वैखरी एक प्रेमकथा भाग -२४

A Lovestory Of A Girl


वैखरी एक प्रेमकथा भाग-२४
विषय - प्रेमकथा
उपविषय-राज्यस्तरीय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .

स्वरा : " का नाही ? " तेरे लिए तो जान भी हाजीर है मेरी जान " मी काय करू शकते
सांग ? आणि हो . ये नैना चार कब ? कहा ? और कैसे हुए ?"
वैखरी : आठवते का तुला . वसंत आणि सुहित सुट्यांमध्ये घरी आले होते . तुम्ही सर्वजणगप्पात रंगले होतात . मी डोअर बेल वाजवली …..
वसंतनी दार उघडले…… तो माझ्या आतू सारखा दिसला म्हणून मी त्याला एकटक बघितले… त्यानीही माझ्या डोळ्यांत क्षणभर पापणी न लवता बघीतले . त्याची नजरेचा तो बाण आरपार खोलवर मनाला लागला त्या दिवसापासनं केवळ वसंतचे विचार… त्याचेच स्वप्न .एकही क्षण नाही जो मी वसंतच्या आठवणी शिवाय घालवला असेल . त्याला एक नजर पाहण्यासाठी मी आतुरलेली असते… हे सर्वकाही नकळत घडले .मी त्याच्यात गुंतत
गेले . . . वसंतपासून व जगापासून लपवत
गेले . गुंतायचे नव्हते यात मला . पण माझ्या हातात काहीच नाही माझे मन माझे उरले नाही . मला वसंतशिवाय दुसऱ्या मुलाशी लग्न करण्याची कल्पनाही सहन होत नाही . तू सुहितला फोन करून वसंतच्या मनाचा अंदाज
घे स्वरा तू."
स्वरा : "चल आताच लावते सुहित दादाला
फोन ."
स्वरा सुहितला फोन लावते….
स्वरा :" हॅलो दादा . कसे आहात तुम्ही दोघं ".
सुहित : "मस्त गं पण तुम्हा सगळ्यांची आठवण येते ."
स्वरा : "दादा वसंतदादा बद्दल थोडं विचारायचं होतं ."
सुहित : "त्याला देवू का फोन ?
स्वरा : " नको, तुला कसे विचारू मला कळत नाही आहे . अॅक्च्युली मला थोडा डाऊट आला की, वसंत दादाला वैखरी आवडते . माझी शंका चुकीचीही असू शकते . कदाचित वैखरीला पण वसंतदादा आवडतो बट आय अॅम नॉट श्युअर ..म्हणून तुला विचारतेय ."
सुहित : " अगं पण तुझ्या डोक्यात असं का आलं अचानक . परीक्षा झाली तर रिकाम्या डोक्यात जास्तीचे विचार येतात आहेत का स्वरा ?"
स्वरा : "दादा सांग न . या दोघांत काही आहे का? वैखरी सारखी वसंत दादाबद्दल माहिती घेत असते आवडीने ."
सुहित : "रिअली . ही तर मस्त बातमी दिलीस तू . पण वैखरीला विचार नं तिला वसंत आवडतो का?
स्वरा : " बहुतेक आवडतो ".
सुहित : " स्वरा दोन मिनीट होल्ड कर . "

वसंत यारा गुड न्यूज आहे . सुहित जागेवरच नाचत वसंतला सांगतो की, वैखरी तुझ्या प्रेमात आहे.
वसंत : " काय ? कोण बोललं ."
सुहित : "असा वैखरीच्या वागण्यावरून तिला डाऊट आला . ये मी स्वराला सांगू का तुला पण वैखरी आवडते म्हणून ."
वसंत : "आर यू मॅड ? ये नको काहीपण . माझं प्रेम माझ्यापुरतं सिमित बरं आहे."
सुहित : " ये ती आपली बहीण ना ? तिला सांगायला काय हरकत आहे . ये देना परवाणगी स्वराला सांगायची ."
वसंत : "सांग पण घरी सांगू नको म्हणावं ."
सुहित : "स्वरा, वसंत loves वैखरी . पण त्याला त्याच्या मनातलं वैखरीला सांगायचं नाही आहे……"
स्वरा : ok ok bye..
सुहित : "अजब आहे ही स्वरा पूर्ण गोष्ट न ऐकता फोन कट केेेेलाय…."

वैखरी वसंतला पण तू आवडतेस . तुझ्या नजरेतील बाणांनी त्याच्या मनाला पण छेदले .
पहिली नजर का प्यार… अच्छी लव्ह स्टोरी है ।

वैखरी स्थिर बसली .तिला जे ऐकायचे होते . ते कळाले . तिला विश्वासच बसत नव्हता की
वसंतचं पण तिच्यावर प्रेम आहे. दोघंही त्या नजरानजरचे शिकार झाले पण दोघांनीही ते कधी दिसू दिलं नाही असा मनात ती विचार करत होती . वसंत पण माझ्याच सारखा . कधिही जाणवलं नाही त्याच्या मनात काय आहे ?
वैखरी ये वैखरी स्वरानी वैखरीला हलवत आवाज दिले पण वैखरी विचारात होती . तिला सुखद धक्का बसला होता . ति बेभान झाली होती .
स्वरानी तिला भानावर आणले. त्यावेळी तिनी स्वराला मिठी मारून धन्यवाद दिले…
वैखरी : "स्वरा आपण उदया निवांत बोलू . मला पटकन घरी जावून ही आनंदाची बातमी आतूला सांगायची आहे ."
स्वराचा निरोप घेवून आनंदात वैखरी घरी जायला निघते….
******************************************
वैखरी घरी पोहचताच सरळ आतुच्या रुममध्ये जाते .
वैखरी : "आतू , कसे सांगू ?

आतू : " कसे सांगू म्हणजे काय ? तोंडानी
सांग . काय म्हणाली स्वरा विचारले का सुहितला"
वैखरी : "अगं आतू . वसंतला पण मी
आवडते ."
आतू : " काय ? काय सांगतेस ? देव पावला गं बाई . मी देवाला तीच प्रार्थना करत होती . माझं आयुष्य जसं एकाकी गेलं तसं वैखरीचं नको जायला तिला तिच्या आवडीचा जोडीदार मिळू दे . थांब जरा मी देवाजवळ दिवा लावून देवाचे आभार मानते ."
वैखरी : "आतू मी पण येते देवघरात .
देवाचे आशीर्वाद घेवून मी पण देवाला धन्यवाद देते ."
आतू व वैखरी दोघीही देवघरात जावून . देवासमोर दिवा लावतात व देवाचे आर्शीवाद घेवून देवाला धन्यवाद देतात. तेवढ्यात वैखरीची आई येते .
आई : "अगं बाई . ओतोभाच्या देवाजवळ काय मागणं मागत आहेत . सायंकाळ व्हायचीच आणि दिवा पण लागला आज देवघरात . काय विशेष ?"
आतू : " काही नाही हो वहिनी . वैखरीच्या लग्नाबाबत सर्व ठीक होवू दे असं म्हणत होते देवाला . तेवढयात वैखरी स्वराकडून आली मला शोधत देवघरात ."
वैखरी : " आतू थांब मला आईला सर्वकाही खरं, खरं सांगायचंय ."
आई : " खरं खरं ? म्हणजे प्रतिक्षाताई खोटं बोलल्यात की काय ?".
आतू : "नाही हो वहिनी तिला म्हणायचय मीच तिला देवाजवळ प्रार्थना करण्यासाठी घेवून आले".
आई : " तुम्हा आतोभाच्यांचं काही कळत नाही काय चाललय ते.. घडीचे काही म्हणता तर घडीत काही… काय लपवताय दोघीजणी माझ्यापासून ?"
असं म्हणून वैखरीची आई किचनकडे जाते…
वैखरी : " तू बाबांना सांगणार आहेसच ना वसंतबाबत ? मग आज आईला विश्वासात घेवून सांगायचं होतं मला वसंतबाबत सर्वकाही .
माझं वसंतशी लग्न होवो कींवा न होवो पण मी काही झालं तरी दुसऱ्या मुलाशी लग्न करणार नाही हे निश्चित . उगीच घरच्यांना संभ्रमात ठेवल्यापेक्षा सांगून टाकावं तसं आईला सांगीतलं असतं तिचही मत बाबांना सांगण्याआधी कळालं असतं . तू का ? गोष्ट मोडलीस आतू ?".
आतू : " विचार करून बोलू थोडं घाई नको असं मला वाटलं ."
वैखरी : "सत्य बोलायला विचार करण्याची काय गरज ? तसंही मी आईबाबांनी वसंतला नापसंती दर्शविली तर त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही ."
आतू : " म्हणजे ? तू दादा - वहीनी नाही म्हणाले तर वसंतशी लग्न करणार नाहीस ."
वैखरी : " हो नाही करणार लग्न वसंतशी . वसंत माझ्या जीवनात असलाच पाहीजे असे जरूरी नाही .तो माझ्या हदयात आहे. एवढे पुरे आहे .आनंदानी जगण्यासाठी ."

क्रमशः

वैखरी वसंत बाबत आईला सांगेल का? वैखरीची आई वसंतशी लग्न करायला होकार देईल का? हे जाणून घेण्यासाठी . नक्की वाचा
वैखरी एक प्रेमकथा - भाग -२५

धन्यवाद !
©® ऍड. नीता प्रफुल्ल कचवे .
टीम - अमरावती .






🎭 Series Post

View all