Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

वैखरी एक प्रेमकथा भाग-६

Read Later
वैखरी एक प्रेमकथा भाग-६

वैखरी - एक प्रेमकथा भाग-६

कॅटेगिरी - प्रेमकथा
सब कॅटेगिरी - राज्यस्तरिय करंड कथामालिका
टीम - अमरावती .


पूर्वाध : सुहित आणि वसंत कॉलेजचे सेमीस्टर आटोपून सुट्यांमध्ये घरी आले त्या आनंदात आईने आज पुरणपोळी केली . स्वराची खास मैत्रीण वैखरीलाही स्वराने जेवायला बोलवले .

पुढे- भाग-६…..

        रामू काका व राधा काकूनी ताटं वाढली .सर्वांना जेवायला हाक मारली …

          स्वरा व वैखरी लगेचचं डायनिंग रूममध्ये

आल्या . सुहित व वसंतची वाट पाहत
काकू ,स्वरा व वैखरी थांबल्या.
पाच मिनीटानंतर काकूंनी पुन्हा राधाकाकूला मुलांना बोलवायला पाठविले.

"दादासाहेब, चला लवकर, मालकीण बाई

थांबल्यासा ", राधाकाकू .

" चल वसंत बघ आई वाट बघतेय ", सुहित .
"हो, चल तू हो पुढे मी आलोच ", वसंत .

   मनातले भाव चेहर्‍यावर येणार नाही अशी मनाची तयारी करत वसंत डायनिंग रुमकडे निघाला .

" वसंतदादा, ही माझी जीवलग मैत्रिण वैखरी ", स्वरानी वसंतला वैखरीची ओळख करून दिली .

"वैखरी हा वसंतदादा . सुहितदादाचा मित्र तसेच आम्हा दोघांचा भाऊपण . बाबांनी मुलगा
मानलयं वसंतदादाला ", स्वरा .

" वैखरी आपण vasant"s Notes वापरतो ना त्याचा लेखक हाच तो वसंतदादा ", स्वरा

"काय !" वैखरीने , आश्चर्यानी स्वराला विचारले .


"हो . हाच तो वसंतदादा", स्वरा .

"नमस्कार!", वसंत .

" नमस्कार !" ,वैखरी .


सर्वजण जेवायला बसले . गोंधळ, थोडी उत्सुकता, थोडं दडपण अशी मनातील संमित्र भावना चेहर्‍यावर दिसणार नाही याची खबरदारी घेत वसंतनी जेवण आटोपलं .

          वैखरी राहून राहून वसंतकडे बघत होती . ही गोष्ट स्वरा व सुहित दोघांच्याही नजरेतून सुटली नाही.

वसंत जेवण आटोपताच कुणाशीही न बोलता पटकन रुमकडे निघाला तसाच सुहितही वसंतच्या मागोमाग निघाला .

      वसंतच्या हदयाचे ठोके जलद झाले
होते . चेहर्‍यावर आनंदही ओसंडून वाहत होता .

"काय वसंत ! खूश दिसतेय गाडी . वैखरीशी आज ओळख झाली . खास दिवस तुझ्यासाठी ", सुहित

"हो रे सुहित . पण… कमालिचं दडपण आलं होतं मला जेवतांना तरीही मनातले भाव चेहर्‍यावर उमटणार नाहीत ही दक्षता घेतली ", वसंत .

" कमालीचा ऍक्टर आहेस तू वसंत . तुझ्या चेहर्‍यावर मनातलं काहीचं नाही दिसलं .
आता मात्र ते दिसतयं ", सुहित .

" कसला ऍक्टर न् कसलं काय . माझं मला माहित किती कठीण होता तो प्रसंग . पटकन तिथून निसटायची घाई झाली होती मला .
आणखी काही वेळ थांबलो असतो तर नक्कीच मनातलं डोळ्यात उतरलं असतं . डोळे ऐकत नव्हते मला . खूप आवरलं मी डोळ्यांना . त्यांना मन भरून वैखरीला पाहचं होतं अगदी
जवळून . खूप कठीण आहे रे हे सगळं . फार त्रास होते मनाला . ", वसंत .

" फिर बच्चू प्रेमाचं प्रतिक गुलाब आहे हे विसरू नकोस ", सुहित .

" हो खरं बोललास सुहित, जेवढे नाजूक फुल तेवढे बोचरे काटे . बोचरे असले तरी हवेहवेसे वाटणारे ", वसंत .

" तुझ्या प्रेमवाटेवरिल काटे हवेहवेसे वाटणारेच राहो . तुझ्या प्रेमाच्या बागेत सदा गुलाब फुललेलेच राहो ही सदिच्छा दोस्ता ", सुहित .

 "  वैखरी एक विचारू का ?, " स्वरा .

"अगं स्वरा असं का विचारतेस ? बोल नं काय बोलायचय . परवाणगी घेण्याजोगी अशी कोणती विशेष गोष्ट आहे ?", वैखरी

  " अगं काल तू वसंतदादाकडे वारंवार बघत होती .

आवडला की काय वसंत दादा तुला ", स्वरा .

  "  कायतरी काय बोलतेस स्वरा ? या गोष्टींना माझ्या जीवनात जागा नाही . मी तो विचारही करू शकत नाही ", वैखरी .

"का ? " स्वरानी वैखरीला प्रश्न केला .

" ते आता विचारू नकोस ? वेळ आल्यावर सांगेल

तुला ", वैखरी म्हणाली .

"बरं जाऊ दे .मी आपली सहज गंमत केली गं मैत्रीण म्हणून ", स्वरा म्हणाली .

       " नाही तुझी शंका बरोबर आहे स्वरा . मी बघत होते वसंतकडे . त्याच्याकडे पाहून मला आजीनी सांगीतलेली एक गोष्ट खरी वाटायला लागली की एका चेहर्‍याचे जगात सात व्यक्ती असतात ",वैखरी म्हणाली .

"वसंतदादासारखं तुला कुणी दिसलं की काय ?", स्वरानी वैखरीला विचारले .


       "हो गं . वसंतची मिशी काढली की तो माझ्या आतु सारखा दिसेल . तसंच लांब नाक . मोठेमोठे डोळ . तसाच गोरापान रंग . नाकावर तीळ व आतूसारखीच उजव्या गालावर खळी . केस पण दाट काळेशार कुरळे अगदी आतूच्या केसांसारखे ", वैखरी म्हणाली .

" स्वरा , वसंतचे आई बाबा कुठे असतात ", वैखरीने स्वराला विचारले .

       "  बिचारा वसंतदादा आईचे काल्पनिक चित्र काढत असतो . नाही माहित गं त्याचे आईबाबा कोण आहेत ते . वसंतदादा अनाथआश्रमात लहानाचा मोठा

 झाला . अठरा वर्षाचा पूर्ण झाल्यावर बाबांनी त्याला आमच्याकडे आणले राहायला ",

"अच्छा ! ", वैखरी उदगारली . स्वराचे बोलणे ऐकूण वैखरीच्या डोक्यात अनेकानेक प्रश्नांनी गर्दी केली .

"बरं स्वरा निघते मी .बाय ! ", स्वराचा निरोप घेवून वैखरी निघाली .


वसंत, वैखरी निघत आहे .
बघ खिडकीतून . वसंतचा हात ओढत सुहित वसंतला खिडकीजवळ आणतो .

वसंत वैखरीला नजरेच्या टप्प्यात असेपर्यत बघत राहतो . .

"ये वसंत, मी काय म्हणतो, ऐक ना ."…., सुहित वसंतशी बोलत होता मात्र वसंतचं लक्ष नव्हतं .
" वसंत….sss अरे गेली वैखरी . आता माझं ऐक", सुहित वसंतला हलवून बोलला .

" हं…. काय म्हणालास सुहित तू ?", वसंत .

" अरे वसंत, मी म्हटलं की वैखरी आपल्याकडे नेहमी येणार आहे . योग्य वेळ बघून सांगून टाक नं एकदाचं वैखरीला ", सुहित .

" सुहित आपलं या विषयावर यापूर्वीच बोलणं झालं की मी वैखरीवर प्रेम करत असलो तरी मला तिला ते सांगायची इच्छा नाही . यापुढे हा विषय काढू नकोस ", वसंत उत्तरला .

"बरं बाबा! तू बघ तुझं . मी नाही बोलणार . एक मात्र लक्षात ठेव व्यक्त केल्याशिवाय प्रेम नाही फुलणार ," सुहित .

" प्रेम तर केव्हाचं फुललं . जरी एकतर्फी असलं तरी त्या प्रेमाचा मंद मंद दरवळ माझ्या मनाला सुंगधित करतो ," .. वसंत .


वैखरीचं स्वराकडे येणं जाणं नेहमीचचं .
वैखरी आली की , नेहमीच वसंतच्या हदयाचे ठोके वाढतात. समोर आल्यावर नजर भरून वसंत वैखरीकडे कधीच बघत नाही . तिचं लक्ष नसतांना वैखरीला नजर भरून बघायचं अन् तो क्षण हदयात साठवून ठेवायचा असं वसंतचं
प्रेमपुराण सुरु होतं .

त्याला वैखरी विषयी काहीच वाटत नाही असं दाखवायचा . हाय ,हॅलो एवढचं बोलायचा . वैखरी सुद्धा हाय, हॅलो पुरतीच बोलायची .


      वसंतच्या हदयात वैखरीसाठी आभाळभर प्रेम असतांना त्यानी ते वैखरीला एकाही भेटीत दाखवलं नाही . सुहित वसंतला पुन्हा पुन्हा आग्रह करायचा . संधी पाहून वैखरीला मनातलं सांग .त्यावर वसंत उत्तर नेहमीप्रमाणं ठरलेलं .

     वसंत व सुहितच्या सुट्या संपल्या . वसंत
वैखरीच्या कित्येक आठवणी हदयात साठवून
कॉलेजला गेला. तिथे फायनल सेमीस्टरचा अभ्यास व्यवस्थित करून थोडा वेळ हदयाच्या साठवणीतील वैखरीच्या भेटीतील सोनेरी क्षण आठवून तिच्या स्वप्नात रंगून वैखरीला भेटायचा .
असं त्याचं नित्य सुरु होतं .

      सुहित व वसंत दोघांनाही प्रत्येक सेमीस्टरला चांगले गुण मिळाले त्यामुळे दोघांचेही एकाच मल्टीनॅशनल कंपनीमध्ये भरपूर पॅकेजवर सिलेक्शन झाले . दोघेही डीग्री झाल्यावर बंगलोरला नोकरी जॉईन करण्याआधी पुन्हा काही दिवस घरी आले .

       वसंत फार आनंदी होता . स्वतःच्या पायावर उभं झाल्याचे समाधान त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते . सुहितच्या बाबांनी आजवर त्याचा खर्च उचलला

होता . त्याला ते बरे वाटत नव्हते .

   स्वरानी सुहित व वसंतला लठ्ठ पगाराची नोकरी
मिळाल्याची बातमी वैखरी घरी येताच दिली .

"तुझ्या बाबांचीच मोठी कंपनी असतांना तुझा भाऊ बाहेर नोकरी का करतो ? ", असा वैखरीने स्वराला प्रश्न केला .

अगं, बाबा म्हणतात, "अनुभव गरजेचा आहे. म्हणून एक - दोन वर्ष करायची नोकरी ."

"हो गं ,काकांचं म्हणणं बरोबरच आहे ", वैखरी म्हणाली .

    सुहित व वसंतला छान नोकरी मिळाल्या निमित्त घरच्या घरी छोटीशी सरप्राईज पार्टी करायचा प्लॅन स्वरा व आईबाबांनी केला .

छान पार्टीची तयारी केली . वसंत व सुहितच्या काही मित्रांना बोलवलं . स्वराची जीवलग सखी वैखरी पार्टीला होतीच .
सरप्राईज पार्टी सुहित व वसंतला सुखद धक्का देवून गेली .
त्याहीपेक्षा सरप्राईज म्हणजे वैखरीने गिटारवर….

कुछ इस तरह तेरी पलके,
मेरी पलको से मिला दे
आँसू तेरे सारे मेरी
पलको पे सजा दे….

गोड आवाजात हिंदी फिल्मी गीत गायले .
वसंतसाठी ही एक अविस्मरणिय आठवण नसून जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू
होता . हदयाच्या साठवणीत साठवण्यासाठी
त्याला आणखी वैखरीच्या उपस्थितील सुंदर क्षण मिळाले . वसंत क्षणक्षण मोत्यासारखा वेचून हदयाच्या कोंदणात जपून ठेवत होता. हे क्षणच त्याच्या जगण्याचा आधार होते हे त्याला ठाऊक

होते ….


क्रमशः

वैखरीच्या डोक्यात गर्दी करणारे प्रश्न कोणते ? वसंत व वैखरीच्या प्रेम .कहाणीत पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी वाचायला विसरू नका….

वैखरी एक प्रेमकथा- भाग-७

कथा कशी वाटली कमेन्ट करून नक्की
कळवा .

धन्यवाद !

©® अॅड .नीता प्रफुल्ल कचवे .
टीम- अमरावती .

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Adv Nita Kachave

Advocate

सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून एकविस वर्षे नोकरी करून स्वेच्छा सेवानिवृत्तीनंतर वकिली व्यवसाय करते . मी लेखीका नाही परंतु शालेय जीवनापासून भावलेलं, रुजलेलं, अनुभवलेलं शब्दांत उतरवायचा एक छंद . वाचनाचा व्यासंग . शब्दांच्या दुनियेत रमायला आवडणारी मी एक शब्दवेडी .

//