वैखरी एक प्रेमकथा भाग -२८

A Lovestory Of A Girl
वैखरी एक प्रेमकथा भाग -२८
विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .


प्रेम पवार : " ये बस वसंत ."
वसंत : "एस सर . आपण बसा सर. देशमूख काका बसा ना ."
राज देशमुख : "वसंत बाळा काका नाही मामा म्हण ."
वसंत : " काय ? मामा ? पण काका मी तुम्हाला लहानपणापासून काकाचं म्हणत आलोय असं अचानक मामा.. ? "
प्रेम पवार :" हो बेटा राज तुझा मामा आहे . सख्खा मामा ."
वसंत : " म्हणजे ? मी समजलो नाही सर".
प्रेम पवार : " हो राजची बहिण तुझी जन्मदाती आई आहे . प्रतिक्षा नाव तुझ्या आईचे . हुबेहुब प्रतिक्षा सारखा दिसतोस तू . बघायचीय तुला तुझी आई ?"
वसंत : " प्रतिक्षा ! नाव आहे माझ्या आईचे ."

आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी वसंत आईचा फोटो बघतो . प्रेम पवार त्यांच्या मोबाईलमध्ये प्रतिक्षाचे असलेले आणखी फोटोज वसंतला दाखवतात . वसंतच्या डोळ्यातील आसवं थांबायचं नाव घेत नाहीत … . वसंत खूप भावूक होवून आ...ss.. ई म्हणून प्रतिक्षाच्या फोटोला हाक मारतो . त्याची . ती आर्त हाक प्रतिक्षाच्या हदयापर्यंत पोहचते . मुंबईत ती झोपेतून वसंत…sss म्हणत अचानक उठते .
वैखरी आतूची मानसिक स्थिती पाहून तिच्या रुममध्ये झोपायला आलेली असते . आतूची अवस्था तिच्याकडून बघवत नाही . आतू सारखी
वैखरीला सांगत असते… वैखरी मला वसंत हाक मारतोय… आताच तो आई म्हणाला..
ऐकलसं का तू ? आई… ss.. वैखरी आतूला समजावते आतू बाबा घेवून येणार आहेत वसंतला . तू शांत झोप . तुला भास होतात
आहे . प्रतिक्षा मात्र कमालिची अस्वस्थ असते…
तिला तिच्या मुलानी दिलेली हाक ऐकायला येते…

वसंत : " माझे वडिल ते कुठे आहेत देशमूख
काका सॉरी मामा ."
राज : " प्रेम पवार तुझ्या बाजूलाच बसलेत तुझे बाबा ."

आसवांनी डबलेल्या डोळ्यांनी दोघंही बापलेकं एकमेकांकडे बघतात . प्रेम पवार वसंतच्या गळ्यात पडून खूप रडतात आणि वारंवार वसंतची माफी मागतात . वसंत मला माफ कर बेटा म्हणत त्याच्यापुढे हात जोडतात . वसंतच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नाही . तो निःशब्द होतो . त्याच्या डोळ्यातील आसवं सारं काही बोलत असतात . पवार काकू… राज देशमूख सर्वाचे डोळ आसवांनी तुंबलेले असतात… तेवढ्यात प्रेमपवार वसंतला इशार्‍यानी त्याची आजी दाखवतो . वसंत आजीच्या गळ्यात पडतो . खूप रडतो त्याच्या डोळ्यात आनंदाश्रृ
वाहायला लागतात.
वसंतच्या डोक्यावरून हात फिरत राज देशमुख म्हणतात, "बाळा वसंत मीही तुझा गुन्हेगार आहे. मला माहित असूनही मी तुला तुझ्या आईपासून दूर ठेवलं . माफ करं बेटा . समाजाची रीतंच तशी . नाईलाज होतो कधीकधी माणसाचा ."
वसंत : " ही कसली समाजरित मामा ? मुलाला आईपासून लांब ठेवावं लागलं . किती वाटायचं मला .माझी आई कुठे असेल ? कशी असेल ? तिनी मला का सोडले असेल ? बालपण ते तारुण्य केवळ प्रश्नांचा भडीमार . प्रश्नांच्या गर्तेत अडकलेला होतो मी .खूप त्रास व्हायचा . आईचे चित्र काढायचो मी.. ते चित्र कुशीत घेवून झोपायचो . खूप वाटतं आता धावत जावं आणि आईच्या कुशीत दडावं… कुठे आहे माझी
आई मामा? मला भेटायचंय तिला . मला घेवून चला नं प्लीज मामा ."
राज : " वसंत शांत हो बेटा . मी तुला घ्यायलाच आलोय . "
प्रेम पवार : " वसंत आपण सोबत सर्वजण प्रतिक्षाला भेटायला जावू लवकरच . मी तिकीटं बूक करायला सांगतो तू सावर स्वतःला ."
वसंत :" बाबा मला आईबाबा असतांना अनाथालयात का ठेवण्यात आलं ? तुम्ही कधीच कसे मला भेटायला नाही आलात ?"
प्रेम पवार : " सांगतो बाळा, ऐक….

प्रेमपवार संपूर्ण कहाणी वसंतला सांगतात …
वसंतला फार दुःख होतं .त्याची आई त्याच्या शिवाय जीवंत असूनही जगली नाही .आईनी सहन केलेल्या यातना वसंतला जाणवतात त्याला आईचा भूतकाळ एकूण खूप यातना होतात . वसंत ढसाढसा रडतो …
त्यावर राज देशमुख म्हणतात , "वसंत बेटा तुझे बाबासुद्धा सुखात नव्हते . त्यांना तुझ्या जन्माबाबत माहित नव्हते … त्यांनीही आजवरचं आयुष्य एकाकी काढलं…. ".
पवार काकू : " वसंत , तुला तुझ्या बाबांनी बघीतलं त्यादिवसापासनं खूप अस्वस्थ आहेत रे तुझे बाबा . त्याच्या डोळ्याला झोप नाही . तू दिसलास की त्याला वाटायचं आपलं कुणीतरी आहे . जावं गळ्यात पडावं असं व्हायचं . मलाही तसंच झालं रे बाळा तुला भेटण्यासाठीच त्यादिवशी मी ऑफीसला आले होते . प्रतिक्षाच्या आणि तुझ्या चेहर्‍यातील साम्य पाहून तुझ्या बाबांना वाटलं तू प्रतिक्षाचा मुलगा आहे पण काही पुरावा नव्हता कसं विचारणार तुला . तुझी माहिती काढली तर तू अनाथ असल्याचं कळलं .
तुझा मामा आला म्हणून आज हे कोडं सुटलं . खूप आनंदाचा दिवस आहे आज डोळे पुसा आणि चला जेवायला . लवकरच आपण प्रतिक्षाला भेटायला जावू तिसुध्दा तुझ्यावाटेकडे डोळे लावून बसली असेल ."
राज : " हो काकू . ताईच्या डोळयाला डोळा लागणार नाही वसंत जाईपर्यंत . ताईला
माहितच नाही की मी तिच्या मुलालाच नव्हे तर प्रेमदादालाही सोबत घेवून येणार आहे. तिला तर सुखद धक्काच बसेल तुम्हा दोघांना पाहून.. खूप
दुःख सहन केले ताईने … आता तिचे सुखाचे दिवस आलेत ."
प्रेम पवार :" हो , खूप यातना सहन केल्यात
प्रतिक्षानी . आता तिला त्यापेक्षा कितीतरी पट सुख दयायचे आहे. तिचा एकही क्षण दुःखात जाणार नाही याची काळजी वसंत आणि मी घेणार आहे . हो की नाही रे वसंत ?"
वसंत : " हो बाबा, आईला खूप सुखात ठेवू आपण . बाबा मी सुहितला बोलवू का त्यालाही हे सर्व माहित असावं . खूप जीवलग मित्र आहे माझा तो . त्याच्या आईबाबांनी मला अगदीच सुहित सारखं वागवलं . त्याच्या आईनी मला आईचं प्रेम दिलं . स्वरा सुहितची बहीण तिनी मला बहीणीचं प्रेम दिलं माझी आजवरची फॅमिली आहे जाधव कुटुंब ."
प्रेम पवार : " कर नं फोन सुहितला . थांबू आपण थोडं . सुहित आल्यावर जेवण करुया ."
वसंत : " थॅक्यू बाबा ."
प्रेम पवार : " आभार तर जाधव कुटुंबीयांचे मानावे तेवढे कमी आहेत . मुंबईला गेल्यावर भेटेल मी त्यांना ."

क्रमशः
आई लेकराची भेट पुढील भागात होणार की नाही हे जाणून घ्यायला नक्की वाचा .
वैखरी एक प्रेमकथा भाग-२९
धन्यवाद !
©® ऍड .नीता प्रफुल्ल कचवे .
टीम - अमरावती ...


🎭 Series Post

View all