Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

वैखरी एक प्रेमकथा भाग -१९

Read Later
वैखरी एक प्रेमकथा भाग -१९


वैखरी एक प्रेमकथा भाग-१९
विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .


आज वैखरीकडे पाटील कुटुंबीय येणार म्हणून धामधूम होती . वैखरीचे बाबा आज ऑफीसला न जाता पाटील कुटुंबीयांच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त होते …

विभा..sss.. वैखरीचे वडिल राज देशमूख तिच्या आईला आवाज देत किचनकडे येतात.

विभा वैखरीची आई आश्चर्याने बघून म्हणते , "अगं बाई स्वारी आज थेट स्वयंपाक घरात .
मला आवाज दयायचा होता ना .मी आले
असते ."

"का? आम्हाला किचनमध्ये यायला मनाई आहे का ?," राज देशमूख मस्करी करत बोलतात .

"तसं नाही हो . उगीच तुम्हाला त्रास म्हणून
म्हटलं ", वैखरीची आई राज देशमुखांना म्हणते .

"बरं आम्ही काय म्हणतो . पाटील साहेबांना ते पिठीचे देशी गायीच्या तुपातील लाडू फार आवडतात . बनवूर घ्याल का जरा?"

"का नाही ? तुम्ही फक्त आज्ञा करावी ."
श्री .देशमुखांचे आनंदी मुड बघून सौ . देशमूख मस्करी करतात .

श्री देशमूख :"आशाकाकू पाटवडी पण बनवालआज "आशाकाकू : "हो साहेब, मस्त महाराष्ट्रीयन मेनू बनवतेय . खूशच होतील बघा पाटील साहेब .

"मालकीणबाई साहेब आज वज्जरच खुशीत हायेत बघा ." आशाकाकू साहेब जाताच मालकीण बाईंना म्हणते .
सौ देशमुख ( आई) :हो गं आशाकाकू बघ . तुझ्याजवळून काही लपलेलं नाही . वैखरीचं लग्न डीग्री होताच एक छानसा निर्व्यसनी, दिसायला - वागायला चांगला तसेच घरणदाज घराण्यातला हुशार मुलगा पाहून करायचं ठरवलं होत त्यांनी . ठरवल्याप्रमाणे घडतयं त्यामुळे त्यांचा आनंद ओसंडून वाहतोय .
तेवढयात आतू येते व वहिणींना म्हणते, "अगं वहिनी जोडाघोडा वरतीच ठरतो . वैखरीच्या नशिबात लिहीला असेल त्या मुलाशी लग्न होईल वैखरीचं . दादा ठरवतील त्याच्याशी नाही ."
सौ देशमुख ( आई ) : "प्रतिक्षाताई असं नका हो बोलू . तुमच्या दादांच्या मनासारखं होवो असं म्हणा. जिभेवर सरस्वती वास करते हो
आपल्या . आशय अतिशय चांगला मुलगा
आहे .खूप सुखी राहिल वैखरी आशय सोबत"

आतू : " मी कुठे म्हटलं आशय चांगला मुलगा नाही. तिच्या नशिबात आशय लिहीला असेल तर आशयशीच लग्न होईल वैखरीचं . मी आपलं सहज सांगीतलं ."
आशाकाकू : " मालकीन, बाई ताईसायब का यी चूकीचं नायी बोलत . जोळा विधाताच
लावते ".
सौ .देशमूख : "बरं बघू वैखरीच्या नशिबात आशय आहे की नाही. पटापट हात चालवा . गोष्टीत एखादा मेनू राहून जाईल करायचा नाहीतर एखादा मेनू बिघडेल ."
आशाकाकू : "कायजी नका करू मालकीन बाई सयपाक जकासच बनन ."
आतू : बरं मी वैखरीला तयार करते .
सौ .देशमूख : "हो ताई . छान तयारी करून दया वैखरीची ."
आतू : वैखरी जोरात तयारी सुरु आहे पाटील कुटुंबीय येणार म्हणून . तू काय वाचत
बसलीस . अंग एखादं तासात येतीलच पाहुणे मंडळी .
वैखरी : "येवू देत . दहा मिनीटात मी साडी नेसून तयार होईल . एवढी काय तयारी करायची गं आतू ?"
आतू : "वहीणीचा हुकूम आहे. छान तयारी करून दया वैखरीची असा . थोडा अभ्यास बाजूला ठेव . तुझी तयारी करून देते मी छान ."
वैखरी : "बरं बाई . कोणती साडी नेसायची ?
बेबी पिंक की येलोईश ?"
आतू : "मला वाटते तू बेबी पिंक नेसावी तुझ्या स्कीनला मॅच होईल बघ ."
वैखरी : "बरं . दे पटकन साडी नेसून . तयार होवून अभ्यास करत बसते मी . पाहुणे कधिही येवोत . बाबांनी आवाज देताच जायला बरं होईल .नाहीतर बाबांचं मुडं पटकन बिघडतो ."
आतू वैखरीला तयार करते तेवढ्यात डोअर बेल वाजते… सखा काका दार उघडताच, साहेब पाउणे आले म्हणून सांगतात . लगेच श्री व सौ देशमूख दारात त्यांच्या स्वागताला जातात .
आदरपूर्वक, स्मित हास्यानी पाहुण्यांना घरात बोलवतात . पाहुणे येवून बसतात . त्यांना चहापाणी होतं . वैखरी अजून दिसली नाही म्हणून आशयची नजर भिरभिरत असते . वैखरी तिच्या बाबांसोबत आशयच्या ऑफीसमध्ये गेली त्यावेळीच त्याला खूप आवडली होती . जीवनभराचा जोडीदार म्हणून आज वैखरीकडे पाहण्याच्या काल्पनेनी तोही खूश होता . वैखरीचा विचारात आशय गुंतलेला असतांनाच . वैखरीचे बाबा आशाकाकूंना वैखरीला बोलवायला सांगतात .
वैखरी आतूसोबत हॉलमध्ये येते . वैखरीला बेबी पिंक साडीत पाहून आशयला प्रेमाची गुलाबी नशा चढते . त्याची नजर वैखरीवर खिळते .
वैखरी हॉलमध्ये येताच सर्वांच्या पाया पडते .
थोडावेळ पाटील व देशमुख कुटुंबियांमध्ये छान गप्पा रंगतात . आशयची आई वैखरीसोबत बोलता बोलता तिच्या आवडीनिवडी विचारते .

तेवढ्यात वैखरीचे बाबा ." वैखरीला सांगतात
की तू आशयला जेवणाची तयारी होईपर्यंत आपलं घर दाखवं . जेणेकरून दोघे एकमेकांशी मोकळं बोलू शकतील."

आशयला फार आनंद होतो पण तो चेहर्‍यावर दिसू देत नाही. .. प्रेमाच्या गुलाबी नशेतही आशयचे वागण्यां बोलण्यावर नियंत्रण होते .

वैखरी आशयला घर दाखवायला घेवून जाते . घराच्या अंगणात असलेली फुलांनी बहरलेली बाग दाखवत आशयसोबत तो बोलल तेवढं बोलते …
आशय : वैखरी तुम्हाला काय काय आवडतं ?
वैखरीच्या तोंडून \"वसंत \" निघतं . तिच्या मनामनात वसंत फुललेला असतो . विचारातही वसंतच असतो म्हणून नकळत \" वसंत \" असं निघतं
आशय आश्चर्याने , " काय ? वसंत ?"
लगेच आपली बाजू सावरत वैखरी म्हणते," हो
वसंत ऋतू फार आवडतो मला".
आशय : "वसंत ऋतू बद्दल बोलताय तुम्ही ?"
वैखरी : "हो वसंत ऋतू . वसंत किती प्रसन्न आणि प्रफुल्लित आहे ना ."
आशय : "वैखरी वसंताच्या आगमनाला वेळ आहे. फेब्रवारीच्या शेवटच्या आठवड्यात होतं त्याचं

आगमन ."

वैखरी : कधिही होवू देतं वसंतचं आगमन . पण मनी सदासर्वकाळ वसंत फुललेला असला की प्रत्येक ऋतू वसंता सारखा भासतो तोच गंधाळलेला फिल येतो . झाडाला नवपालवी घेवून येणारा "वसंत " , बोचऱ्या थंडीपासून सुटका करणारा " वसंत ", वसंतच्या स्वागतासाठी वसुंधराही विविध रंगाचे वस्त्र ल्याते . बागेतील रंगबिरंगी फुलांनी वसंताचे स्वागत केल्या जाते . आंबा, जांभूळ, आवळा, सत्री फळांनी
डवरतात . पशू, पक्षी, मानव प्राणी सर्वच वसंत येताच सुखावून जातात . कोकीळ मधूर स्वरात वसंतासाठी स्वागत गीत गातो . मोर नृत्य करतो झाडावेलीचे दुःखाचे रुक्ष दिवस संपून सुखाची पालवी लेवून सुख घेवून येणाऱ्या वसंतचे स्वागत करतात असा हा वसंत सर्वांना प्रेमात पाडतो मनामनात वसतो . मी ही त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली असते. खूप आवडतो मला \"वसंत\".
\"वसंत\" असं म्हणताच मनाचा पिसारा फुलतो . वारा सुगंधित होतो…."

आशय : "खरंच हो वसंत ऋतू असतोच तसा मोहक . अगदी तुमच्या सारखा मोहात
पाडणारा .
वैखरी : काय ?
आशय : हो ना . तुम्ही पण वसंतासारख्या प प्रफुल्लित, प्रसन्न आहात .वसंत ऋतूचे वर्णन तुमच्या तोंडून ऐकूण मी सुद्धा वसंत ऋतूच्या प्रेमात पडलोय . किती प्रेमानी नाव घेता तुम्ही ऋतूराज वसंतचे . तुमच्या तोडून \" वसंत\" अधिकच गोड वाटतं ."

तेवढ्यात आतू येते," वैखरी चला ताटं
वाढलीत ."
आशय व वैखरी जेवायला येतात. वैखरीच्या मनात \" वसंत \" अधिकच फुललेला असतो . वसंतच्या गोष्टी करून तिचं समाधानानं पोटं भरतं तिचं जेवणात लक्ष नसतं .

जेवणं आटपून सर्वजण हॉलमध्ये बसतात.
वैखरी खूपच गोड मुलगी आहे अशी आशयची आई वैखरीच्या आईजवळ बोलते . आम्हाला वैखरीसारखी सालस, सुसंस्कारी, प्रेमळ सूनबाई हवी . तुम्ही काय ते ठरवा .
त्यावर वैखरीची आई म्हणते , "आशय सारखा जावाई भेटायलाही भाग्य लागतं हो
पाटीलताई ."
वैखरीचे बाबा त्यावर बोलतात, "अगदी खरं बोललात तुम्ही . आशयसारखा जावाई भाग्यानी मिळतो . आशयला पसंत विचारायला हवी हे झालं आपलं पालकांचं बोलणं . चिरंजीव काय म्हणतात ."
आशय त्यावर उत्तरतो, "मी काय बोलणार आपण वडिधारी मंडळी म्हणाल तसं ."
आशयच्या बोलण्यावरून आशयला मुलगी पसंत असल्याचा दुजोरा दिल्याचे समजून .
दोन्ही कुटुंबिय वैखरीची परिक्षा झाल्यावर सांक्षगंधाची तारिख काढायचा निर्णय घेतात .
आतू व वैखरी एकमेकींकडे बघत असतात.
तेवढ्यात पाहुणे जायला निघतात. सर्वजण पाहुण्यांना गेटपर्यंत सोडवायला जातात .

क्रमशः

कथेत पुढे काय होणार जाणून घ्यायला नक्की वाचा .
वैखरी एक प्रेमकथा भाग-२०

धन्यवाद!
©® ऍड. नीता प्रफुल्ल कचवे .
टिम - अमरावती .
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Adv Nita Kachave

Advocate

सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून एकविस वर्षे नोकरी करून स्वेच्छा सेवानिवृत्तीनंतर वकिली व्यवसाय करते . मी लेखीका नाही परंतु शालेय जीवनापासून भावलेलं, रुजलेलं, अनुभवलेलं शब्दांत उतरवायचा एक छंद . वाचनाचा व्यासंग . शब्दांच्या दुनियेत रमायला आवडणारी मी एक शब्दवेडी .

//