वैखरी एक प्रेमकथा भाग -२९ ( अंतिम)

A Lovestory Of A Girl

वैखरी एक प्रेमकथा भाग-२९( अंतिम भाग)
विषय- प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .


प्रेमपवार, राज देशमुख, वसंत, सुहित आणि पवार काकू अमेरिकेहून मुंबईसाठी निघतात.
अख्ख्या प्रवासात वसंत त्याच्या आईला आठवत असतो . तिला भेटल्यावर तिला मी हे सांगेल ते सांगेल असे विचार करत असतो . प्रेम पवार तर प्रतिक्षाला भेटायला आतूर झालेले असतात . मुंबई येईपर्यंत प्रतिक्षा सोबत घालवलेला क्षण क्षण त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो . बालपणीचे प्रेम, जीवनातील पहिलं प्रेम प्रतिक्षा चोवीस वर्षाच्या प्रतिक्षेनंतर भेटणार यावर ह्या कल्पनेनी ते आनंदी असतात. सतत देवाचे मनात आभार मानतात की , त्यांचं प्रेम त्यांना दोन तपानंतर का होईना मिळणार आहे. त्यांचा मुलगा वसंत त्यांना भेटला . देवाचे किती आभार मानू असं त्यांना झालं होतं . मुंबई येईपर्यंत वसंत त्याच्या बाबांच्या खांदयावर डोकं टेकवून

असतो . त्याचे बाबा मधून मधून त्याच्या डोक्यावरून हात फिरत असतात .


अमेरिकेहून मुंबईत पोहचल्यावर थेट सर्वजण राज देशमुखांच्या घरी जातात . राज देशमुख डोअर बेल वाजवतात . प्रेम व वसंत दोघांच्याही हदययाचे ठोके वाढलेले असतात ते दोघेही आज त्यांच्या प्रिय व्यक्तीस भेटणार असतात.वसंतसाठी तर आणखी एक सरप्राईज असतं . त्याची वैखरीशी भेट होणार आहे याची कल्पना वसंतला नसते … राज देशमुखांनी फोन करून इव्हेंट मॅनेजरला वसंतच्या स्वागताची खास तयारी करायला सांगीतली होती… बाहेरच्या गेटपासून विविध रंगबिरंगी फुलांनी सजावट करण्यात आली होती . जणू वसंत ऋतूचे आगमन होते त्यावेळी सृष्टी नटलेली असते तसं काहीसं आनंदी, प्रफुल्लीत वातावरण वाटावं तशी सजावट केली होती . स्वराकडून घेवून वसंतचे फोटोज लावून वेलकम चे विविध प्रकारचे फ्लेक्स लावण्यात आले होते…
वसंतनी घरात प्रवेश करताच विविध सुगंधी फुलांचा वर्षाव करण्यात आला…. पंचारतीने वसंतचे औक्षण करण्यात आले . वसंतची आई वसंतला बघत होती… डोळ्यात आनंदाश्रू सजले होते . वसंतनी आईला पाहताच ओळखले . त्यानी रेखाटलेल्या चित्राशी मिळता जुळता चेहरा त्याची नजर शोधत होती . तो चेहरा दिसताच त्याच्या डोळ्याला धारा लागल्या . माय लेकांना शब्दाची गरज नव्हती दोघेही केवळ एकमेकांना बघत होते आसवं आज शब्द झाले होते… माय लेकांच्या भेटीचा सोहळा पाहून घरातील सर्व सदस्स्यांचे डोळे पाणावले होते .पाठोपाठ प्रेम पवार आत आले… त्यांचही स्वागत पंचारतीने करण्यात आले . प्रतिक्षाची प्रेमकडे नजर जाताच तिला कळेना हे खरंच प्रत्यक्ष घडतय की आपल्या मनाचा भ्रम आहे… एकदा मुलाला व एकदा प्रेमला प्रतिक्षा बघत होती . आसवं सोबतीला होतीच…
आगत स्वागता नंतर सर्वजण हॉलमध्ये बसले… वातावरणात कमालिची शांतता होती… कुणाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हता… वैखरी एका कोपर्यात उभी होती… तेवढ्यात वसंतची नजर वैखरीवर गेली… तो अस्वस्थ झाला… वैखरीला पाहून त्याला कळेना नेमकं आपल्यासोबत काय घडतय . देवानी एका क्षणाला अशी सर्वांची भेट घडवून आणली . तो देवाचे मनोमन आभार मानत होता… तेवढ्यात राज देशमुख सर्वांना फ्रेश होऊन घ्या सांगतात व आशाकाकूला पाहुण्यांना रुममध्ये घेवून जायला सांगतात ….
आतू एका ठिकाणी स्तब्ध बसून असते . वैखरी आतूजवळ जाते…
वैखरी : "आतू , काही बोलशील की नाही . वसंत आल्यापासनं एक शब्दही बोलली नाहीस . छान गप्पा कर वसंतसोबत इतक्या वर्षांनी तुझा लेक तुला

भेटला . प्रेमानी घास भरव त्याला . इतक्या वर्षाचं प्रेम ओवाळून टाक त्याच्यावर . ये आतू मी काय म्हणतेय ऐकतेस ना ?"
आतू( प्रतिक्षा) : हं… हो .. हो ऐकतेय . वैखरी खरंच आलय का गं माझं बाळ . तू बघितलंस ना त्याला . त्याच्या बाबांनाही सोबत घेवून आलं गं माझं लेकरू . गुणाचं माझं बाळ . प्रेमला बघीतलंस तू . वसंतचे

बाबा . इतक्या वर्षानी आलेत… खरंच ना गं . हे स्वप्न नाही ना गं वैखरी ?"
वैखरी : "आतू , हो खरंच आलाय तुझा मुलगा वसंत . त्याचे बाबा प्रेममामा पण आलेत असं काय बावरल्यासारखं करतेस . हे स्वप्न नाही सत्य आहे. देवानी खूप परीक्षा घेतली तुझी . खूप यातना सहन केल्यास तू… देव हारला तू जिंकलिस आतू… देवानी तुझ्या त्यागाचे फळ तुला दिले . तुझ्या मुलाच्या वाटेत इतके वर्ष डोळे लावून होतीस तू… प्रेममामावर जीवापाड प्रेम केले…. तुझी परीक्षा संपली गं आतू देवानी मुलासोबत तुझं प्रेमही तुला दिलं ."
आतू : " हो खरं गं . चोवीस वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आज मला माझे प्रेमही मिळाले . वैखरी हे केवळ

तुझ्यामुळे . तुझ्या वैखरीमुळे . तूझ्या वाणीतून तू तुझ्या मनातलं सांगीतलं नसतं तर घरात वसंतची गोष्टच निघाली नसती . तुझ्या वैखरीची जादू गं सारी. 

आशाकाकू : वैखरीताई, प्रतिक्षाताई चला जेवायला पाहुण्यासनी पण आवाज देतो म्या . तोवर तुमी चला… गोष्टीमष्टी जेवल्यावर करा…


वैखरी व आतू डायनिंगहॉलमध्ये जातात . आतू वहिनीच्या गळ्यात पडून आनंदाश्रू गाळते . वहिनीही ननंदेसाठी आज खूप खूश असते..
तेवढ्यात प्रेम, वसंत, सुहित व पवार काकू फ्रेश होवून डायनिंग हॉलमध्ये वैखरीच्या बाबांसोबत येतात… राज वसंतला त्याच्या आईच्या बाजूनी जेवायला बसवतो… आशाकाकू ताटं वाढतात… आतू वसंतला आपल्या लेकाला लाडानी घास भरवते.. वसंत सुद्धा त्याच्या हातानी आईला घास भरवतो… सगळीकडे आनंदाचा दरवळ असतो… जेवण झाल्यानंतर सर्वजण ड्रॉईंग रुममध्ये येवून बसतात ….
प्रेमला प्रतिक्षासोबत खूप बोलायचं असतं पण शब्द सुचत नाहीत दोघंही नजरेनी एकमेकांशी बोलतात …
तेवढ्यात राज देशमुख म्हणजे वैखरीचे बाबा

म्हणतात ," वसंत तुझ्यामुळे आज
आमच्या जीवनात आनंद आला. प्रेम व प्रतिक्षाचीही भेट झाली…. आणि हो प्रेमदादा आणखी एक गोष्ट वसंतला भेटायच्या आनंदात मी तुला सांगायला विसरूनच गेलो.. की मी माझ्या भाच्याला व जावयाला घ्यायला आलो होतो अमेरिकेला ."
प्रेम : "म्हणजे तुला माझा पत्ता माहित होता ?"
राज : " अरे नाही, मी माझ्या लेकजावायाला घ्यायला आलो होतो . तू तिथे सौभाग्यानी भेटलास . लेकजावाई व बहीणजावई दोघांनाही सोबत घेवून आलो यापेक्षा आनंद काय ? विधात्याचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत ."
प्रेम : म्हणजे ? वसंत…?
प्रतिक्षा : "मी सांगते नेमकं काय हकिकत आहे ते… प्रतिक्षा प्रेमला वसंत व वैखरी बाबतची सर्व हकीकत सांगते…
राज : " हो , ही वैखरी माझी मुलगी . हिच्यासाठी वसंत पसंद आहे आम्हाला . तुम्ही सांगा तुम्हाला सुनबाई पसंद आहेत का ?
विभा देशमूख : " पवार काकूंना विचारा त्यांना नातसून पसंत आहे की नाही ?"
पवार काकू : " का पसंद नसणार नक्षत्रा सारखी आहे हो आमची नातसून ".
वैखरी लाजते… वसंत व वैखरीचे नजरेचे संवाद सुरुच असतात . नजरेनीच त्यांच्या नात्याची सुरुवात झालेली असते एकमेकांच्या नजरेची भाषा ते जाणत

असतात . जणू वैखरी नजेतून वसंतला सांगत असते….


           "वसंत मनी फुलला
         जीवनी चैतन्याचा गारवा
          सांगू कसं कुणा सजना
            तूच माझा ऋतू बरवा…"

तेवढ्यात आतू सर्वांना सांगते ," आज आपल्या जीवनात हा आनंद आलाय त्याचं खरं श्रेय वैखरीला जाते… आज वैखरीनी तिच्या नावाचं सार्थक केलं …. नावाप्रमाणे काम केलं ."
प्रेम : " ते कसं ?"
आतू ( प्रतिक्षा ) : " आपण दोघांनी आपल्या मनातलं नं घाबरता घरच्यांना किंवा आपल्या जवळच्या एखादया व्यक्तीजवळ सांगीतलं असतं तर काहीतरी मार्ग निघाला असता . आपल्या वडिलांमध्ये असलेल्या शत्रृत्वामुळे कोणताच मार्ग निघणार नाही असं समजून आपण आपली गोष्ट दोघांमध्येच ठेवली .
वाणीरूपी भाषेचा चौथा टप्पा म्हणजे " वैखरी "
ज्याद्वारे आपण आपल्या मनातलं वाणीद्वारे किंवा लिखित स्वरुपात सांगू शकतो . आपण दोघांनी तसं नं करता मनातचं ठेवलं . वैखरीनी तिच्या नावाप्रमाणे तिच्या मनातलं घरच्यांना योग्य शब्दांत वैखरीद्वारे सांगीतलं . तिला यात वसंतची साथही नव्हती . तिला वसंतच्या मनातलं माहित नव्हतं तरीही तिनी ठामपणे तिचा निर्णय सांगीतला ती व्यक्त झाली . त्यामुळे योग्य मार्ग निघून आज हा सोनियाचा दिन उगवला . वैखरी कडून एक जरूर शिकण्यासारखं आहे की व्यक्त होणं गरजेचं . योग्य वेळ काळ पाहून व्यक्त झालं तर बऱ्याच समस्या सुटतात . भावनांचा गुंता सुटून नात्यांचा गुंता सुटतो व जीवनात सदा वसंत फुललेला राहतो .

प्रेम पवार : " अगदी बरोबर . व्यक्त होणं . मन रितं करणं मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही आवश्यक असतं प्रतिक्षा . वैखरीनी तुला पुन्हा जगायला शिकवलं . योग्य शब्दांत तुला समुपदेशन केलं . वैखरीचे मीसुद्धा मनापासून आभार मानतो . वैखरी बाळा, तुझे कौतुक करावे तेवढे कमीच . कुठलाही भावनिक गुंता कसा सोडवायचा हे तुझ्याकडून शिकावं .. प्रतिक्षा आपलं सर्वात महत्वाचं काम राहिलं ते म्हणजे सुहितच्या आईवडिलांचे आभार मानने . त्यांना प्रत्यक्ष भेटून मला त्यांचे आभार मानायचे आहेत. 

राज देशमूख : पवार आणि देशमुख दोन्ही कुटुंबानी मिळून जाधव कुटुंबियांचे आभार मानायला हवेत . मी लावतो जाधव साहेबांना फोन ते केव्हा फ्री आहेत विचारतो .सर्वजण जावूया जाधव साहेबांकडे . 

राज देशमूख जाधव साहेबांना फोन करुन आपणास भेटायला यायचे आहे. सायंकाळी आपणास वेळ आहे का ? विचारतात . जाधव साहेबही खूश होवून म्हणतात ," या आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आताच सुहित घरी पोहचला . तुमच्याकडे घडलेले आनंदी प्रसंगाबाबत सांगत होता . वसंतला त्याचे आई - बाबा तसेच सर्व नातेवाईक मिळाले आम्हालाही फार आनंद झाला . सुहितकडून सर्व हकिकत कळाली . स्वरा व सुहितच्या आईला वसंतच्या आईबाबांना भेटायची घाई झाली आहे. या सायंकाळी वाट बघतो ."

सायंकाळी पवार व देशमुख कुटुंबिय सुहितकडे जातात . प्रतिक्षा व प्रेम मार्केटला जावून परस्पर जाधव कुटुंबीयांसाठी भेटवस्तू घेवून सुहीतकडे पोहचतात .

जाधव कुटुंबीय पवार व देशमुख कुटुबियाचं मनापासून स्नेहपूर्ण स्वागत करतात . वसंत पोहचताच जाधव काका काकूंना नमस्कार करतो पाठोपाठ वैखरीही नमस्कार करते . वसंत आईबाबांना त्याच्या बहिणीची म्हणजेच स्वराची ओळख करून देतो .

प्रतिक्षा व प्रेम आणलेल्या भेटवस्तू देतांना जाधव कुटुंबियांना प्रेम पवार म्हणतात, खरं तर आम्ही तुमच्या ऋणातच राहू इच्छीतो . आभार मानून आम्ही आपल्याला परकं करू इच्छीत नाही . आपण जे वसंत साठी केलं ते उपकार फिटण्यासारखे नाहीत . ऋणी आहोत आम्ही आपले . 

जाधव साहेब प्रेम साहेबांना आलिंगन देवून भेटवस्तूंचा स्विकार करतात . 

प्रतिक्षा स्वराला भेटवस्तू देवून म्हणते, स्वराबाळ तू वसंतची बहीण म्हणजे माझी मुलगी . स्वरा प्रतिक्षाला नमस्कार करून भेटवस्तूचा स्विकार करते .

जाधव साहेब  : " अहो राज साहेबांचं फार लक्ष होतं वसंतकडे . त्याचं करिअर सेट होईपर्यंत ते माझ्या संपर्कात होते . वसंतला सर्वप्रकारची पुस्तकं आणून देणं . शिक्षणाला लागणारा खर्च सर्व दयायचे . मला सांगायचं की मला हा मुलगा चुनचूणित वाटतो याच्या करिअरची जबाबदारी घ्यायची इच्छा आहे माझी पण कुठे वाच्यता करू नका . त्यामुळे मी कधी बोललो नाही . आज कळालं की, हे भाच्यासाठी मामाचं प्रेम होतं. तसा वसंत माझा आवडताच होता . शांत, सुस्वभावी, बुध्दीवान वसंत तेवढाच मेहनती व जिद्दी आहे अगदी लहानपणापासूनच . त्याच्या वागण्यानी व गुणांनी आमचं मन जिकलं आणि वसंत आमच्या कुटुंबाचा एक सदस्य झाला सुहितचा भाऊ, मित्र आणि मार्गदर्शक सुद्धा आहे वसंत . स्वराचा लाडका भाऊ आहे वसंत . 

जाधव काकू :  हो खरंच आम्हाला एक नाही तर दोन मुलगे आहेत वसंत आणि सुहित .छान वाटतय आज . खरचं मनामनात आनंद असणारा दिवस . वसंत किती आनंदी दिसतोय . नाहीतर कुठतरी एक खिन्नतेची लकेर त्याच्या चेहर्‍यावर जाणावायची . ती आज नाही याचा खूप आनंद आहे. खरंच हा दिवस खऱ्या अर्थाने वैखरीमुळे उजाडला . फार गुणी आणि समजदार आहे हो वैखरी पवारताई . छान संयमी आणि विचारी नातसून मिळाली तुम्हाला .

सर्वजण जाधव काकूंच्या विचारांना दुजोरा देतात . वैखरीची पाठ थोपटतात . तेथून काही दिवसांनी वैखरीचं व वसंतचं थाटात लग्न होते . वैखरी आतूची सून बनून अमेरिकेला जाते. एका वर्षानी पवार कुटुंब मुंबईत पुन्हा कायमचं राहायाला येते .


प्रिय वाचक स्नेहींनो,
कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा . आवडली तर लाईक व शेअर करायला विसरू नका . न आवडल्यास माफ करा .


धन्यवाद !
©® ऍड. नीता प्रफुल्ल कचवे .
टीम - अमरावती .




🎭 Series Post

View all