फोन कर . गप्पा करता करता विचार . कसलीस शंका येणार नाही मग स्वराला ", वसंत म्हणाला .

सुहित : " हॅलो स्वरा कशी आहेस?".
स्वरा : "मजेत आहे . तू आणि वसंतदादा कसे

          आहात ?".

सुहित : "मजेत आहोत .स्वरा तुझा अभ्यास कसा सुरु आहे ."
स्वरा : " छान सुरु आहे दादा . मी आणि वैखरी सोबत अभ्यास करतो . वैखरी अभ्यासात खूप हुशार आहे . अगदी वसंत दादासारखी .मदत करते वैखरी मला अभ्यासात अडचण आली तर ."
सुहित : " अरे वा! छानच . तू वैखरीकडे जातेस का गं कधी कधी अभ्यासाला . "
स्वरा : "नाही दादा . मी अजूनही वैखरीकडे गेलेले नाही . तिनी कधी बोलवलाही नाही ."
सुहित : असं कसं ? एवढ्या पक्क्या मैत्रीणी तुम्ही.    तरी तू वैखरीचं घरही बघीतलं नाहीस .
स्वरा :" हो नं ती कधी घरी ये वगैरे म्हणनाही . ती घरी न्यायचं टाळते . तिच्या घरी  खूप  स्ट्रीक्ट वातावरण असावं असा माझा  अंदाज आहे ."
सुहित :" हो गं . जरा वेगळीच आहे वैखरी .              इंजिनिअरिंगची मुलगी अन् मुलांशी मैत्री करायला आवडत नाही . कॉलेजमध्येही मुलांशी बोलत नाही का ?"
स्वरा : "नाही फारशी नाही बोलत . कामाशी काम      ठेवते. मैत्री वगैरे नाही . तशी स्वभावानी  बोलकी आहे पण मुलांशी वागतांना एक  लक्षणरेषा आखून घेतल्यासारखं तिचं वागणं आहे ."
सुहित : "घरी कोणकोण असते वैखरीच्या ".
स्वरा : "आईबाबा, आत्या व वैखरी ".
सुहित : "बाबा काय करतात वैखरीचे?"
स्वरा : " मोठे बिझीनेसमॅन आहेत . खेड्यावर भरपूर शेती आहे तिच्याकडे ."
सुहित : "आडनाव काय गं वैखरीचं ?".
स्वरा : "देशमूख ."
सुहित : "अच्छा !"
स्वरा : "तू का विचारतोस ?"
सुहित : "अगं तिचं वागणं वेगळचं आहे म्हणून काय  सस्पेंन्स पर्सनालिटी आहे म्हणून उत्सुकतेनी विचारलं  त्यात तुझी खास मैत्रीण . माझी  लाडकी बहिण कुणासोबत राहते माहिती नको का ठेवायला ."


स्वरा : " चांगली मुलगी आहे स्वरा . आता चार वर्षे    होतात आहे आमच्या मैत्रीला . कधी साधे मतभेदही नाही झाले आमच्यात . सुस्वभावी, समजुतदार मुलगी आहे ती . तू  नको काळजी करूस माझी".

सुहित   :  "ओके . चल बाय . टेक केअर . आम्ही        दोघं येणार   आहोतच घरी एवढ्यात ."

स्वरा      :  "ओके बाय दादा . या वाट बघतोय आम्ही  सर्वजण तुमची ."


क्रमशः


प्रिय वाचक मित्र मैत्रीणींनो,

कथेत पुढे काय होणार ? वैखरी बद्दल आणखी जाणून घेण्यासाठी नक्की वाचा .
वैखरी एक प्रेमकथा भाग-८

कथा आवडल्यास लाईक कमेन्ट जरूर कराल .
न आवडल्यास माफ करा .

धन्यवाद !

©®✍️ ऍड. नीता प्रफुल्ल कचवे .
टीम- अमरावती .