Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

वैखरी एक प्रेमकथा भाग-१८

Read Later
वैखरी एक प्रेमकथा भाग-१८

वैखरीएक प्रेमकथा भाग -१८
विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

टीम - अमरावती .वैखरी : "का? देवाकडे काय मागीतले ते इतरांना सांगीतलं तर मिळत नाही का ?".
आतू : "तसंच समज . चल निघूया . नेमकी कशी साडी घ्यायची ठरवायला वेळ लागतोच . घरूनच उशीर झाला तर खूप उशीर होईल ."
वैखरी : कसली पसंती अन् कसलं काय ?
मला तर जराही इंन्टरेस्ट नाही त्या साडीत . फोन करून द्यायचा का बुटीक वालीला की तुझ्याच मनानी च्युस करं म्हणून ."
आतू : ये वेडाबाई ,जरा दमानी घे. दादा वहिनी म्हणतात तर आवडीने घे की सुंदर साडी .
असं समज की वसंतसाठी नेसायचीय तुला ती साडी".
वैखरी : " काही काय बोलतेस आतू ?
वसंतसाठी ? अगं आशय येतोय मला बघायला वसंत नाही . पाटील कुटुंबीय मला पसंत करणार नाहीत अशी जरा विचित्र कलर कॉम्बीनेशनची साडी पसंद करुया आपण ."
आतू : "अगं , पाटील कुटुंबीयांना ऑलरेडी तू पसंत आहेस सून म्हणून . ते केवळ फॉरमॅलिटी म्हणून येत आहेत. आशयलाच खूप आवडतेस तू . वहिनी सांगत होत्या . पाटील वहिनींनी सांगीतलं वहिनींना फोनवरती की, आमच्या मुलाची पसंत ती आमची पसंत ."
वैखरी : " हे आता सांगतेस तू ?"
आतू : " म्हटलं तुला सांगून कशाला टेन्शन दयावं उगीच ."
वैखरी : "आतू, टेन्शन नाही हे तर भलं मोठं संकट आहे . त्यात बाबांनाही तो आशय खूप आवडतो . अभ्यास राहिला बाजूला मध्येच हे आशयरूपी संकट आलं . काय अभ्यासात मन लागणार . सेमीस्टर होईपर्यंत थांबले असते बाबा तर चालले नसते का? ही लग्नाची गोष्ट सेमीस्टर झाल्यावर काढायची होती घरात . माझ्या अभ्यासात अडथळा नसता आला ना ."
आतू : " टेन्शन नको घेवूस . कसलाही ताण न घेता पाटील कुटुंबियांना भेट . सेमीस्टर झाल्यावर लग्नाची बोलणी होणार आहे . बराच वेळ आहे . तू सध्या तुझं लक्ष केवळ अभ्यासावर केंद्रित कर . \"हम अभी हारे नही, दुनिया अभी जीती नही हारने से पहिले हार माने क्यू ?\" चल
पसंत कर एक नाही दोन सुंदर साड्या ."

वैखरी : " म्हणजे ? काय म्हणायचय तुला आतू ?".
आतू : अगं वैखरी तुला पाटीलकुटुंबिय बघायला येणार म्हणजे झालं का तुझं लग्न आशयसोबत ? वरच्यावर विश्वास ठेव लग्नाच्या गाठी वरूनच बांधल्या जातात . तुझं लग्न कुणाशी होणार ? तुझा जोडीदार कोण ? याची उत्तर आधिच विधात्याच्या डायरीत नोंदवलेली आहेत . ती माणसांच्या इच्छेनुसार बदलणार आहेत का? उगीच फक्त बघायला येतात म्हणून ताण घेवून आपले नुकसान करायचे . ज्याअर्थी तुझ्या मनात तुझ्याही नकळत वसंतच्या प्रेमाचा बहर आलाय .न ठरवता तू त्याच्या प्रेमात पडलीस यातही विधात्याची मर्जी असेलच की . तुम्हा दोघांची त्यानी भेट घडवली म्हणजे तो बघेल ना पुढे काय करायचं . मी आहेच तुझ्या सोबतीला योग्य वेळ आली की मी दादांना समजावेल काळजी करू नकोस . छान सुंदर साड्या घे . पाटील कुटुंबीयांना आनंदानी
भेटशील . तुझा अभ्यास सुरु ठेव छान मार्क्सनी डीग्री पूर्ण कर .. तुझं लग्न तुझ्या मर्जीशिवाय होणार नाही याची शाश्वती देते मी तुला ."

" आतू !माझी छान छान आतू ! ". वैखरी आतूला मिठी मारते . सुंदर दोन साड्या बुटीक वालीला बनवायला सांगून ,आतू आणि वैखरी आनंदानी घरी येतात .

आई : "फारच खूश दिसतेय आतोभाचीची गाडी

आज . भरपूर शॉपींग केलेली दिसतेय . साडी कधी देणार म्हणाली तयार करून"


आतू : " उदया सकाळी दहा वाजेपर्यंत घरी पाठवेल ती साडी तयार करून पाठवेल .नाही हो वहिनी . शॉपींग वगैरे नाही केली . वैखरीसाठी दोन साड्या सिलेक्ट केल्या केवळ ."
आई : " करायची होती ना तुमच्यासाठी थोडी शॉपींग प्रतिक्षाताई क्रेडिड कार्ड तर आहेच ना तुमच्याकडे . किती दिवसानी मार्केटमध्ये गेल्या आणि दोन साड्या सिलेक्ट केल्यात ."
आतू : "वहिनी वैखरीच्या लग्नात करूया भरपूर शॉपींग ."
आई : " हो . वैखरीच्या लग्नात तर सर्वजण स्पेशल शॉपींग करतीलच . वैखरीच्या आतूची तर अति स्पेशल शॉपींग राहिल . काय गं वैखरी आवडल्यात ना मनापासून साड्या ."
वैखरी :" हो गं आई . खूप आवडल्यात ."

आई, वैखरी व आतू गप्पा करत असतात तेवढ्यात वैखरीचे बाबा येतात .

बाबा : "अरे वा! छान गप्पा रंगल्यात . घरात आनंदाचा दरवळ पाहून आमचही मन प्रसन्न झालं . आशयची फॅमिली येतेय म्हणून घरात एवढा आनंद वैखरीच्या लग्नाची तारिख ठरल्यावर तर घरात आनंदाचा पाऊसच पडेल ."
वैखरी :" काय हो बाबा, मी या घरातून जाणार याचा तुम्हा सर्वांना आनंद होणार तर ."
बाबा : "तसं नाही रे बाळा . आपल्या मुलीला एक चांगला जोडीदार व उत्तम कुटुंब मिळणार याचा आनंद होणार . तुझ्या जाण्यानी तर हे घर खाली खाली वाटेल . मुलगी सुखात तर आईवडिल सुखात असतात . जगाची रीतं म्हणून मुलीला दुसऱ्या घरी पाठवावं लागतं . मुलीला मिळणारं घरं चांगलं मिळालं की त्यापेक्षा मोठा दुसरा आनंद नसतो बेटा

आईवडिलांसाठी .
आई : "आपली वैखरी खूप भाग्यवान आहे. तिच्यासाती वर शोधावा नाही लागला स्वतःहून स्थळ चालत आलं . आशय सारखा जोडीदार मिळायला भाग्य लागतं . मागील जन्मी मोती दान केले असतील वैखरीनी म्हणून तिला मोत्यासारखा मूल्यवान जोडीदार मिळाला ."
वैखरी : " अगं आई . लग्न व्हायचय अजून . तू आशयला माझा जोडीदारही करून टाकलसं ."
बाबा : "अगं वैखरी , तुझं सेमीस्टर आटोपल्यावर लवकरच लग्नाची तारिख
काढूया. काय हरकत आहे आई आशयला तुझा जोडीदार म्हणतेय तर . आशय तुझा जोडीदार होणार आहेच की लवकरच ."

तुम्ही मारा गप्पा मी माझा अभ्यास करते सांगून तिच्या रुममध्ये निघून जाते . आतूही वैखरीच्या मागे जाते….

वैखरी :" बघ नं गं आतू , आशयला धरून किती स्वप्न बघतायत आई - बाबा . वसंतबद्द्ल सांगीतल्यावर तर आर्ई बाबांना धक्काच
बसणार .. ... कसं सांगशील गं तू बाबांना ?
घरात खूप दिवसानी आलेला आनंद जास्त दिवसाचा पाहुणा नाही दिसत मला . वसंतची गोष्ट सांगीतल्यावर पुन्हा घरातीलं वातावरण बदलणार ह्या कल्पनेनं मला धस्स होतंय गं
आतू ."

आतू : " जास्त विचार करू नकोस . सांगीतल ना तुला ऋणानुबंधाच्या गाठी विधात्याने बांधालेल्या आहेत म्हणून मग कसली चिंता . अभ्यास कर . उद्या आशय आल्यावर नॉर्मल वागशील उगीच आताच घरातील आनंद नको घालवूस ."

क्रमशः

वैखरीचे लग्न कुणाशी होईल हे जाणून घ्यायला नक्की वाचा वैखरी एक प्रेमकथा भाग-१९

कथा आवडल्यास लाईक कमेंन्ट नक्की करा .

धन्यवाद!

©® ऍड. नीता प्रफुल्ल कचवे


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Adv Nita Kachave

Advocate

सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून एकविस वर्षे नोकरी करून स्वेच्छा सेवानिवृत्तीनंतर वकिली व्यवसाय करते . मी लेखीका नाही परंतु शालेय जीवनापासून भावलेलं, रुजलेलं, अनुभवलेलं शब्दांत उतरवायचा एक छंद . वाचनाचा व्यासंग . शब्दांच्या दुनियेत रमायला आवडणारी मी एक शब्दवेडी .

//