वैखरी एक प्रेमकथा भाग-१७

A Lovestory Of A Girl

वैखरी एक प्रेमकथा भाग-१७
विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .



पूर्वांध : वैखरी आज खूप खूश असल्याचं कारण तिची जीवलग मैत्रीण स्वराला सांगत होती ….

आता पुढे वाचा भाग -१७

वैखरी : " अगं स्वरा आज खूप आनंदाचा दिवस आहे आमच्या कुटुंबीयांसाठी . घराच्या काना- कोपर्‍यात, कुटुंबातील सदस्यांच्या मनामनांत आनंद ओसंडून वाहतोय आज . माझी आतू खूप दिवसांनी हसली . तिच्या चेहर्‍यावर आनंदाची लकेर पाहून घरात आनंद पसरला . गेल्या चोवीस वर्षापासून स्वतःला जगापासून दूर ठेवणारी आतू आज पहाटे उठून बागेतील झाडांना पाणी घालत होती . कशातच रस नव्हता उरला तिला . आज तिची नकारात्मक व दुःखी मानसिकता सकारात्मक व आनंदी झाली . आम्ही सर्वजण देवाकडे इतक्या वर्षापासून आतूच्या जीवनातील हरवलेला आनंद मागत होतो . देवानी आज परत दिला ."

स्वरा : "आतू तुझ्याकडे असते एवढं बोललेली तू माझ्याकडे . कधी बोलली नाहीस की, आतू फक्त श्वास घेतेय जगणं विसरलीय . खरंच वैखरी आज अतिशय आनंदाचा दिवस . आतू पुन्हा जगायला लागली . अनमोल आयुष्याचे चोवीस वर्षे वाया गेलेत आतूचे . आता तू त्यांना त्यांच्या आयुष्यांतील प्रत्येक क्षण उत्तम देण्याचा प्रयत्न करं . आतू इतके वर्ष कोणते दुःख पांघरुण होती गं वैखरी? ज्यामुळे त्यांना जगण्यात आनंद वाटत नव्हता ."

वैखरी : "अ … ..s काय बोललीस स्वरा ? "

स्वरा : " मी विचारतेय की, आतूच्या मनावर असा कोणता आघात झाला होता की त्या इतकी वर्ष त्या दुःखाच्या विळख्यातून बाहेर नाही पडू शकल्या ."

वैखरी : चल आपण त्या झाडाखाली बसूया . स्वरा, आतूच्या जीवनाची एक गाथाच आहे .

वैखरी स्वराला आतूच्या आजवरच्या आयुष्यांची संपूर्ण गाथा सांगते…. सांगतांना तिचे डोळे भरून येतात .

स्वराच्याही डोळ्यांतील आसवं डोळ्यांचे काठ ओलांडून गालाला स्पर्श करतात . आसवं पुसतं स्वरा वैखरीला म्हणते, " खरंच गं वैखरी आतूची कहाणी अति दुःखद आहे . प्रेमात प्रियकरानी धोका दिला हे काही दिवसानी विसरून माणूस जगायला लागेल पण एखादया आईचं बाळ तिच्यापासून कोणी हिसकावून घेणं . तिला तिच्या बाळापासनं दूर करणं . तिच्यासाठी त्या वेदना मरणप्रायच . आतूचं बाळ तर कायमचं तिच्यापासून दूर केलं . कुठे आहे ? हे युद्धा बिचारिला माहिती नाही . ते सत्य तुझ्या आजोबांसोबत गेलं . माहिती असतं तरी लोक लाजेखातर त्याला आपलं म्हणणही शक्य नाही .आज आतू जरी आनंदी दिसली तरी मुलाचं दुःख तिच्या उरात खोलवर एका कप्प्यात असेलच . देव करो एखादा चमत्कार होवो अन् आतूच्या मुलाशी आतूची भेट होवो . आई दादा अमेरिकेला गेला त्यादिवसापासून अस्वस्थ असते . आईला देवानी वेगळचं हदय दिलेलं आहे गं. निस्वार्थ प्रेममूर्ती म्हणजे "आई ".

वैखरी : "अगदी खरं स्वरा ".

स्वरा : "जशी आतू तिच्या मुलासाठी दुःखी असते तसाच तिचा मुलगाही आईसाठी दुःखीच असेल गं . माझी आई .जन्मदाती कुठे असेल ? कशी असेल ? असे प्रश्न त्यालाही स्वस्थ बसू देत नसतील गं . जसा वसंतदादा कितीही आनंदी दिसला तरी मनातून अस्वस्थ असतो हे आम्ही अनुभवलयं वैखरी . वसंतदादा स्वतःच्या भावनांचे समायोजन व्यवस्थित करतो सतत व्यस्त राहतो म्हणून त्याचं जगणं सहज होतं .आतूलाही कशाततरी स्वतःला व्यस्त करून घेणं गरजेचं आहे ."

वैखरी : " हो . आतुला कशात तरी स्वतःला गुंतवणं गरजेचेच . नाहीतर ती मनःस्थिती परत यायला नको . स्वरा मी निघते आता चल उद्या भेटू . बाय."

स्वरा : एक मिनिट वैखरी . पण आतूत एकदम मनपरिवर्तन कसं झालं ? कुणी केला हा चमत्कार !

वैखरी : चमत्कार कसला गं . खरं तर आतू कुणाशी घरातही मनमोकळं बोलत नव्हती . कधी मनातलं दुःख बोलून दाखवलं नाही कुणाकडे . कधी मन रितंच केलं नाही तर दुसरा विचाराला मनात जागाच नव्हती . मुलाचं दुःख . प्रेमात मिळालेला धोका हयाच गोष्टींचा सतत मनातल्या मनात घोक करत बसली त्यामुळे तिला हे जग सुंदर वाटत नव्हतं . जगात किती दुःखी माणसं आहेत याची कल्पनाच तिला नव्हती . तिला तिचचं दुःख मोठं वाटत होतं . माझ्या लग्नाचा विषय घरात निघाला त्याबाबत आम्हा सर्वांना एकत्र बोलावून बाबा बोलले त्यानिमीत्तानी माझा आणि आतूचा संवाद झाला . बोलता बोलता तिने तिच्या मनातलं आभाळ माझ्याजवळ रितं केलं .मी सुद्धा माझे विचार त्यावर व्यक्त केले . तिला ते पटले . तिच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले . त्या विचारांनी तिला तिच्या अंतरंगात डोकावायला भाग पाडलं असावं . आतूनी त्यानंतर केलेल्या चिंतन मननातून आतूचे विचार परिवर्तन होवून मन परिवर्तन झाले असावे . नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचारांनी घेतली असावी त्याचीच ही परिणिती की आतूच्या चेहर्‍यावरील दुःखाची जागा आनंदानी घेतली . असं मला वाटते .

स्वरा : "अगदी बरोबर . आपल्या सोबत खूप वाईट झालं हे दुःख पांघरून माणूस असेल कुणाशी संवाद साधण्याची त्याची मानसिकता नसेल .नकारात्मकतेनी घेरलेल्या माणसाच्या मनात दुसरा विचार प्रवेश करूच शकत नाही . आतूसोबत तसंच काहीसं झालं . वैखरी तू तर एक उत्तम समुपदेशक आहेस यार . तुझ्या शब्दांनी आतूच्या जीवनात आनंद पेरला .
चल भेटू उद्या ok Bye dear. "

वैखरी : "see you tomorrow ".

***"**************************************
आई : "आलीस वैखरी ?. तुझीच वाट बघत होती  आतू . परवा आशय आणि त्याची फॅमिली येणार आहेत तर तू साडी नेसावी असे तुझे बाबा म्हणाले वैखरी . तू आणि आतू मार्केटला जावून सुंदरशी साडी घेवून या तुझ्यासाठी .तसा मी बुटीकवालीला फोन केलाय की अर्जंट साडी व ब्लाऊज तयार करून दयायला . तू आणि आतू फक्त पसंद करून या तुमच्या चॉईसची साडी त्यानिमीत्तानी आतूही बाहेर पडेल ."


वैखरी : " काय गं आई .साठी वगैरे काहीपण ."


आई : " अगं वैखरी साडी हा आपला महाराष्ट्रीयन पारंपारिक पेहराव आहे . सणासुदीला, लग्नकार्यात, कुणी वडिलधारी घरी पाहुणे येत असतील तर साडी नेसण्याची संस्कृती आहे आपली. "

वैखरी : " बरं बाई . साडीपुराण ऐकल्यापेक्षा मी घेवून येते साडी .आतू कुठाय ?

आई : " आतू देवघरात आहे ."

वैखरी : " ठिक आहे .मी आतूला भेटून येते."

आई : "तू फ्रेश हो . तोवर आतूची पूजा आटोपतो . कशाला त्यांच्या पूजेत व्यत्यय आणतेस ".

वैखरी तयार होवून आतूला भेटायला देवघराकडे 

जाते . तेवढ्यात आतूची पूजा आटोपलेली असते .

वैखरी : "आतू काय मागीतलसं देवाला?".

आतू : " देवाकडे मागितलेलं सांगायचं नसतं ."



क्रमशः

आतूने देवाकडे काय मागितलं हे जाणून घेण्यासाठी आणि पुढे वैखरीच्या आयुष्यात काय होणार हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा..

वैखरी एक प्रेमकथा भाग -१८

कथा आवडल्यास लाईक, कमेन्ट करायला विसरु नका . न आवडल्यास माफ करा .

धन्यवाद !

©® ऍड. निता प्रफुल्ल कचवे .
टीम - अमरावती .





🎭 Series Post

View all